अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

साडी ही अशी फॅशन आहे जी कधीच जुनी होत नाही. आता साडीमध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स दिसून येतात. त्यातही काही अभिनेत्री या साडींची स्टाईल इतक्या छान कॅरी करतात की आपणही अशीच स्टाईल करावी असं प्रत्येकाला नक्कीच वाटतं. बॉलीवूडमधील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना साडी अगदीच शोभून दिसते आणि या अभिनेत्री कोणत्याही साडीची स्टाईल असली तरीही अप्रतिमच दिसतात. सध्या अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल व्हायरल होत आहे. साडीच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आपण आतापर्यंत पाहिल्या आहेतच. त्यामध्ये कांजिवरम, सिल्क, फ्रिलच्या साड्या अशा अनेक स्टाईल्स बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी केलेल्या आपण पाहिल्या आहेत. नक्की ही साडी जॅकेट स्टाईल काय आहे ते आपण पाहूया.

काजोल

View this post on Instagram

Straight hair and sari with a twist!

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

कोणत्याही कार्यक्रमांना बऱ्याचदा काजोल साडी नेसून आलेली दिसते. काजोल नेहमीच एक स्टाईल आयकॉन म्हणून आपण गृहीत धरतो. काजोलने नेसलेल्या या नारिंगी रंगाच्या साडीमध्ये अतिशय ग्लॅमर भरलेलं दिसून येत आहे. गोल्डन जॅकेट वरून घालून त्यावर लावलेला बेल्ट त्याची शोभा अजून वाढवत आहे. साडी विथ ट्विस्ट असंही काजोलने यामध्ये म्हटलं आहे आणि ते खरंही आहे. तुम्हाला जर साडी नीट सांभाळता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीची स्टाईल नक्कीच कॅरी करू शकता. म्हणजे साडीचा पदर सांभाळत राहण्यापेक्षा तुम्ही त्यावर असं जॅकेट घालून बेल्टने बांधलं की स्टाईलही झाली आणि तुम्हाला साडीचा त्रासही होणार नाही. त्यात साडी नेसल्याचंही समाधान.

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

सोनम कपूर

बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळख असणारी सोनम कपूर तरी साडीच्या या स्टाईलच्या बाबतीत कशी मागे राहील. सोनम बऱ्याचदा आपल्या स्टाईलसाठी साडीची निवड करते. सोनमची स्टाईल ही नेहमीच वेगळी ठरत असते. त्यामुळे या हँडलूमच्या साडीमध्ये सोनमने नेहमीप्रमाणे आपली स्टाईल स्ले केली आहे. अशीच स्टाईल तुम्हीही करू शकता. बॉलीवूडची अभिनेत्री म्हणून ओळख मिळविण्यापेक्षाही जगभरात सोनमने आपल्या स्टाईलने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिची ही फुल जॅकेटवाली साडी अर्थातच लक्ष वेधून घेत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

शिल्पा शेट्टी

बॉलीवूडची दिवा शिल्पा शेट्टी नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसते. त्यातही तिने साडी नेसली की अशी साडी आपल्याकडे पण असावी आणि आपणही अशी स्टाईल एकदातरी करावी असं प्रत्येक महिलेला नक्कीच वाटतं. ऑफव्हाईट रंगाच्या या साडीमध्ये शिल्पा अतिशय सुंदर दिसत असून यावरील ही जॅकेट स्टाईल तिच्या परफेक्ट फिगरमुळे अधिक लक्ष वेधून घेत आहे. शिल्पा नेहमीच फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिची ही स्टाईल अतिशय लक्षवेधक आहे हे नक्की. तसंच तिच्या उंचीमुळे ही साडी जॅकेट स्टाईल तिला अधिक खुलून दिसत आहे.

नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर म्हणजे बॉलीवूडची शान आहे. आजही करिश्मा चित्रपटात काम करत नसली तरीही तिची फॅशन आणि स्टाईल अनेक मुली फॉलो करत असतात. तिला सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स असून तिची प्रत्येक स्टाईल कॉपी करण्यात येते. त्यामुळे साडीच्या फॅशनच्या बाबतीत तरी करिश्मा कशी मागे राहील. या लाल रंगाच्या साडीमध्ये करिश्माचा रंग अजून खुलून दिसत आहे. तुमचाही असाच वर्ण असेल तर तुम्ही नक्की ही स्टाईल फॉलो करू शकता. यावर घातलेले सिल्कचे जॅकेट करिश्माचा आधुनिक लुक अजूनच शोभून दिसायला मदत करत आहे.

ब्रायडल आऊटफिटसाठी बनारसी साडी आहे उत्तम पर्याय

विद्या बालन

सगळ्यात जास्त कोणती अभिनेत्री सध्याच्या काळात साडीमध्ये दिसून येत असेल तर ती म्हणजे विद्या बालन. कोणताही चित्रपट असो त्याच्या प्रमोशनसाठी जातानाही विद्या साडीमध्येच दिसून येते. विद्या बालन नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल्स फॉलो करत असते. साडी जॅकेटची ही स्टाईलही काळ्या साडीमध्ये विद्याने अप्रतिम फॉलो केली आहे. साडी कोणतीही असो अथवा कोणतीही साडीची स्टाईल असो विद्या बालन तो लुक अप्रतिम वठवते. तुम्हीही अशा प्रकारची स्टाईल करून तुमच्या लुकमध्ये सौंदर्याची भर घालू शकता. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार - कशी नेसावी साडी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा