प्रत्येकाच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या अनेकांना असतात. काही समस्या काही ट्रिटमेंट्सनी बऱ्या होतात. पण काही समस्या पटकन जात नाही किंवा ते तुमच्या त्वचेचाच एक भाग होऊन जातात. अशीच एक त्वचेची समस्या म्हणजे ‘वांग’ अनेकांना चेहऱ्यावर बारीकबारीक तिळाप्रमाणे डाग असतात. याला Pigmentation, freckles, melasma असे देखील म्हटले जाते. त्वचेशी निगडीत असलेला हा असा त्रास आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतीही दुखापत होत नाही. पण ते डाग चेहऱ्यावर दिसत राहतात. तुमच्या त्वचेखाली असलेले मेलनिन म्हणजेच रंग द्रव्य कारणीभूत असतात. पण सूर्याच्या अतिनील किरणांमुळे हे डाग अधिक गडद होत जातात. कितीही ट्रिटमेंट घेतली तरी हे डाग पूर्णपणे जातील अशी खात्री नसते. चेहऱ्यावर वांग असतील तर अशा त्वचेने मेकअप करताना फार विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
Table of Contents
- कसा करावा वांगसाठी मेकअप – How To Makeup On Freckles In Marathi
- वांग असल्यास बेसची निवड (Base Selection)
- वांग असल्यास कन्सिलरचा वापर
- वांग असल्यास डोळ्यांचा मेकअप करताना
- वांग असल्यास गालांना करा ब्लश (Blush Use)
- वांग असल्यास आयब्रोज करा ठळक
- वांग असल्यास लिपस्टिकची शेड निवडताना (Use Of Lipstick)
- FAQ’s – चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप
कसा करावा वांगसाठी मेकअप – How To Makeup On Freckles In Marathi
वांगसाठी मेकअप करताना काही खास गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. अगदी बेसची निवड करण्यापासून ते संपूर्ण मेकअप करेपर्यंत तो कसा करायचा हे तुम्हाला माहीत असायला हवे. त्यासाठीच ही उपयुक्त अशी माहिती.
वांग असल्यास बेसची निवड (Base Selection)
कोणत्याही मेकअपचा बेस हा फाऊंडेशन असते. त्याची योग्य निवड होणे फारच जास्त गरजेचे असते. जर तुमच्या त्वचेवर वांग असतील तर तुम्ही मेकअप करताना अधिक काळजी घ्यावी लागते. गुळगुळीत आणि कोमल त्वचेसाठी आपण भिन्न फाउंडेशन उत्पादने वापरू शकता.त्वचेवर वांग जास्त असतील तर तुम्ही फुल कव्हरेज असलेले फाऊंडेशन निवडा. फुल कव्हरेज आणि जास्त काळ टिकणारे फाऊंडेशन हे तुमच्यासाठी उत्तम असते. जर तुमचे डाग थोडे जास्त गडद असतील तर तुम्ही तुमचा रंग आणि वांगचा रंग याचा विचार करुन त्याची निवड करा. तुमच्या चेहऱ्यावर वांग आहे म्हणून त्यावर फिकट रंगाचे फाऊंडेशन किंवा दोन ते तीन लेयर फाऊंडेशन लावले तर ते झाकले जातील असे नाही. उलट तुमची त्वचा त्यामुळे जाड थर असल्यासारखी वाटेल. त्यामुळे फाऊंडेशन लावताना तुम्ही काय काळजी घ्यावी ते पाहुया.
सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स
असा लावा बेस:
- चेहरा स्वच्छ करुन कोरडा करुन घ्या. तुमच्या थेट त्वचेला किंवा पोअर्समध्ये फाऊंडेशन जाऊ नये यासाठी अगदी लाईट प्राईमर लावा.
- ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त वांग आहे.त्या ठिकाणी फाऊंडेशनने ठिपके काढून ते ब्लेंडरच्या मदतीने फाऊंडेशन चेहऱ्यावर ब्लेंड करुन घ्या.
- जर तुमचे वांग झाकले जात नसतील तर तुम्ही पुन्हा फाऊंडेशनचा थर लावू नका. तुमचे फाऊंडेशन चुकले आहे का ते बघा.
वांग असल्यास कन्सिलरचा वापर
मेकअपमध्ये कन्सिलर हे फार महत्वाचे असते. तुमच्या चेहऱ्यावरील डाग फाऊंडेशनने लपले नाही तर कन्सिलरने लपवले जाऊ शकते. कन्सिलरमध्येही वेगवेगळे शेड्स मिळतात. फाऊंडेशनच्या निवडीप्रमाणेच तुम्हाला याचीही निवड करावी लागते. तुम्ही खूप लाईट कन्सिलरचा उपयोग करु नका. कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कन्सीलर चेहर्यावरील लालसरपणा (रेडनेस) कमी करण्यास मदत करते.कन्सिलरमध्येही वेगवेगळ्या शेड्स असतात. तुम्हाला तुमची योग्य शेड्स निवडणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही कन्सिलरचा रंग निवडताना मेकअप एक्सपर्टची मदत घेतली तर तुम्हाला त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. कारण जर तुम्ही कन्सिलर लावत असाल तर तुमच्या वांगना त्याचा त्रासही व्हायला नको याचीही काळजी घेणे गरजेचे असते.
असे लावा कन्सिलर:
- तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहेत तिथे कन्सिलर लावले जाते. चेहऱ्यावर वांग असतील तर तुम्हाला तुमचे डोळे, ओठांच्या बाजूचा परीसर, पिंपल्सचे डाग यासोबतच तुम्हाला वांगच्या डागांचाही विचार करावा लागतो.
- कन्सिलर घेऊन तुम्ही तुमच्या वांगच्या ठिकाणी अगदी थोडेसे लावून डॅब करा.
- कन्सिलर हे फाऊंडेशनच्या आधी लावले जाते. कन्सिलर लावल्यानंतर त्वचेवर ते अगदी व्यवस्थित डॅब करा आणि मग त्यानंतर फाऊंडेशन लावून तुम्ही चेहरा इवन टोन करा.
सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट (Best Night Creams In India In Marathi)
वांग असल्यास डोळ्यांचा मेकअप करताना
वांग असलेल्या त्वचेवर डोळ्यांचा मेकअप करताना तुम्हाला थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. कारण यामध्ये डोळ्यांचा मेकअप अधिक केला तर त्याकडे जास्त लक्ष जात नाही.
डोळ्यांचा मेकअप करताना
- डोळ्याला चांगला बेस लावा. त्यावर तुम्हाला हवे असलेले आयशॅडो आणि लायनर लावा.
- खूप लाऊड मेकअप करु नका. कारण तो जास्त चांगला दिसणार नाही.
वांग असल्यास गालांना करा ब्लश (Blush Use)
ब्लशरचा उपयोगही अशा त्वचेवर फार महत्वाचा असतो. मेकअपला अधिक उठाव आणण्याचे कामही ब्लश करतो. तुमच्या चेहऱ्यावर वांग असतील तर तुम्ही ब्लशचा वापर अगदी हमखास करायला हवा. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसतो आणि वांग तुमच्या चेहऱ्यावर उठूनही दिसत नाही. तुमच्या त्वचेवर ब्लशर निवडताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागत नाही. तुम्ही अगदी कोणतेही ब्लशर वापरु शकता. त्यामुळे तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही.
असे लावा ब्लशर:
- तुमच्या चेहऱ्यावर कितीही डाग असले तरी तुम्हाला ब्लशर लावताना फार काळजी करण्याची गरज नाही.
- तुम्ही तुमच्या आवडीचा रंग लावू शकता. जर तुमच्या गालांवर वांग असतील तर ती ब्लशरमुळे लपूनही जातील. तुमच्या स्किनटोनला उठून दिसेल अशा ब्लशरची निवड करा. म्हणजे तुमचा चेहरा अधिक चांगला दिसेल.
वांग असल्यास आयब्रोज करा ठळक
हल्लीच्या मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल फार महत्वाची असते. कारण तुमच्या डोळ्यांचा मेकअप चांगला असेल तर तुमचा मेकअप फार खुलून दिसतो. त्यामुळे तुम्ही आयब्रो पेन्सिलचा अगदी हमखास उपयोग करा.
असा करा आयब्रो पेन्सिलचा वापर :
- आयब्रो पेन्सिल वापरण्याची विशिष्ट अशी पद्धत नाही. वांग असलेल्या त्वचेवर कसे लावावे. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फार विचार करण्याची गरज नाही.
- तुमच्या केसाच्या रंगानुसार तुम्ही आयब्रो पॅलेटची निवड करा. म्हणजे तुमचा चेहरा खुलून दिसेल.
वांग असल्यास लिपस्टिकची शेड निवडताना (Use Of Lipstick)
लिपस्टिकचे कामच असते तुमचा मेकअप उठून दिसवणे. तुमच्या चेहऱ्यावर काहीही असले तरी त्याच्याकडे लक्ष न जाता तुमच्या ओठांवर जाते. त्यामुळे तुम्ही लिपस्टिकचा वापरही अगदी बिनधास्त करु शकता. लिपस्टिकचा शेड निवडणे हे प्रत्येकासाठीच कसरतीचे काम असते. जर तुम्हाला योग्य शेड निवडणे कठीण जात असेल तर तुम्ही एक्सपर्टची मदत घेऊ शकता.
- तुमची लिपस्टिक अधिक काळासाठी टिकावी असे वाटत असेल तर तुम्ही लाँग लास्टिंग लिपस्टिकची निवड करा.
- तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी मेकअप करत आहात याचा विचार करुन लिपस्टिकची शेड निवडा. रंग गडद असेल तरी तुम्हाला तो रंग चांगला दिसू शकतो.
FAQ’s – चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप
प्रश्न: वांग असलेली त्वचा एकसारखी दिसू शकते का?
उत्तर : मेकअपच्या साहाय्याने तुमची त्वचा तुम्हाला एकसारखी दिसण्यास मदत होऊ शकते. चेहऱ्यावर येणारे वांग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचे वांग हे फिकट रंगाचे असतात. ते मेकअपने पटकन झाकता येतात. पण काही वांग हे थोडे गडद असतात. जर त्वचेचा रंग उजळ आणि खूप काळे वांग असतील तर ते लपवताना खूप कसरत करावी लागते. पण फार काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही थोड्याशा मेकअप टेक्निक शिकलात की, तुमची त्वचाही एकसारखी आणि सुंदर दिसू शकते.
प्रश्न : वांग असलेल्या त्वचेवर मेकअप चांगला बसतो का?
उत्तर : हो , मेकअप असलेल्या त्वचेवर मेकअप बसणार नाही असे अजिबात नाही. हल्लीच्या काळात खूप चांगले फाऊंडेशन मिळतात. जे तुमच्या त्वचेशी समरुप होतात इतकेच नाही तर ते तुमच्या त्वचेवरील बारीक बारीक गोष्टी लपवण्याचे काम करतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मेकअप केला तर तो चांगला बसतो.
प्रश्न: वांग घालवता येतात का?
उत्तर : हल्ली वांग घालवण्यासाठी अनेक फेस ट्रिटमेंट उपलब्ध आहेत. त्यामुळे वांग कमी होण्यास मदत मिळते. पण त्यासाठी बराच खर्च आणि सातत्य हवे तरच तो त्रास कमी होतो. जर तुम्हाला वांग घालवायचे असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.
प्रश्न : चेहऱ्यावरील वांग लपवण्यासाठी चांगले फाऊंडेशन कोणते?
उत्तर: चेहऱ्यावरील वांगच नाही पण चेहऱ्यावर असलेले व्रण लपवण्यासाठीही बाजारात वेगवेगळे फाऊंडेशन मिळतात. अगदी तुमच्या बजेटनुसार फाऊंडेशन मिळू शकतील. यामध्ये प्रामुख्याने NYX, Clinique Super Balanced Makeup Foundation, Lakme Absolute, Cosmetics Flawless Finish Foundation असे काही चांगल
प्रश्न: वांग न लपवता मेकअप करता येऊ शकतो का?
उत्तर : अर्थात, तुमच्या चेहऱ्यावरील वांग हे सौंदर्यास अडथळा आणत नसेल तर तुम्ही अगदी आरामात इतरांप्रमाणे मेकअप करु शकता. पण काहींना चेहऱ्यावर असलेले हे वांग आवडत नाही. त्यांचा आत्मविश्वास त्यामुळे कमी होते म्हणून ते वेगळ्या पद्धतीचा मेकअप करुन चेहऱ्यावरील वांग लपवतात. पण तुम्हाला त्याचा काहीही त्रास नसेल तर तुम्ही साधे फाऊंडेशन, कन्सिलर वापरुन मेकअप करु शकता. तुम्ही कसेही असलात तरी सुंदर आहात, इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कशाचीही गरज नाही.
आता तुमच्या चेहऱ्यावर वांग असतील तर या काही सोप्या गोष्टी मेकअप करताना लक्षात ठेवा.