या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख


हिरो किंवा हिरोईनच्या नृत्यसादरीकरणाला पूर्ण करण्याचे काम करतात ते म्हणजे ‘बॅक डान्सर्स’ त्यांचे महत्व इतरांना जाणवत नसले तरीदेखील त्याच्यामुळे हिरो-हिरोईनला शोभा येत असते. बॅकराऊंड डान्स करणारे हे कलाकार कधीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतील असे कधीही कोणाला वाटले नसेल. पण या उत्तम बॅकराऊंड डान्सिंगच्या जोरावर अनेकांनी बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. जाणून घेऊया असे काही बॅक डान्सर्स ज्यांनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आहे त्यांची ओळख

करीना कपूरमुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानची येणार ऑटोबायोग्राफी

शाहीद कपूर

Instagram

शाहीद कपूर उत्तम डान्स करतो हे आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहे. पण बॅक डान्सिंग करुन त्याने आपले हिरो होण्याचे लक्ष्य ही साध्य केले आहे. शाहीद कपूर ‘ताल’ चित्रपटात ऐश्वर्यासोबत दिसला होता.शामक दावरच्या डान्स अॅकेडमीमध्ये डान्सचे धडे घेत असताना त्याने अनेक चित्रपटांसाठी बॅक डान्सिंग केली आहे. पण त्याच्या अभिनयशैलीमुळे आणि त्याच्या डान्समुळे त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याने आपला वेगळाच दबदबा निर्माण केला.

डेझी शहा

Instagram

कोरिओग्राफर गणेश आचार्यासोबत काम करणारी डेझी शहा अनेक चित्रपटांमध्ये बॅक डान्सर्ससोबत दिसली आहे. ‘तेरे नाम’ या चित्रपटात ती सलमान खानच्या मागे नाचतानाही दिसली आहे. तिचे अनेक व्हिडिओ वायरलही झाले होते. सलमाननेच तिच्यातील चुणूक ओळखून तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर तिने लीड रोल म्हणून अनेक चित्रपटात काम केले आहे.  सलमान सोबत ‘जय हो’ चित्रपटात ती दिसली. याशिवाय तिने ‘रेस’, ‘ब्लडी इश्क’ या चित्रपटात काम केले आहे.

अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण

रेमो डिसूजा

Instagram

कोरिओग्राफर म्हटले की, कोरिओग्राफर रेमो डिसूजाचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. अनेक रिअॅलिटी शोच्या परिक्षकाची भूमिका  रेमो डिसूजा आता करतो. पण त्यानेही या पदापर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.  रेमो डिसूजाला सुरुवातीच्या काळात त्याच्या रंगामुळे काम मिळत नव्हती. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला काम करणे गरजेचे होते. पण त्याने हार मानली आहे. तो जसा आहे त्याच्या जोरावर त्याने 1995 साली आलेल्या ‘रंगिला’ या चित्रपटात बॅकराऊंड डान्सर म्हणून काम करायला मिळाले आणि त्याचा प्रवास सुरु झाला. आज तो बॉलिवूडमधील नावाजलेला कोरिओग्राफर आहे. अनेक मोठ्या चित्रपटांची कोरिओग्राफी त्याने केली आहे. 

सुशांत सिंह राजपूत

Instagram

जो अभिनेता आज आपल्यात राहिला नाही. पण त्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत असा सुशांत सिंह राजपूत सुपरस्टार पदापर्यंत पोहोचला. पण त्यानेही अनेक कष्ट करुन हा मान मिळवला आहे. अनेकांना त्याची ओळख ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील लीड कलाकार म्हणून असली तरी त्याने देखील बॅकराऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी आणि नावारुपाला येण्यापूर्वी तो उत्तम डान्सर म्हणून प्रसिद्ध होता. शामक दावरच्या डान्स अॅकेडमीमध्ये तो डान्सचे धडे गिरवत असताना त्याला ऋतिक रोशनसोबत धूम 2 च्या टायटल ट्रॅकवर नाचण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो कधीही थांबला नाही. त्याने आपला प्रवास सुरुच ठेवला


 हेच नाही तर अन्य असे खूप बॅकराऊंड डान्सर्स आहेत ज्यांनी आपले नाव मेहनतीच्या बळावर कमावले आहे

या' कपलमधील दुरावा होतोय कमी, सोशल मीडियावर एकमेकांना रिप्लाय