ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक

केक, पाव किंवा बेकिंगशी निगडीत काहीही पदार्थ बनवण्याची ज्यावेळी वेळ येते. त्यावेळी काही जिन्नस अगदी हमखास त्या पदार्थांमध्ये घालावे लागतात. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे तर बेकिंग करताना घालावेच लागतात. अगदी चिमुटभर लागणारी ही गोष्ट. काही खाद्यपदार्थांमध्ये फारच महत्वाची असते. पण अनेकांना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर एकच वाटते किंवा या दोघांपैकी एक कोणतीही पदार्थामध्ये घातली तरी चालेल असे वाटते.तुम्हालाही या बाबतीत असा गोंधळ असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये बराच फरक असतो. तो फरक कोणता ?आणि त्याचा वापर कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया. चला करुया सुरुवात

बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमधील फरक

जाणून घ्या काय आहे फरक

shutterstock

ADVERTISEMENT
  • बेकिंग सोडा अर्थात sodium bicarbonate हे एक प्रकारचे केमिकल आहे. ते वेगवेगळ्या स्वरुपात मिळते. त्यालाच NaHCO3  या केमिकल फॉर्म्युल्याच्या रुपातही ओळखले जाते. 
  • बेकिंग सोडा पावडर, खडे अशा दोन्ही स्वरुपात मिळतो. 
  • बेकिंग सोड्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. पाणी स्वच्छ करण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये, पेस्ट कंट्रोल, रंगामध्ये, स्वच्छतेसाठी आणि जेवणामध्येही याचा वापर केला जातो. त्यामुळे बेकिंग सोड्याचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. 
  • बेकिंग पावडर हे ड्राय केमिकल असून त्याचा उपयोग फक्त बेकिंग आणि काही खास पदार्थांमध्ये केला जातो.
  • बेकिंग पावडरमध्ये एखाद्या पदार्थ फुगवणे,त्याचा आकार वाढवणे आणि त्याला हल्का बनवण्याचे गुणधर्म असतात. 
    बेकिंग पावडर ही देखील बेकिंग सोड्याप्रमाणेच पांढऱ्या रंगाची पावडर असते. केक, ब्रेड यामध्ये घातल्यानंतर त्यांना छान जाळी येण्यासाठी त्यामध्ये बेकिंग पावडर घातली जाते. 
  • त्यामुळे दोघांच्या केमिकल्समध्ये बराच मोठा फरक आहे. बेकिंग पावडर बेकिंग सोड्याऐवजी वापरली तर चालू शकते. पण बेकिंग सोडा जास्त वापरुन चालत नाही. त्यामुळे पदार्थाची चव पूर्णत: बदलून जाते.

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

असा केला जातो बेकिंग पावडर आणि सोड्याचा वापर

असा करा वापर

Instagram

  • केक, ढोकळा, ब्रेड, पाव या सगळ्या पदार्थांमध्ये आपण किंचितसा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकतो. बेकिंग सोड्याचे प्रमाण अगदी कोणत्याही पदार्थात चिमूटभर करायला हवे. 
  • बेकिंग पावडर ही पदार्थ फुलवण्यासाठी चांगली असली तरी देखील त्याचाही अति वापर तुमचा संपूर्ण पदार्थ फसवू शकतो. कारण बेकिंग पावडरमुळे पदार्थ फसफसण्याची शक्यता अधिक असते.
  • बेकिंग सोड्याच्या जागी तुम्ही बेकिंग पावडर जास्त घालू शकता. पण बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा जास्त घालू नका. तुमचा पदार्थ हमखास कडू होईल. 
  • बेकिंग सोडा हा जास्त काळासाठी टिकतो. तर बेकिंग पावडर जास्त काळासाठी टिकत नाही. ती जास्तीत जास्त 3 ते  4 महिन्यांसाठी टिकते. 
  • बेकिंग सोडा घरात ठेवून खूप काळ झाला असेल तर बेकिंग सोडा चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी एका चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर घाला. व्हिनेगर घातल्यानंतर जर त्यामध्ये बुडबुडे आले तर बेकिंग सोडा चांगला आहे आणि तो रेसिपीमध्ये वापरण्यासाठी योग्य आहे. 

आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमधील फरक ओळखून त्याचा वापर योग्यपद्धतीने करा.

ADVERTISEMENT

अगदी दोन मिनिटात घरच्या घरी करा मस्त ‘मगकेक’

12 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT