घरातील साफसफाई आपण नेहमीच करत असतो. आपलं नेहमीच लक्ष असतं. त्यातही सर्वात जास्त लक्ष असतं ते स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरातील भांडी आणि ओटा या नेहमीच आपण साफ ठेवतो. पण बऱ्याचदा स्वयंपाकघरातील टाईल्स या तेल आणि तुपामुळे चिकट होतात आणि त्याकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा केवळ सणासुदीलाच स्वयंपाकघरातील चिकट टाईल्सची साफसफाई होते आणि त्यावेळी अक्षरशः हाल होतात. पण तुम्हाला स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकवायच्या असतील तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. बऱ्याचदा जेवण बनवताना तेल, भाजी आणि मलाल्याचे हात नकळत टाईल्सवर लागतात आणि डाग पडतात. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघराची चमक त्यामुळे कमी होते. पण तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर सुंदर दिसायला हवं असेल तर तुम्ही काही टिप्स जाणून घ्यायलाच हव्यात. कमी मेहनत करून आपलं स्वयंपाकघर कसं चमकवायचं आणि या चिकट टाईल्स कशा स्वच्छ करायच्या जाणून घेऊया.
चिकट टाईल्स अथवा चिकट ओटा साफ करण्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे. तुम्ही साधारण दोन कप व्हिनेगर घ्या आणि त्यात दोन कप पाणी मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे च्या बाटलीत भरून घ्या. त्यानंतर काही वेळाने स्वयंपाकघरातील चिकट टाईल्सवर मारा आणि मायक्रो फायबर कपडा अथवा एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या मदतीने तुम्ही टाईल्स स्वच्छ करू शकता. तुम्हाला जास्त ताकद काढावी लागत नाही आणि स्वच्छताही लवकर होते.
अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी
तुम्हाला स्वयंपाकघरातील चिकट टाईल्सच्या घाणीने कंटाळा आला असेल तर त्यासाठी बीच हा उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला समान प्रमाणात ब्लीच आणि पाणी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये टाईल्सवर कपड्याच्या मदतीने हे मिश्रण फिरवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा या मिश्रणाने साफसफाई करणार असाल तेव्हा हातात हातमोजे घाला. अन्यथा ब्लीचमुळे तुमच्या हाताची सालपटं जाऊ शकतात. तसंच पुसून झाल्यावर कोरड्या कपड्याने पुन्हा एकदा टाईल्स पुसून घ्या. तुम्हाला ब्लीचमुळे लवकर चांगला परिणाम दिसून येईल. टाईल्सवर कोणत्याही प्रकारचे डाग ब्लीचमुळे राहत नाही. त्यामुळेच तुम्ही याचा वापर करणे उत्तम आहे.
स्वयंपाकघरातील टाईल्सवर जर धुळीचा थर जमला असेल आणि नक्की कसा स्वच्छ करायचा हे कळत नसेल तर तुम्ही बेकिंग सोड्याचा उपयोग करू शकता. बेकिंग सोड्याची पेस्ट तुम्ही बनवून घ्या. बेकिंग सोडा आणि पाणी घालून याची जाडसर पेस्ट बनवा. जिथे डाग आहेत अथवा काळेपणा आहे तिथे तुम्ही ही पेस्ट लावा आणि साधारण 15 मिनिट्स तुम्ही हे असंच राहू द्या. त्यानंतर ओल्या कपड्याने तुम्ही ती जागा स्वच्छ करू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही टूथब्रश अथवा ब्रशचाही वापर करू शकता. तुम्हाला या उपयाने नक्की स्वच्छ आणि सुंदर टाईल्स पुन्हा बघायला मिळतील. याचा परिणाम तुम्हाला दिसायला हवा असेल तर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणेच व्यवस्थित स्टेप्सनुसार बेकिंग सोड्याची पेस्ट वापरा. लगेच स्वच्छता केल्यास, तुम्हाला चांगला परिणाम दिसणार नाही. त्यामुळे डाग जाण्यासाठी काही वेळ जाऊ द्या.
बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई