सुशांतच नाही तर या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचाही पेच राहिला कायम

सुशांतच नाही तर या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूचाही पेच राहिला कायम

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड आणि बॉलिवूडचे चाहते हादरुन गेले आहेत. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची PA दिशा सालियनची अचानक झालेली आत्महत्या यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करीअरच्या हाय पीकवर असताना यांनी आत्महत्या का केली असेल असेही प्रश्न अनेकांना पडले. त्यामुळे ही आत्महत्या नसून त्यांचा खून झाला असेही आरोप करण्यात आले आहे. सुशांतच्या आत्महत्येची CBI चौकशी आता केली जाईल. पण बॉलिवूडमध्ये या आधीही असा काही आत्महत्या किंवा काही जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत की, ज्याचा तिढा अद्याप सुटला नाही. जाणून घेऊया असेच काही बॉलिवूड कलाकार ज्यंच्या मृत्यूचा पेच अजूनही राहिला आहे कायम

सुरज पांचोलीवर होणाऱ्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलली त्याची आई

जिया खान

Instagram

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या जिया खानच्या आत्महत्येच्या बातमीने अनेकांना धक्का दिला. 2 जून 2013 रोजी तिच्या राहत्या घरात तिच्या बेडरुममध्ये ती गळफास लागलेल्या अवस्थेत सापडली. घरी कोणी नसताना तिने ही आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर तिच्या घरात सुसाईड नोट सापडली. 10 पानी सुसाईड नोटमध्ये तिने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला होता. त्यावेळी अभिनेता म्हणून येऊ पाहणारा सुरज पांचोली तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. ती गरोदर होती तिने अॅबॉर्शन केले होते. ती अतिशय दु:खात होती. तिच्या दु:खासाठी सुरज कारणीभूत असल्याचा आरोप तिची आई राबिया खान हिने केला होते. CBI देखील याची चौरशी करत होती. पण ही केस पुढे थंडावली आणि तिच्या आत्महत्या की हत्या यावरुन पडदा उठू शकला नाही.

अर्चना पांडे

MID-DAY

मॉडेल आणि त्यानंतर आर्थिक सल्लागार बनललेली 26 वर्षीय अर्चना पांडे,29 सप्टेंबर 2014 रोजी तिच्या वर्सोवा येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. तिच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तिच्या शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांना तिच्या मृतदेहासोबत एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजेत ओमार पठाणला यामध्ये दोषी असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर तिच्या मृत्यूसंदर्भात कोणतीही बातमी समोर आली.

मुंबईतच संजय दत्त घेणार कॅन्सरवर उपचार

नसीफा जोसेफ

 आरजे, मॉडेल आणि मिस इंडिया अशी ओळख असलेल्या नसीफा जोसेफ हि देखील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडली. 29 जून 2004 मध्ये तिचा मृत्यू झाला.  नसीफाच्या मृत्यूपूर्वी ती बिझनेसमन गौतम खांदुजासोबत लग्न करणार होता. पण  लग्नाच्या काहीच दिवसांपूर्वी तिचे लग्न तुटले होते. यामुळे ती तणावाखाली होती आणि तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले. पण पुढे काही केलेल्या चौकशीदरम्यान ती ज्या गौतमसोबत लग्न करणार होती. तो आधीच लग्न झालेला होता. त्याने नसीफाशी लग्न करायचा निर्णय घेऊनही पूर्व पत्नीसोबत घटस्फोट घेतला नव्हता. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला होता या तणावाखाली तिने आत्महत्या केली म्हणून गौतमला ट्रायलसाठी 2006 पर्यंत मुंबई न्यायालयाने त्याला बोलावले. पण यामध्ये तो यासाठी दोषी असल्याचे सिद्ध झाले नव्हते. नसीफाचा मिस इंडिया झाल्यावर समीर मल्होत्रासोबत साखरपुडा झाला होता तोही साखरपुडा तोडण्यात आला. सिद्धार्थ सोनीसोबतचा तिचा साखरपुडा तुटला होता. त्यामुळे याचे तिच्या आत्महत्येमागे नेमके कारण कोणते होते कधीच कळले नाही. 


हे काही बॉलिवूडशी निगडीत कलाकार आहेत ज्यांच्या मृत्यूचे कोडे कधीच उलगडले नाहीत. यामध्ये आणखी काही कलाकारांचाही समावेश आहे. 

 सारा आणि कार्तिकमध्ये पु्न्हा दुरावा, सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो