DIY - घरीच बनवा माऊथवॉश आणि घ्या दातांची काळजी

DIY - घरीच बनवा माऊथवॉश आणि घ्या दातांची काळजी

ओरल हेल्थची काळजी घ्यायची असेल तर तोंडाची आणि दातांची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. तोंडाची स्वच्छता व्यवस्थित होणं खूपच महत्त्वाचे आहे. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी केवळ दात घासणे अर्थात ब्रश करणे इतकेच करून चालत नाही. ब्रश केल्याने दातावर असणारे अन्नाचे कण साफ होतात. पण तोंडाची पूर्ण स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला माऊथवॉशचीदेखील तितकीच गरज भासते. बऱ्याचदा घरामध्ये माऊथवॉश हे आपण बाजारातूनच आणतो. पण माऊथवॉश घरच्या घरीही आपल्याला बनवता येतो. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. आम्ही तुम्हाला या लेखातून घरीच माऊथवॉश बनवून त्याचा कसा वापर करायचा हे सांगणार आहोत. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे माऊथवॉश घरीच बनवू शकता. जाणून घेऊया कसे बनवायचे हे माऊथवॉश. तसंच यामध्ये कोणत्याही केमिकल्सचा वापर न केल्यामुळे हे माऊथवॉश नैसर्गिक असून वापरायलादेखील सुरक्षित असतात. 

बेकिंग सोड्याचा माऊथवॉश

Shutterstock

बेकिंग सोडा हा दातांच्या स्वच्छतेसाठी उत्तम उपाय आहे. माऊथवॉश बनविण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागत नाही. अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. गरम पाण्यात बेकिंग सोडा नीट मिसळून घ्या. आता ही पाणी घेऊन तुम्ही तुमचे दात साफ करा. हे तुमच्या तोंडाची पीएच लेव्हल व्यवस्थित राखण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी निघून जाते आणि बॅक्टेरियाची समस्याही दूर होते. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येईल. बाहेरच्या केमिकलयुक्त माऊथवॉशपेक्षा घरच्या घरी तयार केलेले हे माऊथवॉश तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरते. 

पिवळ्या दातांनी हैराण असलात तर करा 8 घरगुती उपाय

कडिलिंबाच्या पानाचे माऊथवॉश

Shutterstock

कडिलिंबाची पाने ही आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र माऊथवॉश म्हणूनही याचा चांगला वापर करून घेण्यात येऊ शकतो. सर्वात पहिले ही पानं स्वच्छ धुवा आणि मग पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा. तुम्ही रोज सकाळी जेव्हा ब्रश कराल तेव्हा या पाण्याचा माऊथवॉश म्हणून वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्यानंतर नक्कीच या पाण्याने चूळ भरा. असं केल्यास, तुम्हाला तोंडाला दुर्गंधीचा त्रास होणार नाही. 

हिरड्यांना सूज असेल तर जाणून घ्या हिरडी सुजणे घरगुती उपाय - Home Remedies For Swollen Gums

टी ट्री ऑईल माऊथवॉश

Shutterstock

टी ट्री ऑईलचाही चांगला उपयोग माऊथवॉश म्हणून तुम्ही करून घेऊ शकता. पाण्यामध्ये टी ट्री ऑईलचे काही थेंब घाला. या पाण्यामुळे हिरड्या निरोगी राहतात आणि तोंडाचीदेखील चांगली स्वच्छता राहते. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.

तोंडाच्या दुर्गंधीपासून अशी मिळवा सुटका (How to get rid of bad breath In Marathi)

मीठाच्या पाण्याचा माऊथवॉश

Shutterstock

कोमट पाण्यात मीठ घालून रोज ब्रश केल्यावर चूळ भरल्यास, हिरड्यांवर किटाणूंचे संक्रमण होत नाही. तसंच हिरड्यांना सूज येत असल्यास, तुमचा त्रास कमी होतो. तसंच तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळते. त्यामुळे बाजारातील महाग माऊथवॉश वापरण्यापेक्षा हे सोप्या पद्धतीने माऊथवॉश बनवून तुम्ही घरीच वापरल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि कोणताही दुष्परिणामही होणार नाही. तसंच तुम्हाला यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ नसल्याने अगदी शुद्ध माऊथवॉश मिळेल. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा