चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप (Face Makeup For Freckles In Marathi)

चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप (Face Makeup For Freckles In Marathi)

प्रत्येकाच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या अनेकांना असतात. काही समस्या काही ट्रिटमेंट्सनी बऱ्या होतात. पण काही समस्या पटकन जात नाही किंवा ते तुमच्या त्वचेचाच एक भाग होऊन जातात. अशीच एक त्वचेची समस्या म्हणजे ‘वांग’ अनेकांना चेहऱ्यावर बारीकबारीक तिळाप्रमाणे डाग असतात. याला Pigmentation, freckles, melasma असे देखील म्हटले जाते. त्वचेशी निगडीत असलेला हा असा त्रास आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतीही दुखापत होत नाही. पण ते डाग चेहऱ्यावर दिसत राहतात. जसे काही जणांना चामखिळीचा त्रास असतो. अगदी तसाच काहींना वांगचा त्रास असतो. यामागे तुमच्या त्वचेखाली असलेले मेलनिन म्हणजेच रंग द्रव्य कारणीभूत असतात. पण सूर्याच्या अतिनील किरणांमुळे हे डाग अधिक गडद होत जातात. कितीही ट्रिटमेंट घेतली तरी हे डाग पूर्णपणे जातील अशी खात्री नसते. चेहऱ्यावर वांग असतील तर अशा त्वचेने मेकअप करताना फार विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

 

Table of Contents

  Instagram

  जर तुमच्या त्वचेवर वांग असतील तर तुम्ही मेकअप करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. वांग घालवण्याचे क्रीम वापरण्यामुळे पिगमेंटेशन कमी होतो. त्यासोबतच अगदी फाऊंडेशनच्या निवडीपासून ते काजळ पेन्सिल वापरण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. यासाठीच आज जाणून घेऊया वांग असलेल्या त्वचेसाठी मेकअप गाईड.

  सुंदर त्वचा हवी असेल तर फॉलो करा या 101 टीप्स

  फाऊंडेशनचा उपयोग (Use Of Foundation)

  Instagram

  फाऊंडेशनचा उपयोग हा कोणत्याही त्वचेसाठी फार महत्वाचे असते. त्यात जर तुमच्या त्वचेवर वांग असतील तर तुम्ही मेकअप करताना अधिक काळजी घ्यावी लागते. गुळगुळीत आणि कोमल त्वचेसाठी आपण भिन्न फाउंडेशन उत्पादने वापरू शकता.

  फाऊंडेशनची निवड: त्वचेवर वांग जास्त असतील तर तुम्ही फुल कव्हरेज असलेले फाऊंडेशन निवडा. फुल कव्हरेज आणि जास्त काळ टिकणारे फाऊंडेशन हे तुमच्यासाठी उत्तम असते. जर तुमचे डाग थोडे जास्त गडद असतील तर तुम्ही तुमचा रंग आणि वांगचा रंग याचा विचार करुन त्याची निवड करा. तुमच्या चेहऱ्यावर वांग आहे म्हणून त्यावर फिकट रंगाचे फाऊंडेशन किंवा दोन ते तीन लेयर फाऊंडेशन लावले तर ते झाकले जातील असे नाही. उलट तुमची त्वचा त्यामुळे जाड थर असल्यासारखी वाटेल. त्यामुळे फाऊंडेशन लावताना तुम्ही काय काळजी घ्यावी ते पाहुया.

  असे लावा फाऊंडेशन: 

  • चेहरा स्वच्छ करुन कोरडा करुन घ्या. तुमच्या थेट त्वचेला किंवा पोअर्समध्ये फाऊंडेशन जाऊ नये यासाठी अगदी लाईट प्राईमर लावा. 
  • ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त वांग आहे.त्या ठिकाणी फाऊंडेशनने ठिपके काढून ते ब्लेंडरच्या मदतीने फाऊंडेशन चेहऱ्यावर ब्लेंड करुन घ्या. 
  • जर तुमचे वांग झाकले जात नसतील तर तुम्ही पुन्हा फाऊंडेशनचा थर लावू नका. तुमचे फाऊंडेशन चुकले आहे का ते बघा. 

  कन्सिलरचा असा करा वापर (Use Of Concealer)

  Instagram

  मेकअपमध्ये कन्सिलर हे फार महत्वाचे असते. तुमच्या चेहऱ्यावरील डाग फाऊंडेशनने लपले नाही तर कन्सिलरने लपवले जाऊ शकते. कन्सिलरमध्येही वेगवेगळे शेड्स मिळतात. फाऊंडेशनच्या निवडीप्रमाणेच तुम्हाला याचीही निवड करावी लागते.  तुम्ही खूप लाईट कन्सिलरचा उपयोग करु नका. कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कन्सीलर चेहर्‍यावरील लालसरपणा (रेडनेस) कमी करण्यास मदत करते.

  कन्सिलरची निवड करताना: कन्सिलरमध्येही वेगवेगळ्या शेड्स असतात. तुम्हाला तुमची योग्य शेड्स निवडणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही कन्सिलरचा रंग निवडताना मेकअप एक्सपर्टची मदत घेतली तर तुम्हाला त्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. कारण जर तुम्ही कन्सिलर लावत असाल तर तुमच्या वांगना त्याचा त्रासही व्हायला नको याचीही काळजी घेणे गरजेचे असते. 

  असे लावा कन्सिलर: 

  • तुमच्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी डाग आहेत तिथे कन्सिलर लावले जाते. चेहऱ्यावर वांग असतील तर तुम्हाला तुमचे डोळे, ओठांच्या बाजूचा परीसर, पिंपल्सचे डाग यासोबतच तुम्हाला वांगच्या डागांचाही विचार करावा लागतो. 
  • कन्सिलर घेऊन तुम्ही तुमच्या वांगच्या ठिकाणी अगदी थोडेसे लावून डॅब करा. 
  • कन्सिलर हे फाऊंडेशनच्या आधी लावले जाते. कन्सिलर लावल्यानंतर त्वचेवर ते अगदी व्यवस्थित डॅब करा आणि मग त्यानंतर फाऊंडेशन लावून तुम्ही चेहरा इवन टोन करा.

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट (Best Night Creams In India In Marathi)

  ब्लशरचा वापर करताना (Use Of Blush)

  Instagram

  ब्लशरचा उपयोगही अशा त्वचेवर फार महत्वाचा असतो. मेकअपला अधिक उठाव आणण्याचे कामही ब्लश करतो. तुमच्या चेहऱ्यावर वांग असतील तर तुम्ही ब्लशचा वापर अगदी हमखास करायला हवा. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसतो आणि वांग तुमच्या चेहऱ्यावर उठूनही दिसत नाही. 

  ब्लशरची निवड करताना: तुमच्या त्वचेवर ब्लशर निवडताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागत नाही. तुम्ही अगदी कोणतेही ब्लशर वापरु शकता. त्यामुळे तुम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. 

  असे लावा ब्लशर:

  • तुमच्या चेहऱ्यावर कितीही डाग असले तरी तुम्हाला ब्लशर लावताना फार काळजी करण्याची गरज नाही. 
  • तुम्ही तुमच्या आवडीचा रंग लावू शकता. जर तुमच्या गालांवर वांग असतील तर ती ब्लशरमुळे लपूनही जातील. तुमच्या स्किनटोनला उठून दिसेल अशा ब्लशरची निवड करा. म्हणजे तुमचा चेहरा अधिक चांगला दिसेल. 

  आयब्रो पेन्सिलचा करा वापर (Use Of Brow Pencil)

  Instagram

  हल्लीच्या मेकअपमध्ये आयब्रो पेन्सिल फार महत्वाची असते. कारण तुमच्या डोळ्यांचा मेकअप चांगला असेल तर तुमचा मेकअप फार खुलून दिसतो. त्यामुळे तुम्ही आयब्रो पेन्सिलचा अगदी हमखास उपयोग करा. 

  असा करा आयब्रो पेन्सिलचा वापर :  

  • आयब्रो पेन्सिल वापरण्याची विशिष्ट अशी पद्धत नाही. वांग असलेल्या त्वचेवर कसे लावावे. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फार विचार करण्याची गरज नाही. 
  • तुमच्या केसाच्या रंगानुसार तुम्ही आयब्रो पॅलेटची निवड करा. म्हणजे तुमचा चेहरा खुलून दिसेल. 

  लिपस्टिकही आहे फारच महत्वाची (Lipstick Is Important)

  Instagram

  लिपस्टिकचे कामच असते तुमचा मेकअप उठून दिसवणे. तुमच्या चेहऱ्यावर काहीही असले तरी त्याच्याकडे लक्ष न जाता तुमच्या ओठांवर जाते. त्यामुळे तुम्ही लिपस्टिकचा वापरही अगदी बिनधास्त करु शकता. 

  लिपस्टिकचा रंग निवडताना: लिपस्टिकचा शेड निवडणे हे प्रत्येकासाठीच कसरतीचे काम असते. जर तुम्हाला योग्य शेड निवडणे कठीण जात असेल तर तुम्ही एक्सपर्टची मदत घेऊ शकता. 

  लिपस्टिक लावताना: 

  • तुमची लिपस्टिक अधिक काळासाठी टिकावी असे वाटत असेल तर तुम्ही लाँग लास्टिंग लिपस्टिकची निवड करा. 
  • तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी मेकअप करत आहात याचा विचार करुन लिपस्टिकची शेड निवडा. रंग गडद असेल तरी तुम्हाला तो रंग चांगला दिसू शकतो. 

  चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Pigmentation In Marathi)

  तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

  1. वांग असलेली त्वचा एकसारखी दिसू शकते का? 
  मेकअपच्या साहाय्याने तुमची त्वचा तुम्हाला एकसारखी दिसण्यास मदत होऊ शकते. चेहऱ्यावर येणारे वांग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहींचे वांग हे फिकट रंगाचे असतात. ते मेकअपने पटकन झाकता येतात. पण काही वांग हे थोडे गडद असतात. जर त्वचेचा रंग उजळ आणि खूप काळे वांग असतील तर ते लपवताना खूप कसरत करावी लागते. पण फार काळजी करण्याचे कारण नाही कारण तुम्ही थोड्याशा मेकअप टेक्निक शिकलात की, तुमची त्वचाही एकसारखी आणि सुंदर दिसू शकते. 

  2. चेहऱ्यावरील वांग लपवण्यासाठी चांगले फाऊंडेशन कोणते? 
  चेहऱ्यावरील वांगच नाही पण चेहऱ्यावर असलेले व्रण लपवण्यासाठीही बाजारात वेगवेगळे फाऊंडेशन मिळतात. अगदी तुमच्या बजेटनुसार  फाऊंडेशन मिळू शकतील. यामध्ये प्रामुख्याने NYX, Clinique Super Balanced Makeup Foundation, Lakme Absolute, Cosmetics Flawless Finish Foundation असे काही चांगले फाऊंडेशन तुम्हाला वापरता येतील.

  3. वांग न लपवता मेकअप करता येऊ शकतो का? 
  अर्थात, तुमच्या चेहऱ्यावरील वांग हे सौंदर्यास अडथळा आणत नसेल तर तुम्ही अगदी आरामात इतरांप्रमाणे मेकअप करु शकता. पण काहींना चेहऱ्यावर असलेले हे वांग आवडत नाही. त्यांचा आत्मविश्वास त्यामुळे कमी होते म्हणून ते वेगळ्या पद्धतीचा मेकअप करुन चेहऱ्यावरील वांग लपवतात. पण तुम्हाला त्याचा काहीही त्रास नसेल तर तुम्ही साधे फाऊंडेशन, कन्सिलर वापरुन मेकअप करु शकता. तुम्ही कसेही असलात तरी सुंदर आहात, इतका आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला कशाचीही गरज नाही.

  आता तुमच्या चेहऱ्यावर वांग आले असतील तर तुम्ही नक्की या ट्रिक्सचा उपयोग करा. 

  देखील वाचा - 

  नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरून मेकअप कसा काढावा सोप्या टिप्स