लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा

लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा

 इतरवेळी कामांच्या गडबडीत आपल्याला आपल्या त्वचेची, केसाची फारशी काळजी घेता येत नाही. घड्याळ्याच्या काट्यावर धावत असताना ऑफिसची, घरातली सगळी कामं करावी लागतात. पण लॉकडाऊनमुळे काही काळ तरी स्वत:ची काळजी घेता येईल असे समजून अनेकांनी आनंदही व्यक्त केला. पण झालं नेमकं उलटचं Work From Home करता करता ते Work For Home कधी झालं हे कळलंच नाही. पण इतक्या दिवसांमध्ये तुम्ही जर स्वत: कडे नीट पाहिलं असेल तर पहिल्या काही दिवसांमध्ये तुमच्या त्वचेमध्ये केसांमध्ये तुम्हाला खूप चांगले फरक जाणवत असतील. पण जसजसा लॉकडाऊनचा काळ वाढतोय तसा तसा तुम्हाला काही त्रास जाणवू लागला आहे का? तुमच्या त्वचेचा तजेला निघूल गेला आहे आणि तुमचेही केस गळू लागले आहेत? तर मग आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. चला जाणून घेऊया कारण आणि उपाय

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

म्हणून होत आहे त्रास

Instagram

आपल्या प्रत्येकाच्या शरीराला व्हिटॅमिन D ची गरज असते. ही व्हिटॅमिन तुम्हाला सूर्यकिरणांपासून मिळते. इतरवेळी त्वचा टॅन होऊ नये, केसांवर सूर्याची तीव्र किरणे पडू नयेत म्हणून आपण खूप काळजी घ्यायचो. स्कार्फने संपूर्ण चेहरा आणि केस कसा झाकला जाईल याची काळजी घ्यायचो. लॉकडाऊन झाल्यापासून अनेकांचा प्रवास थांबला आहे. आपण घराबाहेर पडत नाही. झोपण्याच्या सवयी बदलून गेल्यामुळे अनेक जण आता उशीरा उठत आहे. त्यामुळे सकाळची सूर्यकिरण तुमच्या अंगावर पडण्याचा आता काहीच प्रश्न येत नाही. त्यात पावसाळा असल्यामुळे सूर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. त्यामुळे ऊन अंगावर घेण्याचे प्रश्नच येत नाही. याच कारणामुळे काहींचे केस भरपूर गळू लागले आहेत. केस विंचरताना किंवा केसात नुसता हात जरी फिरवला तरी अनेकांना ही केसगळती जाणवून लागली आहे. शिवाय त्वचेच्या बाबतीतही अगदी तसाच फरक अनेकांना जाणवत आहे. त्वचा उजळता उजळता आता तुम्हाला तुमची त्वचा अगदीच कोरडी किंवा खूप तेलकट आणि निस्तेज वाटू लागली असेल.

कुरळ्या केसांना ब्लो ड्राय करण्यासाठी सोप्या टिप्स

करा हे सोपे उपाय

Instagram

सूर्यकिरण घ्या अंगावर:

सूर्यकिरण तुमच्यासाठी किती आवश्यक आहे हे कळल्यानंतर आता किमान तुमचा थोडासा वेळ अंगावर ऊन घेण्यासाठी ठेवा. ज्यावेळी शक्य असेल तेव्हा तुम्ही उन्हात बसा. दुपारच्या उन्हापेक्षा सकाळचे उन हे नेहमीच चांगले असते त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी अगदी घराखालीही न उतरता खिडकीतच बसून संपूर्ण अंगावर ऊन घ्या. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवेल. पण हा फरकही तुम्हाला लगेच जाणवणार नाही. तुम्हाला थोड्या कालावधीसाठी तरी हा प्रयोग करावा लागेल. दिवसाला 15  मिनिटांचे ऊन घेणे तुमच्यासाठी पुरेसे आहे. 


तांदुळाचे पाणी: 

तांदुळाचे पाणी हे तुमच्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी फार चांगले असते.  ज्यावेळी तुम्ही तांदूळ धुता. त्यावेळी त्यामध्ये बायोटिन, व्हिटॅमिन्स आणि स्टार्च असते. तांदुळ धुतल्यानंतर ते पाणी तुम्ही एका भांड्यात काढून ठेवा. ते काही काळासाठी तुम्हाला तसेच ठेवायचे आहे. कारण तरच त्या पाण्याचा पी एच लेव्हल वाढतो. तुमच्या निरोगी त्वचेसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी ते फारच महत्वाचे असते. हे पाणी साधारण 15 मिनिटे ठेवल्यानंतर एका त्या पाण्यात स्टार्च जमा होतो. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन तुमच्या त्वचेवर आणि केसांवर मारुन थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करुन थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी हा प्रयोग करा. 


अगदी कमीत कमी खर्चात होऊ शकेल असा हा प्रयोग नक्की करुन पाहा तुम्हाला फरक जाणवेल.

 

दातांवर प्लाक साचण्यास हे खाद्यपदार्थ असतात कारणीभूत