Cruelty Free Makeup Brands In Marathi - विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअप प्रॉडक्टसाठी निवडा हे ब्रॅंड | POPxo

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

प्राण्यांवरील प्रेमापोटी आजकाल अनेकांनी शाकाहारी (Non Veg) अथवा विगन (Vegan) जीवनशैली आत्मसात केलेली आहे. कोणत्याही प्राण्यावर अत्याचार होऊ नये यासाठी विगन जीवनशैली निवडण्यात येते. विगन जीवनशैलीत फक्त आहाराच नाही तर प्राण्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूदेखील वापरण्यात येत नाही. म्हणूनच आपण आज विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप प्रॉडक्ट आणि त्यांच्या ब्रॅंड्स विषयी जाणून घेणार आहोत. विगन प्रॉडक्ट म्हणजे असे प्रॉडक्ट ज्यामध्ये प्राण्यांचे कोणतेही घटक जसे की मांस, चामडे अथवा दूध वापरण्यात आलेले नसते तर क्रुअल्टी फ्री प्रॉडक्ट म्हणजे जे तयार करण्यासाठी प्राण्यांवर त्यांची कोणतीही टेस्ट घेण्यात आलेली नसते. तुम्हीही विगन जीवनशैलीचे असाल तर हे विगन (Vegan) आणि क्रुअल्टी फ्री (Cruelty Free) मेकअप प्रॉडक्ट अवश्य वापरा.

Table of Contents

    डर्माब्लेंड (Dermablend)

    डर्माब्लेंड कंपनीची सर्व उत्पादने क्रुअल्टी फ्री आहेत. म्हणजेच ती तयार करण्यासाठी कोणत्याही प्राण्यांवर त्यांची टेस्ट घेतली जात नाही. शिवाय आता तर या कंपनीने संपूर्ण विगन उत्पादने देखील तयार केलेली आहेत. अनेक मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एक्पर्ट डर्माब्लेंडचे मेकअप प्रॉडक्ट वापरतात. विगन असण्यासोबत ही उत्पादने तुम्हाला परफेक्ट लुकदेखील देऊ शकतात. या कंपनीची एक बेस्ट सेटिंग पावडर तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे मात्र ती वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा या पावडचा वापर करण्यासाठी मेकअप ब्रशही याच कंपनीचा वापरा. कारण तो प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेला नाही. 

    डर्माब्लेंडची उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. 

    नो मेकअप लुकसाठी टिप्स (How To Get No Makeup Look In Marathi)

    डर्माब्लेंड - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    मिलानी (Milani)

    जर तुम्हाला मेकअपसाठी विगन आयलायनर, लिपस्टिक अथवा ब्लश हवं असेल तर मिलानी यासाठी एक उत्तम ब्रॅंड आहे. म्हणूनच मिलानीचे मेकअप प्रॉडक्ट निवडा आणि तुमचे प्राणी प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करा. मिलानीच्या काही उत्पादनांमध्ये प्राण्यांचा वापर करण्यात येतो. मात्र आम्ही तुमच्यासोबत मिलानीचं एक परफेक्ट विगन ब्लश शेअर करत आहोत. त्यामुळे या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचं डिस्ट्रिप्शन वाचून मगच ते खरेदी करा.

    मिलानीचे मेकअप प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. 

    मिलानी  - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    टू फेसड (Too Faced)

    टू फेस कंपनीचे मेकअप प्रॉडक्ट तुम्हाला मेकअप करताना फुल कव्हरेज देतात. म्हणूनच अनेक प्रोफेशनल मेकअपसाठी यांचा आवर्जून वापर केला जातो. विशेष म्हणजे हे मेकअप प्रॉडक्ट विगन आहेत. या कंपनीच्या कोणत्याही मेकअप प्रॉडक्टमध्ये प्राण्यांचा वापर केलेला नाही. एवंढच नाही या कंपनीचे मेकअप टूल्स आणि साहित्यही विगन आहे. 

    टू फेस्डची मेकअप उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

    Dupes मेकअप म्हणजे काय? (What Is Dupes Makeup In Marathi)

    टू फेसड - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    टार्टे (Tarte)

    टार्टे हा एक मेकअप प्रॉडक्टसाठी अगदी परफेक्ट ब्रॅंड आहे. शिवाय या कंपनीचे मेकअप प्रॉडक्ट शंभर टक्के विगन आहेत. या कंपनीमधून तुम्ही मेकअपसाठी प्रायमर, ब्लश, ब्यूटी ब्लेंडर आणि तुम्हाला हवं ते मेकअप उत्पादन खरेदी करू शकता. टार्टे शेप टेप कन्सिलरने तुम्हाला इतकं छान कव्हरेज मिळेल की त्यामुळे तुमचे टॅटूजदेखील झाकले जातील. आम्ही तुमच्यासोबत टार्टेचा एक लिप ग्लॉस शेअर करत आहोत.

    टार्टे ब्रॅंडच्या वस्तू तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. 

    टार्टे - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    अर्बन डिके (Urban Decay)

    अर्बन डिकेची काही उत्पादने अशीही आहेत की ज्यामध्ये मध आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या इतर वस्तूंचा वापर करण्यात येतो. मात्र त्यांची विगन प्रॉडक्टची एक खास रेंज आहे. विशेष म्हणजे ही मेकअप उत्पादने स्मज- प्रूफ आहेत. ज्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होत नाही. यासाठी अर्बन डिकेचं हे आयशॅडो पॅलेट अगदी परफेक्ट आहे. 

    अर्बन डिकेचे मेकअप प्रॉडक्ट या ठिकाणी खरेदी करा

    अर्बन डिके - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    वेट अॅंड वाईल्ड (Wet n Wild)

    वेट अॅंड वाईल्ड ची खासियत ही की यांची उत्पादने सहज उपलद्ध होतात. शिवाय ही उत्पादने इतर मेकअप प्रॉडक्टसच्या मानाने स्वस्तही असतात. या कंपनीची विगन उत्पादने तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आहेत. वेट अॅंड वाईल्डच्या कोणत्याही उत्पादनांची टेस्ट करण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जात नाही.

    वेट अॅंड वाईल्डची मेकअप उत्पादने तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतील.

    वेट अॅंड वाईल्ड - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    लश (Lush)

    जर तुम्हाला तुम्ही वापरत असलेली उत्पादने क्रुअल्टी फ्री असावी असं वाटत असेल तर लश कंपनीची विगन उत्पादने तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट आहेत. यावर देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्राण्याचे घटक अथवा टेस्टसाठी प्राण्यांचा वापर केला जात नाही. तुम्ही या कंपनीचे बाथ बॉम्ब, बॉडी स्क्रब, लिप बाम अथवा लोशन नक्कीच वापरू शकता. 

    लशचे होममेड प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

    लश - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    कॅट वोन डी (Kat Von D)

    कॅट वोन डीचे अनेक स्पेशल मेकअप आणि ब्युटी प्रॉडक्ट आहेत. हा एक नामांकीत ब्रॅड असून या कंपनीची उत्पादने तुम्हाला भारतातही सहज मिळतात. ग्राहकांच्या मागणीनुसार या कंपनीने विगन उत्पादनांची एक खास श्रेणी बाजारात आणलेली आहे. 

    कॅट वोन डीचे प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता

    कॅट वोन डी - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    कव्हर एफ एक्स (Cover FX)

    या ब्रॅंडचे फाऊंडेशन, कन्सिलर आणि प्रायमर फारच उत्तम आहेत. शिवाय ते खास विगन मेकअप प्रॉडक्ट असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडतील. या ब्रॅंडचे हे कलर करेक्टर तुम्ही वापरून पाहा. ज्यामुळे तुम्हाला एक नॅचरल लुक मिळेल. शिवाय या ब्रॅंडचे हे प्रायमर तुम्ही मेकअप आधी नक्कीच ट्राय करू शकता. 

    या मेकअप ब्रॅंडची उत्पादने तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतील

    कव्हर एफ एक्स - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    निक्स (NYX)

    निक्स हा सहज उपलब्ध होणारा आणि कमी खर्चिक मेकअप प्रॉडक्ट ब्रॅंड आहे. लॉरेल कंपनीच्या या ब्युटी ब्रॅंडमध्ये प्रॉडक्ट निर्माण करताना कोणत्याही प्राण्याची टेस्ट घेतली जात नाही. त्यामुळे हा एक क्रुअल्टी फ्री बॅंड आहे. या ब्रॅंडची काही उत्पादने विगनदेखील आहेत. 

    नायकावरून ऑनलाईन तुम्ही हे मेकअप साहित्य खरेदी करू शकता. 

    निक्स - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    दी बॉडी शॉप (The Body Shop)

    दी बॉडी शॉप या कंपनीची संपूर्ण मेकअप उत्पादने ही विगन आहेत. या बॅंडचे काही ब्युटी प्रॉडक्ट पूर्ण विगन नसले तरी त्यांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्राण्यांची टेस्ट घेतली जात नाही. त्यामुळे ती क्रुअल्टी फ्री तर नक्कीच आहेत.

    दी बॉडी शॉपची विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा

    दी बॉडी शॉप - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    स्मॅश बॉक्स (Smashbox)

    स्मॅश बॉक्सचे मेकअप उत्पादनांच्या टेस्टसाठी प्राण्यांचा वापर केला जात नसल्यामुळे ही उत्पादने क्रुअल्टी फ्री अथवा अॅनिमल फ्रेंडली नक्कीच आहेत. शिवाय या ब्रॅंडचे प्रायमर, फाऊंडेशन खास विगन ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्राण्यांच्या घटकांचा वापर केलेला नाही. 

    स्मॅश बॉक्सचे हे खास मेकअप प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता

    स्मॅश बॉक्स - Cruelty Free Makeup Brands In Marathi
    Instagram

    विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंडविषयी मनात असलेले प्रश्न (FAQs)

    विगन उत्पादने ही क्रुअल्टी फ्री असतात का ?

    क्रुअल्टी फ्री उत्पादने म्हणजे असे प्रॉडक्ट ज्यांच्या  टेस्ट प्राण्यांवर केल्या जात नाहीत. तर विगन उत्पादने म्हणजे ज्यांच्यामध्ये प्राण्यांचे घटक जसे की, मांस, कातडी अथवा दूध वापरले जात नाही. सहाजिकच कोणतेही विगन प्रॉडक्ट हे क्रुअल्टी फ्रीच असते. 

    विगन अथवा क्रुअल्टी फ्री उत्पादने कुठे मिळतात ?

    आजकाल विगन आणि क्रुअल्टी फ्री प्रॉडक्ट सहज उपलब्ध असतात. अनेक कंपन्यांनी त्यांची विगन आणि क्रुअल्टी फ्री उत्पादनांची श्रेणी बाजारात लॉंच केलेली आहे. त्यामुळे एखाद्या शॉपमधून अथवा ऑनलाईन तुम्ही ही उत्पादने खरेदी करू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशीच काही मेकअप उत्पादने शेअर केलेली आहेत. 

    एखादे प्रॉडक्ट क्रुअल्टी फ्री आहे हे कसे ओळखावे ?

    तुम्ही वापरत असलेले अथवा खरेदी करण्यासाठी निवडलेले उत्पादन क्रुअल्टी फ्री आहे हे ओळखण्यााठी त्याच्यावर पेटाचा बनी लोगो आहे का हे तपासा.