त्वचेसाठी उपयुक्त आहे भेंडी,असा तयार करा होममेड फेसपॅक

त्वचेसाठी उपयुक्त आहे भेंडी,असा तयार करा होममेड फेसपॅक

प्रत्येकीला आपली त्वचा सुंदर आणि नितळ असावी असं वाटत असतं. धुळ, माती, प्रदूषण, वाढतं वय, चिंताकाळजी आणि सतत चेहऱ्यावर मेकअप केल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत असतं. खरंतर त्वचेची निगा राखण्यासाठी फार काही करण्याची अथवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंटची गरज असतेच असं नाही. अगदी तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या वस्तू आणि पदार्थ वापरून तुम्ही दररोज तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी आज आम्ही तुमच्यासोबत भेंडी (Okra)चा होममेड फेसपॅक शेअर करत आहोत. कारण भेंडीची भाजी शरीरासाठी जितकी उपयुक्त आहे तितकाच हा भेंडीचा फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.

भेंडी त्वचेसाठी का आहे फायदेशीर

भेंडीमध्ये असलेले पोषक घटक तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त असतात. भेंडीमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि इनफ्लैमटरी आणि रिहायड्रेटिंग करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. भेंडीमधील व्हिटॅमिन सी आणि ईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी होतात आणि तुम्ही चिरतरूण राहता. त्वचेची निगा राखण्यासाठी भेंडीचा वापर नियमित करणं गरजेचं आहे. भेंडीमुळे तुमच्या चेहऱ्यावरी पिंपल्स कमी होऊ शकतात, चेहऱ्यावर असलेले डाग, व्रण आणि काळसरपणा कमी करण्यासाठी भेंडीचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. कोरडी त्वचा यामुळे हायड्रेट राहते. त्वचा मॉईश्चराईझ झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. एवढंच नाही तर यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार होते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत भेंडीचा फेसपॅक तयार करण्याची एक कृती शेअर करत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. हा  फेसपॅक तयार करा आणि तुम्हाला यामुळे काय फायदा झाला हे आमच्यासोबत कंमेट बॉक्समध्ये शेअर करा. 

Shutterstock

भेंडीचा फेसपॅक कसा तयार कराल -

भेंडीचा फेसपॅक तयार करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स -

 • दोन कप पाणी एका भांड्यात घ्या आणि त्यामध्ये भेंडी चिरून टाका
 • पंधरा ते वीस मिनीटे पाणी मंद गॅसवर उकळू द्या
 • पाण्याचे भांडे गॅस बंद करून थोडावेळ थंड करा
 • एका हवाबंद भांड्यामध्ये हे मिक्षण रात्रभर ठेवून द्या
 • सकाळी त्या भांड्यामध्ये घट्ट आणि चिकट मिश्रण तयार झालेले असेल
 • हे मिश्रण एका वाटीत काढून घ्या.
 • मिक्सरमध्ये हे मिश्रण आणि काही थेंब जोजोबा ऑईल टाकून वाटून घ्या
 • मिश्रण वाटीत काढून घ्या कारण आता तुमचा फेसपॅक वापरण्यासाठी तयार झाला

भेंडीचा फेसपॅक कसा वापराल -

फेसपॅक लावण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा-

 • फेसपॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या
 • चेहरा टॉवेलने  कोरडा करा
 • भेंडीचा फेसपॅक चेहऱ्यावर एकसमान लावा
 • वीस मिनीटांनी फेसपॅक सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा
 • या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग कमी होतील. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा. 
Shutterstock

भेंडीचा वापर फेसपॅकप्रमाणेच केसांसाठीदेखील करता येतो.  कारण भेंडीमुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते आणि कोंडा कमी होतो. यासाठी कोमट पाण्यात भेंडी चिरून टाका आणि ते पाणी थंड करा. थंड झालेल्या या पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि शॅंपूनंतर एखाद्या कंडिशनरप्रमाणे याचा वापर करा. तुम्ही भेंडी, मध आणि एखादे नैसर्गिक तेल एकत्र करून केसांसाठी हेअर मास्कदेखील तयार करू शकता.