अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

बी टाऊन म्हटले की, वेगवेगळ्या सेलिब्सचा गराडा आलाच. पण या सेलिब्समध्ये बहुतेकदा अभिनेता आणि अभिनेत्रींचेच नाव असते. पण या क्षेत्राशी निगडीत नसलेले असे काही सेलिब्स आहेत जे तुम्हाला पडद्यावर दिसत नसले तरी त्यांचा या इंडस्ट्रीमध्ये चांगलाच दबदबा आहे. जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटी ज्यांचा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षाही जास्त आहे दबदबा.चित्रपटात काम न करताही त्यांना या मध्ये प्रसिद्धी मिळाली आहे. 

कधी काळी या अभिनेत्रींनी निभावली होती व्हिलनची भूमिका

अर्पिता खान

Instagram

सलमान खानची बहीण अर्पिता खान ही  चित्रपटात काम करत नसली तरी ती सगळ्या बी टाऊनला आणि सलमानच्या चाहत्यांना माहीत आहे. बी टाऊनमध्ये कोणतीही पार्टी असली तरी सलमानची बहीण ही उपस्थित असते. अॅवॉर्ड फंक्शन असो किंवा काहीही या सगळ्या ठिकाणी ती कायम दिसून आली आहे. लहानपणापासूनच खान परीवाराची अत्यंत लाडकी अशी अर्पिता हिने आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष शर्माने नुकतेच एका चित्रपटात काम केले. पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी ही अर्पिता खानला आहे. 

मुझसे शादी करोगे'फेम अभिनेत्रीचा अपघात, फोटो व्हायरल

गौरी खान

Instagram

शाहरुख खानची बायको गौरी खान ही देखील बॉलीवूडचा एक चर्चित चेहरा आहे. किंग खान शाहरुख खानची बायको इंटेरीअर डिझायनर आहे. तिने अनेक सेलिब्रिटींची घरे डेकोर केली आहेत. तिने प्रत्यक्ष चित्रपटात काम केले नाही. पण तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ती कायमच चर्चेत असते. शाहरुखसोबत ती अनेक पार्टीमध्ये दिसते. त्यावेळी तिची खूप चर्चो होते.  त्यामुळे साहजिकच तिचा दबदबा बॉलिवूडमध्ये आहे. तिने अनेक जाहिरातीही केल्या आहेत. त्यामुळे तिचा चेहरा अनेकांना आतापर्यंत लक्षात राहिला आहे. 

मीरा राजपूत

Instagram

शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत ही देखील कायमच चर्चेत असते. शाहीद कपूरसोबत लग्न केल्यापासून तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. मीरा राजपूत ही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही कमी नाही. ती शाहीदपेक्षाही कायम चर्चेत असते. ती नेहमी कॉन्ट्राव्हर्शीअल स्टेटमेंट करत असते. मीरा ही दिसायला सुंदर असल्यामुळे ती ही चित्रपटात येणार असे म्हटले जात होते. पण तिला प्रसिद्ध होण्यासाठी चित्रपटात असण्याची फारशी गरज नाही कारण ती आधीच फार प्रसिद्ध आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीमध्ये मीरा राजपूत ही एकदम हमखास असते. मीरा राजपूत हा आता सेलिब्रिटीमध्ये गणला जाणारा चेहरा आहे.

शकुंतला देवी नंतर आता 'शेरनी' व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग

किरण राव

Instagram

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याची बायको किरण राव हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा आहे. आमीर खानसोबत ती अनेकदा दिसत असली तरी तिला स्वत:चे असे वेगळे अस्तित्व या बी टाऊनमध्ये आहे. चित्रपट निर्माती, स्क्रिन प्ले रायटर अशी तिची ओळख आहे. ‘पाणी’ फांऊडेशनची ती फाऊंडर असून तिने या माध्यमातून अनेक काम केली आहेत. बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमांना ती हजर असते. 


तर या आहेत असे सेलिब्स ज्यांना तुम्ही पडद्यावर पाहिले नसेल पण हे सेलिब्रिटी फारच प्रसिद्ध आहेत.