महिलांचा बराच वेळ जातो तो स्वयंपाकघर अर्थात किचनमध्ये. प्रत्येकाला आपलं घर आणि किचन स्वच्छ हवं असतं. पण इतकी कामं असतात की प्रत्येकवेळी सगळीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपल्या प्रत्येकाला आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या काही क्लिनिंग हॅक्स जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं. अशाच काही महत्त्वाच्या क्लिनिंग हॅक्स (Cleaning hacks in marathi) आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत. किचन टिप्स मराठीत सहसा उपलब्ध होत नाहीत. तुम्हाला यासाठीच अगदी सोप्या करून काही किचन टिप्स आणि क्लिनिंग हॅक्स देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला सतत स्वच्छ किचन हवं असेल तर यापैकी काही क्लिनिंग हॅक्स तुम्ही नक्की वापरून पाहा. तुमचं आयुष्य अधिक सुखकर आणि सोपं होईल. जाणून घेऊया अशाच काही सोप्या आणि सुखकर क्लिनिंग हॅक्स संपूर्ण घरासाठी
भाज्या कापण्यासाठी आपल्याला स्वयंपाकघरात जो कटिंग बोर्ड लागतो. त्यावर बऱ्याचदा भाज्यांचे रस किंवा अनेक डाग पडतात. मग अशावेळी फक्त पाणी आणि साबण लाऊन हे डाग जात नाही. अशावेळी तुम्ही लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून घ्या आणि कटिंग बोर्डाला हे मिश्रण लाऊन साधारण पाच मिनिट्स तसंच ठेवा आणि त्यानंतर कटिंग बोर्ड स्वच्छ करा. त्यावर कोणतेही डाग तुम्हाला दिसणार नाहीत.
घरात बसण्यासाठी आपल्याला सोफा लागतो. पण तो साफ कसा करायचा हादेखील प्रश्न निर्माण होतो. कितीही तुम्ही फडक्याने साफ करायचा प्रयत्न केलात तर सोफ्यावर कोनाड्यात धूळ राहतेच. मग अशावेळी तुम्ही बेकिंग सोडा सोफ्यावर टाका आणि काही वेळ तसाच राहू द्या. त्यानंतर फडक्याने अथवा तुमच्या क्लिनिंग मशीनने सोफा स्वच्छ करा. बेकिंग सोड्यामुळे सोफ्यावर धूळ आणि डाग दिसणार नाहीत.
ओव्हनचा वापर किचनमध्ये खूप केला जातो. पण याची साफसफाई करताना मात्र घाम निघतो. तरीही ओव्हन स्वच्छ झाला आहे असं वाटत नाही. तुम्हाला ओव्हन आतून स्वच्छ हवा असेल आणि त्यात कोणताही घाण वास राहायला नको असेल तर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून ओव्हन स्वच्छ पुसून घ्या. कोणत्याही प्रकारचे डाग आणि वास आतमध्ये राहणार नाहीत.
घरातील खिडक्यांवर अथवा बाथरूममध्ये ब्लाईंड्स असतील तर ते कसे स्वच्छ करायचे असा प्रश्न पडतो. केवळ फडक्याने अथवा नुसत्या पाण्यानेही त्यावरची धूळ पूर्ण साफ होत नाही आणि डाग पडतात. अशावेळी व्हिनेगर आणि पाणी याचे एकत्र मिश्रण घेऊन जुन्या कॉटनच्या सॉक्सने तुम्ही ब्लाईंड्स पुसून पाहा. तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. डागही राहणार नाहीत.
बऱ्याचदा आपल्याकडे लाकडाची टेबल्स असतात. त्यावर सतत ग्लास अथवा बाटल्या ठेऊन पाण्याचे डाग पडतात. पण ते डाग निघू शकत नाहीत असा समज बऱ्याच जणांचा आहे. पण तसं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या हेअरड्रायरने हे पाण्याचे डाग काढू शकता. रिफ्रेश करण्यासाठी आधी त्यावर ऑलिव्ह ऑईल लावा ते साफ करा आणि हेअरड्रायरने स्वच्छ करा. तुम्हाला डाग निघून गेलेले दिसतील.
बऱ्याच घरांमध्ये कारपेट असते. कारपेटवर जर तेलाचे डाग पडले तर कारपेट लवकर खराब होते आणि दिसायलाही अत्यंत घाण दिसते. पण त्याचा अर्थ लगेच कारपेट बदलावे अशा होत नाही. हे डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा उपयोग करू शकता. पाण्यात बेकिंग सोडा घालून कपड्याने हे तेलाचे डाग पुसून घ्या. व्यवस्थित याचा वापर केल्यास, तेलाचे डाग निघून जाण्यास मदत होते.
लोखंडी भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरा समुद्री मीठ. यामुळे लोखंडी भांडी स्वच्छ राहतात आणि त्यावर असलेला गंजही निघून जातो.
स्टीलची भांडी नेहमी वापरात असतात. आपल्याला सतत ही भांडी घासताना चांगले साबणाचा वापर करावा लागतो. पण काही दिवसांनी याची चमक कमी होते. भांडी परत चमकविण्यासाठी तुम्ही क्रिम टार्टरचा वापर करा. यामुळे भांड्यांवर काही डाग जमले असतील तर ते निघून जाण्यास मदत मिळते.
चॉकचा उपयोग आपण फळ्यावर लिहिण्यासाठी करतो. कपड्यांवरील न जाणारे डाग तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही त्यावर चॉकने पहिले खरडवून घ्या. कपडे धुवायच्या आधी तुम्ही डागांवर चॉक लाऊन ठेवल्यास, असे डाग काढण्यास सोपे होते.
किबोर्ड कितीही आपण कपड्याने पुसला तरीही त्यावर मध्ये मध्ये धूळ साचून राहते अशावेळी तुम्हाला किबोर्ड व्यवस्थित साफ करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. टूथब्रशमुळे तुम्हाला कोपऱ्यातील साचलेली धूळही काढून टाकता येते.
बेकिंग सोडा आणि व्हेजिटेबल ऑईल मिक्स करून जुन्या टूथब्रशने तुम्ही दरवाजे साफ करण्यासाठी वापरू शकता. बेकिंग सोड्याने डाग निघून जातात. तसंच दरवाज्यावर चमक येते.
बऱ्याचदा आपण नेलपॉलिश लावायला खाली बसतो. गादीवर पडू नये असं वाटत असलं तरीही कारपेटवरही नेलपॉलिश पडण्याची शक्यता असतेच. नेलपॉलिशचा डाग जाणं कठीण आहे. मात्र तुम्हाला कारपेटवरील नेलपॉलिशचा डाग घालवायचा असेल तर तुम्ही अल्कोहोलचा वापर करू शकता. याने पटकन डाग निघून जाईल.
मेकअप ब्रश कसा साफ करायचा असा प्रश्न सर्वांनाच पडतो. आपण खूप प्रयत्न करूनही त्यात काही ना काही राहून जातं. मग अशावेळी मेकअप ब्रश चक्क तुम्ही बेबी शँपूने धुऊ शकता आणि हे वाळवण्यासाठी तुम्ही त्यांना हँगरवर चिमट्याच्या सहाय्याने उलटे लटकवा. म्हणजे ब्रश खराब होत नाहीत आणि वाकतही नाहीत.
बऱ्याचदा बाथरूमच्या शॉवरवर पाण्याचे डाग पडतात. पण ते डाग किती वेळा साफ करणार. अशावेळी तुम्हाला ज्यावेळी शॉवर वापरायचा नसेल तेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीला व्हिनेगर लाऊन शॉवरला बांधून ठेवा. दुसऱ्या दिवशी काढून कपड्याने स्वच्छ करून घ्या.
हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण जमिनीवर जर तेलाचे डाग पडले असतील आणि जात नसतील तर असे हट्टी डाग काढण्यासाठी तुम्ही कोका कोलाचा वापर करू शकता. यामुळे हे डाग सहज निघून जातात आणि जमीन रगडत बसावी लागत नाही.
तुम्ही जर ग्राईंडर अथवा मिक्सरमध्ये कॉफी केली असेल आणि त्याचा वास बरेचदा भांडं घासल्यानंतरही जात नाही. असं असेल तर हा वास घालविण्यासाठी तुम्ही कच्चे पांढरे तांदूळ थोडेसे घ्या आणि ग्राईंडरमधून काढा. कॉफीचा वास पटकन निघून जाईल.
बऱ्याचदा स्निकर्स वापरून वापरून काळे पडतात. आवडते स्निकर्स असतील तर टाकायलादेखील जीवावर येतं. अशावेळी तुम्हाला टूथपेस्ट कामी येते. तुम्ही टूथपेस्टच्या सहाय्याने या स्निकर्सवरील काळपटपणा घालवू शकता आणि पुन्हा एकदा स्निकर्सला चकाकी देऊ शकता.
चांदीच्या वस्तूही तुम्ही टूथपेस्टच्या सहाय्याने चमकवू शकता. ही क्लिनिंग हॅक तर नक्कीच बऱ्याच जणांना माहीत असते. साधारण सण आले की घरातील सर्व चांदीच्या वस्तू टूथपेस्टने घासल्या जातात. त्यामुळे तुम्ही अगदी तुमच्या अंगठ्यांपासून ते पैंजणांपर्यंत सर्व चांदीच्या वस्तू टूथपेस्टने स्वच्छ करून घेऊ शकता.
बऱ्याचदा लक्ष नसताना दुधाची पातेली करपते अथवा भाजी करपते. अशावेळी भांडी काळी पडतात. हा काळेपणा कसा जाणार असा प्रश्न पडत असेल तर त्या भांड्यात पाणी घालून थोडा वेळ व्हिनेगर घालून ठेवा. अर्ध्या तासाने ही भांडी धुवा. तुम्हाला अजिबात ही करपलेली भांडी दिसणार नाहीत. पुन्हा एकदा नव्याप्रमाणे भांडी दिसतील.
लेदरचा सोफा बरीच वर्ष झाली की खराब दिसू लागतो. पण यावर उत्तम उपाय म्हणजे तुमच्याकडे असणारं शू पॉलिश वापरणं. तुम्ही सोफ्याला शू पॉलिश लाऊन पुन्हा एकदा पहिल्यासारखा नवीन करू शकता. ही एक उत्तम क्लिनिंग हॅक आहे आणि तुमच्या रोजच्या वापरासाठी नक्कीच उपयुक्त आहे.
बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई
ब्लेंंडर साफ करताना तुम्ही हाताने साफ करत बसण्यापेक्षा एकदा त्यात पाणी घाला आणि साबणाचे दोन थेंब घालून ब्लेंड करा. त्यामुळे ब्लेंडरला कोणताही घाण वास लागून राहात नाही आणि धुतलेही स्वच्छ जाते. तसंच तुम्हाला घासून जास्त मेहनत करावी लागत नाही.
काचेचे तुकडे झाले की झाडू अथवा इतर गोष्टींनी ते पूर्ण साफ होत नाहीत. कुठे ना कुठेतरी काचेचा कण राहतो आणि तो पुन्हा पायात भरण्याची भीती असते. तुम्हाला फुटलेली काच नीट साफ करायची असेल तर तुम्ही ब्रेडचा तुकडा व्यवस्थित खाली फिरवून घ्यावा. काचेचे अगदी बारीक बारीक तुकडेही यात जमा होतात आणि जमीन साफ होते.
मायक्रोव्हेवची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्यात पाणी घाला आणि लिक्विड सोप घालून काही वेळ तशीच ठेवा. यातील चिकटपणा काढून टाकण्यासाठी हा सोपा उपाय आहे. या भांड्यांचा चिकटपणा अशा तऱ्हेने सहज निघून जातो आणि काचेची असल्यास, फुटण्याचा धोकाही राहात नाही. तुम्ही पटकन साफ करून घेऊ शकता.
शेव्हिंग क्रिमने तुम्हाला पाण्याचे डाग काढता येतात. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. मात्र डाग असणाऱ्या ठिकाणी शेव्हिंग क्रिम 15 मिनिट्स लाऊन ठेवा आणि मग नंतर पुसून घ्या. पाण्याचे डाग निघून जातील. शेव्हिंग क्रिमदेखील टूथपेस्टप्रमाणेच काम करते.
फिनेल आणि इतर गोष्टींनी बऱ्याचदा टॉयलेट चमकत नाही. पण तुम्हाला टॉयलेट व्यवस्थित स्वच्छ करून हवं असेल तर तुम्ही इसेन्शियल ऑईलचा वापर करा. एका कपात बेकिंग सोडा घ्या. त्यात साधारण 15 थेंब इसेन्शियल ऑईल घालून मिक्स करा. त्यात 15 थेंब लिंबाचे अथवा संत्र्याचे इसेन्शियल ऑईल घाला. अर्धा तास हे मिश्रण ठेवा आणि नंतर टॉयलेट साफ करायला वापरा. तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल.
बऱ्याचदा सिंकमधून जेवणाचा वास येत राहातो. अशावेळी सिंक स्वच्छ ठेवायची असेल आणि चमकवायची असेल तर तुम्ही बेकिंग सोडा, त्यात लिंबाचा रस आणि बेसिल इसेन्शियल ऑईल मिक्स करून स्पंजच्या सहाय्याने सिंक स्वच्छ करा. तुम्हाला अजिबात दुर्गंध येणार नाही.
कपड्यांवरील डाग जेव्हा सुकतात तेव्हा ते काढण्यासाठी तुम्ही रेझरचा वापर करू शकता. हे डाग रेझरने काढून त्यानंतर कपडे धुतल्यास, डाग राहात नाहीत.
चिकट टाईल्स अथवा चिकट ओटा साफ करण्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे. तुम्ही साधारण दोन कप व्हिनेगर घ्या आणि त्यात दोन कप पाणी मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे च्या बाटलीत भरून घ्या. त्यानंतर काही वेळाने स्वयंपाकघरातील चिकट टाईल्सवर मारा आणि मायक्रो फायबर कपडा अथवा एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या मदतीने तुम्ही टाईल्स स्वच्छ करू शकता. तुम्हाला जास्त ताकद काढावी लागत नाही आणि स्वच्छताही लवकर होते.
तुमच्या फ्रिजमधून जर दुर्गंधी येत असेल आणि त्यावर नक्की काय उपाय करायचा हे कळत नसेल. फ्रिज स्वच्छ करूनही तुम्हाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा उपयोग करून यातून सुटका मिळवू शकता. तुम्ही एखाद्या लहान वाटीमध्ये बेकिंंग सोडा घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. काही दिवस झाल्यावर हा सोडा टाकून द्या आणि पुन्हा दुसऱ्या वाटीत नवा बेकिंग सोडा तुम्ही ठेवल्यास, फ्रिजला दुर्गंधी येणार नाही.
टाईल्सवर लागलेले डाग सहज निघत नाहीत. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट घेऊ शकता. ही पेस्ट त्यावर लावा आणि 10 - 15 मिनिट्स टाईल्सवर लावून ठेवा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने हे स्वच्छ करा. इतकं करूनही डाग स्वच्छ झाले नाहीत तर त्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. डाग नक्की साफ होतील.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा