झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे बऱ्याच जणांना रात्री झोप न येण्याची समस्या असते. यामुळे तुमचा दुसरा दिवसही अतिशय चिडचिडा जातो. बऱ्याचदा काही जण इतके कमी झोपतात की,  याचा परिणाम त्यांच्या मेंदूवरही होऊ लागतो. यामुळे इन्सॉन्मिया हा आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासते. पण तुम्ही यावर घरच्या घरी इलाज करून मात करू शकता. वास्तविक रात्री लवकर झोपणं आवश्यक आहे. रात्री झोप येत नसेल तर काही सोपे उपाय करण्याची गरज आहे. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास टिप्स आणल्या आहेत. तुम्ही याचा नक्की वापर करून पाहा. तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करा आणि आम्हाला सांगा याचा चांगला परिणाम होतोय की नाही. आमच्यानुसार तरी या गोष्टींचा त्वरीत आणि  चांगला परिणाम व्हायलाच हवा. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या सोपे उपाय. 

1. तापमान कमी ठेवा

तुम्हाला हे वाचून थोडं बुचकळ्यात पडायला नक्की झालं असेल. पण तुम्ही जर रोज नेहमीपेक्षा एक डिग्री तापमानात झोपलात तर तुम्हाला लवकर झोप येते. यामागील विज्ञान असं आहे की, झोपताना शरीर हे थंड असते आणि उठताना गरम असते. त्यामुळे तुम्हाला जर जास्त उष्णता जाणवू लागली तर झोप येणे शक्य नाही. त्यामुळेच आपल्या थंडीच्या दिवसात चांगली झोप लागते. म्हणून तुम्ही झोपताना थंड वारा जाणवेल अशी व्यवस्था करा.

2. पायांची काळजी घ्या

Shutterstock

तुम्ही रूम टेंपरेचर व्यवस्थित राखणं जसं गरजेचं आहे तसंच तुमच्या पायांची विशेषतः तुमच्या तळव्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पायाचे तळवे थंड असले तर झोप लागत नाही. त्यामुळे नेहमी पायांच्या तळव्यावर चादर घेऊन झोपावे. 

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

3. करा श्वासाचा व्यायाम

Shutterstsock

मानसिक शांततेसाठी तुम्ही श्वासाचा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुम्ही याचं तंत्र जाणून घेतलं तर तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल. हे श्वास नियंत्रणात आणण्याचं तंत्र आहे जे योगाच्या आधारे बनविण्यात आले आहे. 

कसा करावा व्यायाम 

  • सर्वात पहिले आपल्या जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या मागे ठेवा 
  • आता  जोरात तोंडाने श्वास सोडा जेणेकरून आवाज येईल 
  • आता तोंड बंद करा आणि नाकाने श्वास घेऊन मनात 4 अंक मोजा 
  • आता आपला श्वास होल्ड करून 7 पर्यंत अंक मोजा 
  • मग आपले तोंड उघडून  श्वास सोडा आणि मनात 8 पर्यंत अंक मोजा 
  • हे टेक्निक तुम्ही तीन वेळा वापरा आणि तुमचं शरीर रिलॅक्स करा 

टीप - तुम्हाला श्वासासंबंधित काही समस्या असतील तर हे तंत्र वापरू नका. 

4. अंधाराशी करा मैत्री

giphy

शरीराला झोपताना लाईटपासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे झोपताना तुम्हाला अंधाराशी मैत्री करायला हवी. दिवसभर तुम्ही तुमच्या खोलीत बसून अशता तेव्हा तुम्हाला योग्य व्हेंटिलेशन आणि नैसर्गिक प्रकाश  मिळतो त्यामुळे रात्री अंधारात तुम्हाला चांगली आणि पटकन झोप येते. 

5. रात्री जाग आल्यास फोन अथवा घड्याळ पाहू नका

बऱ्याचदा लोकांना रात्री उठण्याची सवय असते. काहींना तहान लागते तर काहींना लघ्वीला जाण्यासाठी उठावं लागतं. अशावेळी बऱ्याच जणांना घड्याळ बघायची अथवा फोन पाहायचीही सवय असते. पण ही सवय सोडून द्या. कारण असं केल्याने डोळ्यावरील झोप उडून जाते. त्यामुळे पुन्हा लवकर झोप येत नाही आणि मग सकाळी डोकं दुखतं. त्यामुळे जाग आल्यास तुम्ही ज्या स्थितीत आहात त्याच स्थितीत झोपायचा पुन्हा प्रयत्न करा.

6. साधारण 6 तास आधी कॉफी पिऊ नका

बऱ्याच जणांना कॉफी प्यायची सवय असते. पण तुम्ही झोपण्यापूर्वी साधारण सहा तास आधी कॉफी न पिणं योग्य आहे. कारण कॉफीने झोप नाहीशी होते. संध्याकाळी 5 नंतर कॉफी पिऊ नका.  त्याचा झोपेवर परिणाम  होतो. 

वारंवार झोप येत असेल तर तपासून घ्या, झाला नाही ना ‘हा’ आजार

7. कार्ब खायचे असल्यास, 4 तासांचा वेळ जाऊ द्यावा

तुम्ही रात्री हेव्ही डिनर करणार असलात तर किमान तुम्ही 8 वाजता जेवावे. जेवण पचविण्यासाठी  किमान योग्य वेळ मिळतो. अन्यथा पचनसंबंधित समस्या उद्धवतात आणि रात्री झोप लागत नाही. घशात जळजळ होत राहते. त्यामुळे कार्ब खायचे असल्यास, किमान चार तासांचा कालावधी मध्ये असावा. 

8. अरोमा थेरपी येईल कामी

इसेन्शियल ऑईलचा वापर यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो. इसेन्शियल ऑईल्सचा सुगंध असो वा अरोमा थेरपी कँडल्स असो यामुळे तुम्हाला झोप येते. शरीराला रिलॅक्स करून आराम देण्याचं काम हे करतं. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता.

9. नकारात्मक विचार येत असतील तर…

Shutterstock

ही एक मानसशास्त्रीय ट्रिक आहे, तुम्हाला रात्री झोपताना जर नकारात्मक विचार येत असतील तर तुम्ही झोपण्यापूर्वी लिखाणाची सवय लाऊन घ्या. तुम्हाला आलेल्या तणावाबद्दल तुम्ही लिहिलं तर तुमचा ताण कमी होईल. त्यामुळे तुम्हाला झोप पटकन येईल. 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

10. झोपण्याची पद्धत बदला

तुम्ही जर नेहमी एकाच पद्धतीने झोपत असलात तर तुम्ही तुमची  झोपण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. तसंच तुम्ही तुमची उशीदेखील बदलून पाहा. तुम्हाला झोप लवकर लागेल. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा