चित्रपटात हिरोची भूमिका साकारणारे कलाकार सगळयांनाच आवडतात. त्यांचा एक छान फॅनबेसही असतो. पण चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचही एक अनोखा फॅनबेस आहे बरं का! ऑनस्क्रिन त्यांनी कितीही निगेटिव्ह भूमिका केली असली तरी त्यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत. ज्यांनी कायमच व्हिलनची भूमिका साकारली आहे. पण तरीही त्यांच्या हँडसमपणामुळे ते अनेकांच्या आवडीचे आहेत. जाणून घेऊया असेच काही अभिनेते जे आहेत व्हिलन पण हिरोंपेक्षाही आहेत हँडसम. करुया सुरुवात
संजय दत्तवर अजून एक संकट, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त
सोनू सुद
हिंदी असो किंवा साऊथमधील चित्रपट यामधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये सोनू सुदने व्हिलनची भूमिका साकारली आहे. सोनूची पर्सनॅलिटी व्हिलनच्या भूमिकेला शोभणारी आहे. त्यामुळे त्याला पाहिल्यानंतर व्हिलन असावा तर असा अशी प्रतिक्रिया उमटल्यावाचून राहात नाही. सोनूने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘दबंग’, ‘सिंबा’ अशा काही चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. चित्रपटात व्हिलन साकारणाऱ्या या अभिनेत्याचा फॅनफॉलोविंग हिरोला लाजवेल इतका आहे. चित्रपटात त्याच्या दमदार इंट्रीला टाळ्या आणि शिट्टया वाजणार नाही असे मुळीच होत नाही.
नील नितीन मुकेश
अगदी हिरोच्या पर्सनॅलिटीला शोभावा असा नील नितीन मुकेश अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. त्याच्या सारखा सुंदर दिसणारा अभिनेता व्हिलनची भूमिका कशी काय करु शकेल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण नीलने ऑनस्क्रिन ही भूमिका इतकी चांगली वठवली की, त्याच्यासारखा व्हिलन कोणीही असू शकत नाही असे अनेकांना कळून चुकले. प्लेअर्स, वजीर, गोलमाल अगेन, साहो, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने ग्रे शेड साकारल्या आहेत. पण त्याच्या व्हिलन रुपासोबतच त्याच्या सौंदर्यचीही कायम चर्चा होते.
टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे साक्षात श्रीकृष्णाची भूमिका
राहुल देव
अभिनेता राहुल देवही अनेकदा चित्रपटांमध्ये व्हिलन रुपात दिसला आहे. हँडसम असूनही त्याने हिरोचे रोल करण्यापेक्षा त्याने व्हिलनच्याच भूमिका स्विकारल्या. हिंदी आणि साऊथच्या चित्रपटात त्याच्या अभिनयाचा दबदबा आहे. त्याने चॅम्पियन, फुटपाथ, आवारा पागल दिवाना, सुपारी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याचाही फॅनफॉलोअर्स चांगलाच मोठा आहे.
निकितिन धीर
उंच, हट्टाकट्टा आणि हँडसम या सगळ्यात कॅटगिरीमध्ये मोडणारा आणखी एक व्हिलन म्हणजे निकितिन धीर. त्याची उंची जरी हिरोला शोभणारी असली तरी त्यात दडलेला एक व्हिलन त्याच्या अभिनयातून चांगलाच दिसून येतो. जोधा अकबर, रेडी, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये त्याने व्हिलनची भूमिका साकारली आहे.
अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी
रोनित रॉय
एकेकाळच्या टीव्ही मालिकांमधील हा आदर्श चेहरा. आता व्हिलनरुपात समोर येऊ लागला आहे. एखादा हिरो व्हिलनची भूमिका साकारल्यावर कसा दिसेल याचे हे उत्तम उदाहरण. टीव्हीवर मालिका करत असताना साकारलेला मिस्टर बजाज ते आताचा व्हिलनचा प्रवास या सगळ्यामध्ये त्याच्या अभिनयासोबत त्याच्या सौंदर्याचीही चर्चा केली जाते. बॉस, गुड्डू रंगीला, काबिल, उडान या चित्रपटात त्याने निगेटिव्ह रोल साकारला आहे.
हे आहेत असे व्हिलन ज्यांच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.