ADVERTISEMENT
home / Fitness
संधिवातावर घरगुती उपाय

जाणून घ्या संधिवातावर घरगुती उपाय (Arthritis Home Remedies In Marathi)

वार्धक्याची लक्षणं म्हणजे हात-गुडघे-पाय दुखी.. सांध्याचे असे दुखणे म्हणजे संधिदुखी किंवा संधिवात होय. वाढत्या वयासोबत हा त्रास अनेकांना होऊ लागतो. पण हल्ली संधिवाताचा त्रास आता वयाच्या चाळीशीनंतर नाही तर काहींनी आधीही होऊ लागला आहे. शरीराची योग्य पद्धतीने निगा राखली नाही की, अशा त्रासांना फार लहान वयातच अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे. संधिवाताची वाढती समस्या लक्षात घेत संधिवात म्हणजे काय? संधिवाताची कारणे? आणि संधिवातावरील आयुर्वेदिक उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला

संधिवात म्हणजे काय ? (What Is Arthritis In Marathi)

संधिवात म्हणजे काय

Instagram

ADVERTISEMENT

‘संधिवात’ या शब्दाची फोड केली तर संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे.. त्यामुळे सांधेदुखी यालाच ‘संधिवात’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक हाडे एकत्र येत स्नायू आणि मांसपेशी जोडल्या जातात अशा भागाला आपण सांधा म्हणतो. संधिवातामध्ये सांध्याला सूज येऊ लागते. सूजलेला भाग खूप दुखू लागतो. मॉर्डन सायन्समध्ये अशा दुखण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला आथ्ररायटिस किंवा सोरायटिक असेही म्हणतात. आयुर्वेदामध्ये आमवात (आथ्ररायटिस) आणि  संधिगतवात (ऑस्टिआथ्ररायटिस) नावानेही ओळखले जातात. यामध्ये कितीही वेगवेगळे प्रकार असले तरी त्याला सर्वसाधारणपणे संधिवात असे म्हटले जाते. आपल्या लघवीतून युरीक आम्ल तयार होत असते. ते मूत्रपिंडाद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. पण याचे संतुलन बिघडले किंवा त्याचे उत्पादन अधिक झाले तर युरीक अॅसिडची रक्तातील पातळी वाढते. संधीच्या जागेत हे वेदनाकारक पजार्थ सोडले जातात. त्यामुळेच सांध्याना त्रास होऊ लागतो. त्यातूनच संधिवात बळावतो.

संधिवात लक्षणे (Sandhivata Symptoms In Marathi)

नुसती सांधा दुखी म्हणजे सांधेदुखी नाही. तुम्हाला नक्कीच सांधेदुखी आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संधिवाताची काही लक्षणेही माहीत हवीत. ती लक्षणे जाणून घेऊया.

सांधे दुखणे (Joint Pain)

सांधे दुखणे

ADVERTISEMENT

Instagram

संधिवाताचे पहिले लक्षण म्हणजे सतत सांधे दुखत राहणे. तुमच्या हातापायांचे सांधे सतत दुखत असतील. याची अन्य कोणतीही कारणे नसतील तर तुम्हाला संधिवाताचा त्रास असण्याची शक्यता असू शकते. सांधे दुखीचा त्रास हा सतत होत असेल तर मात्र तुम्ही त्याचे योग्य वेळी निदान करणे फारच गरचेचे असते. तुम्हाला सकाळच्या गारव्यात या वेदना तुम्हाला अधिक जाणवत असतील तर तुम्हाला संधिवाताचा त्रास असू शकतो.

गर्भाचे वजन वाढण्यासाठी पोषक आहार (Food To Increase Fetal Weight During Pregnancy)

सांधे अडकल्यासारखे वाटणे (Stiffness In Joints)

आपल्या शरीराचे अवयव आपल्याला नेहमीच शरीरावर भार असल्यासारखे जाणवत नाही. पण ज्यावेळी तुम्हाला चालताना किंवा कोणतीही हालचाल करताना सांध्यातून अडकल्यासारखे वाटत असेल. सांध्याची हालचाल इतर वेळेसारखी होत नसेल तर हे देखील संधीवाताचे लक्षण आहे. 

ADVERTISEMENT

चयापचय क्रिया बिघडणे (Metabolism Is Affected)

अन्नाचे पचन हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. पण तुमच्या शरीराचा जराही तोल गेला की, त्याचा सगळ्यात पहिला त्रास तुमच्या चयापचय क्रियेवर होऊ लागतो. तुमच्या पचनाचा वेग मंदावणे किंवा तुम्हाला त्या संदर्भाती आजारही संधिवातामुळे उद्भवू शकतात. अनेकदा सांधे दुखीमुळे त्रस्त असल्यामुळे खाण्यावरील इच्छाही उडून जाते.

स्नायू कमकुमवत होणे (Weakness In Muscle)

सांध्याच्या हाडांना होणारा हा त्रास तुमचे स्नायूही कमकुवत करत असतो. संधिवात असलेल्या अनेकांचे अचानक वजन कमी होणे. वयाच्या मानाने शरीर फार बारीक आणि कमजोर दिसू लागते. अगदी कोणताही इतर त्रास त्यांना सहज होऊ लागते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे आणि हाडांची हालचाल योग्य करण्यासाठी लागणारे हाडांचे वंगण कमी झाल्यामुळे हाडांमधूनही कटकट असा आवाज येऊ लागतो. 

सांधे गरम लागणे किंवा लाल दिसणे (Redness Of Joints)

सांधे गरम लागणे

Instagram

ADVERTISEMENT

तुमचा एखादा अवयव दुखत असेल तर तुम्हाला त्या ठराविक भागाकडे अंग गरम आणि लाल दिसू लागते. संधिवातामध्येही अगदी तसेच होते. सांध्यांच्या ठिकाणी हात लावल्यास तो भाग गरम लागतो. शिवाय लालही दिसू लागतो. 

संधिवात कशामुळे होतो (Causes Of Arthritis In Marathi)

संधिवात होण्यामागेही काही कारणे आहेत. जाणून घेऊया संधिवाताची कारणे

दुखापत (Injuries)

प्रत्येक शरीराची एक क्षमता असते. वजन उचलणे, कसरत करणे, धावणे हे तुम्हाला तुमच्या क्षमतेपलीकडे जाऊन करता येत नाही. तसे केल्यास तुमच्या शरीरावर ताण पडतो. असा ताण सतत पडत राहिला की, तुमच्या सांध्यांवरही त्याचा परीणाम होते. चुकीच्या खाण्याच्या पद्धतीन आणि अति मेहनतीचे काम या सगळ्यामुळे जर तुमचे सांधे दुखावले गेले असतील तर तुम्हाला हमखास संधिवात होऊ शकतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही विनाकारण शरीराला दुखापत होऊ देऊ नका.

ADVERTISEMENT

शरीराचे नैसर्गिक विघटन (Natural Breakdown Of Body)

Natural Breakdown Of Body

Instagram

वयपरत्वे आणि शरीराच्या इतर व्याधींसोबत आपल्या शरीराचे विघटन होत असते. त्यामुळेही हाडाची बळकटी कमी होते. हाडांच्या नैसर्गिक विघटनामुळे हाडांची योग्य हालचाल करणारे घटक हे शरीरातून कमी होऊ लागतात आणि मग संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता बळावते. 

प्रार्दुभाव (Infection)

एखादी दुखापत झाल्यानंतर तुम्हाला त्या माध्यमातून प्रादुर्भाव झाला असेल तरी देखील तुम्हाला संधिवाताचा त्रास होऊ शकतो. त्यातच जर तुम्हाला फ्रॅक्चर झाले असेल तर त्या सांध्याची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरात किंवा हाडांशी निगडीत होणाऱ्या कोणत्याही प्रार्दुभावामुळे तुम्हाला संधिवाताचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

टिश्यू कमी होणे (Reduction Of Cartilage Tissue)

सांध्याची हालचाल करण्यासाठी आपल्या सांध्यांमध्ये असलेले टिश्यू हे फारच महत्वाचे असतात. त्याला कार्टिलेज असे म्हणतात. वयपरत्वे शरीरात त्यांचे प्रमाण कमी होत असते. पण ते कमी होण्याचे प्रमाणही फार आरामात होते. पण संधिवाताचा त्रास असलेल्या व्यक्तिा हा त्रास फार लवकर आणि जलदगतीने होऊ लागतो. शरीरातील कार्टिलेजचे प्रमाण कमी झाले की, असह्य सांधेदुखी बळावते. 

संधिवात घरगुती उपाय (Home Remedies For Arthritis In Women In Marathi)

संधिवातावर अनेक उपचारपद्धती आहेत (sandhivata upchar in marathi).पण तुम्ही घरीच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यापासून थोडा आराम मिळू शकेल.

शरीराची हालचाल (Maintain Flexibility)

Maintain Flexibility

ADVERTISEMENT

Instagram

संधिवातामुळे तुमचे सांधे दुखत असले तरी देखील तुम्हाला त्यांची हालचाल राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला संधीवातापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नियमित थोडा का असेना व्यायाम करायला सुरुवात करा. शक्य असेल तितका व्यायाम तुमच्या सांधेदुखीला कमी करण्यास मदत करु शकतो. तुमचे अंग दुखते म्हणून तुम्ही तसेच पडून राहात असाल तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन चालणे, धावणे, सूर्यनमस्कार काही सोपी आसने नक्की करुन पाहा.

तिळाच्या तेलाची मालिश (Sesame Oil Massage)

संधिवातासाठी तिळाचे तेलही उत्तम आहे. तिळाचे तेल घेऊन तुम्ही गुडघे, हात, पाय यांना लावून मालिश करा. हा गुडघेदुखीवर उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्हाला स्वत:ची मालिश करुन घेणे शक्य नसेल तर तुम्ही मसाज करुन घ्या. तुमच्यासाठी मसाज हा फारच आवश्यक असल्यामुळे तुम्ही अगदी नित्यनेमाने मालिश केले तरी चालू शकेल. जर तुम्हाला तिळाचे तेल हलके गरम करुन लावायचे असेल तरीदेखील चालू शकेल.

गरम आणि थंड शेक (Hot And Cold Therapy)

Hot And Cold Therapy

ADVERTISEMENT

Instagram

संधिवातासाठी गरम पाण्याचा शेक आणि बर्फाचा शेक हा दोन्ही फायदेशीर ठरु शकतो कारण यामध्ये तुमची हाडं एकमेकांना घासली जातात. हाड सत घासल्यामुळे तेथील मांसपेशीदेखील कडक होतात. गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे हाडांना आलेला कडकपणा थोडा कमी होतो. तर संधिवातामध्ये अनेकदा शरीराला सूज येते ही सूज कमी करण्याचे काम बर्फ करु शकते. 

वजन कमी करणे (Weight Loss)

शरीराचे वाढते वजन अनेक कारणांसाठी हानिकारक असते. वजन वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे वजन तुमच्या मांसपेशींना आणि हाडांना सांभाळण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणूनच तुमच्या उंचीनुसार तुमचे वजन असणे फारच गरचेचे असते. जर तुमचेही वजन वाढत असेल आणि तुम्हाला असा सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला असेल तर तुम्ही तातडीने तुमचे वजन नियंत्रणात आणणे फारच गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणे फारच आवश्यक आहे.

योग्य आणि पोषक आहार (Nutritious & Proper Diet)

संधिवातासाठी कारणीभूत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. त्यासाठी कारणीभूत म्हणजे तुमचा आहार. तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त आहार जाणे फारच गरजेचे असते. प्रोटीन कशातून मिळते असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही दूध, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांचा अधिकाधिक समावेश तुमच्या आहारात करायला हवा.

ADVERTISEMENT

हळदीचा समावेश (Turmeric In Diet)

हळदीचा करा वापर

Instagram

हळदीमधील नैसर्गिक घटक हे शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच संधिवात असलेल्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा समावेश करावा असे म्हटले जाते. भारतीय जेवणामध्ये हळद ही अगदी हमखास वापरली जाते. पण तरीही त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर चिमूटभर हळदीचा उपयोग तरी करा. 

अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अनेक कारणांसाठी अॅपल सायडर व्हिनेगर हे फायदेशीर मानले जाते वजन कमी करण्यासाठी ही अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग होतो. अनेकांनी अॅपल सायडर व्हिनेगरच्या वापरामुळे वजन कमी होऊन संधिवात कमी झाल्याचा दावा केला आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

ADVERTISEMENT

आलं (Ginger)

आल्याचा करा वापर

Instagram

किचनमध्ये अगदी हमखास असणारे आले हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यामधील दाहनाशक घटक तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही आहारात आल्याचा समावेश करा. तुम्ही आल्याचा चहा करुन प्यायाला तरी चालेल. आले पाण्यात टाकून तुम्ही त्याही पाण्याचे सेवन करु शकता. पण त्याचे सेवनही प्रमाणात असू द्या. 

ग्रीन टी (Green Tea)

संधिवात असणाऱ्यांनी त्यांचा आहार हा चांगला ठेवलाच पाहिजे पण आहारासोबत चयापचय क्रिया चांगली राहण्यासाठी अगदी हमखास घ्यायला हवी अशी गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचे सेवन करायला हवे.

ADVERTISEMENT

लिंबू वर्गातील फळांचे सेवन (Consume Citrus Fruit)

संधिवातासाठी आंबट फळांचे सेवन हे वर्ज्य आहे. पण ही फळ म्हणजे चिंच, बोरं पण तुम्ही मोसंब, गोड संत्र, लिंबूपाणी अशा पदार्थांचे सेवन करु शकता. अनेकदा संधिवात असणाऱ्यांना आंबवलेले पदार्थ अजिबात खाऊन चालत नाहीत. हे पदार्थ म्हणजे इडली, डोसावगैरे

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. संधिवाताची सुरुवातीची लक्षणे कोणती?

शरीरातील सांधे दुखणे, जखडलेले वाटणे, हालचाल करताना प्रचंड वेदना जाणवणे हे संधिवाताचे प्राथमिक लक्षण आहे. याकडे अधिक लक्ष देण्याची तुम्हाला गरज असते. 

ADVERTISEMENT

2. संधिवातावरील उत्तम उपचारपद्धती कोणत्या?

संधिवातावर अनेक उपचार पद्धती आहेत.डॉक्टरांच्या औषधांसोबत घरात राहूनही सोपे घरगुती उपाय करुन तुम्हाला काळजी घेता येते. संधिवात हा पूर्ण बरा होत नाही. पण तुम्ही योग्य काळजी घेतली तर त्याचा त्रास तुम्ही कमी करु शकता. 

3. संधिवातासाठी उत्तम व्हिटॅमिन कोणते? 

व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे नुकसान होत असते. तुमच्या हाडांची झीज होते. शरीरातील कॅल्शिअम आणि फॉस्फरस कमी होते. त्यामुळे संधिवात असणाऱ्यांनी व्हिटॅमिन D  आणि त्याशिवाय डॉक्टर सांगतील अशा गोष्टींचे सेवन करायला हवे. 

ADVERTISEMENT

4. संधिवात असलेल्यांनी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळायला हवे? 

संधिवात असणाऱ्यांसाठी काही खाद्यपदार्थ खाणे अजिबात योग्य नाही. या पदार्थांमध्ये तेलकट पदार्थ, बेकरी फुड, मीठ, तंबाखू, दारु या पदार्थांचे सेवन टाळणे फारच गरजेचे असते. नाहीतर त्यामुळे तुमचा त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. 

5. संधिवात बरा होऊ शकतो का? 

नाही, संधिवात हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. पण हल्लीच्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे त्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.  शिवाय तुम्ही थोडी काळजी घेतली तर हा त्रास घरातल्या काळजीनेही कमी करण्यास मदत मिळते. 

28 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT