घरात येणाऱ्या उभ्या गौरींना साडी नेसवायची पद्धत तुम्हाला माहीत आहे का

घरात येणाऱ्या उभ्या गौरींना साडी नेसवायची पद्धत तुम्हाला माहीत आहे का

अवघ्या जगाचा आवडता सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पा आणि गौराईच्या आगमनाची जोरदार तयारी प्रत्येकाकडे सुरू झाली आहे. प्रत्येकाच्या घरी हा सण साजरा केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी येणाऱ्या गौराई या विविध रूपात असतात. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी येतात तर काही ठिकाणी गौरी उभ्या असतात तर काही जणांच्या घरात मुखवट्याच्या तांदूळ आणि गव्हात बसणाऱ्या गौरी असतात. या गौरी येणार म्हटल्यावर त्यांना नटवण्याचं आणि साडी नेसवण्याचं काम आलं. काही जणांना मात्र या उभ्या गौरींना कशी साडी नेसवायची ही पद्धत माहीत नसते.  तीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरात गौरी तीन दिवस असल्या तरीही त्यांच्या येण्याने एक आगळं वेगळं रूपच येतं. शांत सुंदर आणि आखीव रेखीव अशा गौरी खूपच मनमोहक असतात आणि त्यांना साडी नेसवून आणि पूजन करून तर अधिक प्रसन्नता वाटते. गौरीला साडी नेसवून तिला दागिने घालून तयार करणं हे सर्वात आवडतं आणि कलात्मक काम आहे. जाणून घेऊया कशी नेसवायची गौरीला साडी. 

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

गौरींना साडी नेसवायची पद्धत

सर्वात आधी घरातील गौरींच्या मूर्ती उभ्या करून घ्याव्या लागतात. आधीच्या काळात डब्यांवर डबा ठेऊन मग त्यावर एक तांब्या ठेऊन त्यात गौरीचा मुखवटा ठेवण्यात येत असे.आजही काही ठिकाणी ही पद्धत वापरण्यात येते. धान्याच्या कोठ्यांमध्ये अशी गौर बऱ्याच ठिकाणी असते. तर काही ठिकाणी गौरीचे खास सांगाडे  तयार करून घेण्यात येतात. तयार गौरी असतील तर काहीच अडचण येत नाही. मात्र इतर काही प्रकारांनी गौर उभी करायची असेल तर मानेभोवती उलटा हँगर बांधून घ्यावा लागतो. म्हणजेच अडकवायची बाजू मागे ठेवा  आणि खांदे तयार करून घ्या. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे गौरीला साडी नेसवणं. प्रत्येकाकडे साडी नेसवायची वेगळी पद्धत असते. मात्र बऱ्याच ठिकाणी पाचवारी साडीच नेसवली जाते. 

 • गौरीला ब्लाऊज तुम्ही रंगाने काढला असेल तर ब्लाऊजची गरज भासत नाही. मात्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही ओढणी अथवा साडीचा वापर ब्लाऊज म्हणून करू शकता
 • गौरीचा मुखवटा बसविण्यासाठी स्टँडचा वापर करा
 • साडीच्या निऱ्या करून तुम्ही अर्ध्यामध्ये दुमडा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्या
 • निऱ्या आधी काढल्यामुळे गौरीला साडी नेसवणं सोपं जातं
 • निऱ्या काढून झाल्यावर तुम्ही आधी कंबरेखाली नेसून घ्या 
 • त्यानंतर स्टॅँडवर मुखवटा नीट बसवा 
 • त्यानंतर पदर काढून तो खांद्यावर टाका
 • तांब्यामध्ये मुखवटे असतील तर तुम्ही केवळ ब्लाऊज आणि छोट्या ओढणीचा वापर करूनही गौरीला साडीप्रमाणे नेसवण्याचे काम करू शकता.
 • बसलेल्या गौरींना साडी नेसवायची असेल तर थोड्या लहान स्टँडचा वापर करून गौरींना बसवा
 • गौरीचे पाय हे लेगिंग्जमध्ये घालून तारेने बांधून घ्या. म्हणजे साडी नेसवणे सोपे होते

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

टीप 

 • गौरींसाठी शक्यतो सहावारी साडी वापरावी. नऊवारी हौशीसाठी वापरायला हरकत नाही. पण बऱ्याचदा त्याने जास्त थकायला होतं. सहावारी साडी नेसवायला जड नसते आणि सोप्या पद्धतीने नेसवता येते
 • मांडणी आधीच तयार करून घ्यावी. जेणेकरून गौरीचे मुखवटे बसवणे सोपं होतं
 • मांडणीला व्यवस्थित साडी गुंडाळून घेतल्यास, गौरीच्या मुखवट्यावर साडी नीट चापूनचोपन बसवता येते
 • मांडणी टेबलला खिळ्यांनी ठोकून घ्या म्हणजे धक्का लागून पडण्याचा धोका टळतो 

गौरीपुजनात नववधूंसाठी का महत्त्वाचा असतो 'ओवसा'

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा