ADVERTISEMENT
home / Periods
how to postpone periods naturally in marathi

पाळी उशिरा येण्यासाठी उपाय | How To Postpone Periods Naturally In Marathi

मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी तसा तर अगदी जवळचा विषय.  तुम्हाला हवं असो वा नसो प्रत्येक महिन्याला या मासिक पाळीची वाट पाहावीच लागते. बरेचदा आपल्याला काही कार्यक्रमाला जाताना मासिक पाळीचा त्रास नकोस वाटतो. पण काही वेळा त्याच कालावधीत आपली डेट येणार असते. मग अशावेळी मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी (pali pudhe janyache upay) गोळ्या घेतल्या जातात. घरात पूजाअर्चा असेल तर ही मासिक पाळी नकोशीच वाटते. पण गोळी घेणंही योग्य वाटत नाही. कारण त्याचे पुढे दुष्परिणामही भोगावे लागतात. मग अशावेळी नैसर्गिक घरगुती उपायांनी मासिक पाळी (How To Postpone Periods Naturally In Marathi) पुढे ढकलता येते. मग अशावेळी तुम्ही काय करायला हवं ते आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. पाळी पुढे ढकलण्यासाठी घरगुती उपाय केल्याने तुम्हाला कोणतेही दुष्परिणामही भोगावे लागणार नाहीत आणि तुम्हाला हवं तसं तुमच्या घरच्या कार्यक्रमालाही तुम्हाला हजेरी लावता येईल. 

नैसर्गिक घरगुती उपायांनी ढकला मासिक पाळी पुढे

काही जणांना नक्की काय घरगुती उपाय करायचे याची माहिती नसते. आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी  सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही त्रास न होता मासिक पाळी पुढे ढकलू शकता आणि हे उपाय नैसर्गिक आहेत. 

मसालेदार जेवणापासून राहा दूर

how to postpone periods naturally in marathi

तुम्हाला मासिक पाळी पुढे ढकलायची असेल तर तुम्ही काही दिवस मसालेदार जेवणापासून दूरच राहा. तसंच तर मसालेदार खाण्याने रक्तप्रवाहात सुधारणा होते. पण तुम्हाला मासिक पाळीचा त्रास नको असेल तर तुम्ही काळी मिरी, मिरची आणि लसूण या पदार्थांपासून दूर राहणंच योग्य.  कारण या पदार्थांमध्ये असलेल्या उष्णतेमुळे तुम्हाला पाळी लवकर यायची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही मसालेदार पदार्थांमध्ये या तीन पदार्थांपासून दूर राहिल्यास, तर तुम्हाला मासिक पाळी पुढे ढकलता येते. 

10 ग्लास पाणी प्या

masik pali ushira yenyasathi upay

तुमचं शरीर व्यवस्थित हायड्रेट राहिलं तर तुम्हाला मासिक पाळी वेळेच्या आधी येत नाही. त्यामुळे प्रयत्न करा की, दिवसातून तुम्ही कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पित राहाल. असं केल्याने मासिक पाळी उशिरा येत नाही. पण याचं चक्र नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

एकत्र राहणाऱ्या मुलींची मासिक पाळीची तारीख का येते पुढेमागे, जाणून घ्या सत्य

फरसबीचे सेवन करा

मासिक पाळी उशीरा हवी असेल तर यावर उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या आहारात फरसबीचा समावेश करून घ्या. 100 मिली पाण्यात तुम्ही फरसबी 4-5 मिनिट्स उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. हे पाणी तुम्ही काही दिवस पित राहिलात तर मासिक पाळी पुढे जाण्यास मदत होते. तसंच याने शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रासही होत नाही. 

चिया सीड्सचे पाणी प्या

पाळी उशिरा येण्यासाठी उपाय

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी हादेखील चांगला उपाय आहे. घरगुती उपायामध्ये तुम्हाला याचा वापर करता येईल. त्यासाठी तुम्ही रात्रभर पाण्यात चिया सीड्स भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी तुम्ही उपाशी पोटी प्या. तुमची तारीख तुम्हाला माहीत असतेच. त्यामुळे या तारखेच्या साधारण आठवडाभर तुम्ही हा प्रयोग केल्यास, तुम्हाला याचा योग्य परिणाम मिळेल आणि पाळी पुढे जाण्यास मदत होईल. 

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

ADVERTISEMENT

ओव्याची पाने

ओव्याची पानेही मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये विटामिन सी,स विटामिन बी-1, विटामिन के आणि विटामिन ए सारखी पौष्टिक तत्व असतात, ज्यामध्ये प्रतिरोधक क्षमता आणि हाडं मजबूत करण्याची क्षमता अधिक असते. ही पानं पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्यात मध मिक्स करा. हे पाणी गरम गरम प्या. मासिक पाळी पुढे ढकलायची असेल तर दिवसातून कमीत कमी याचे सेवन दोन वेळा तरी करा. 

नाश्त्यात खा दोन केळी

how to postpone periods naturally in marathi

नाश्त्यात तुम्ही दोन केळ्याचे सेवन केल्यास, मासिक पाळी किमान दोन ते तीन दिवस पुढे ढकलण्यास मदत मिळते. मासिक पाळीच्या तारखेच्या आधीपासून किमान पाच दिवस तुम्ही हा घरगुती उपाय करायला सुरूवात करा.

करा लिंबाचा वापर


pali pudhe janyache upay

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय म्हणजे लिंबू. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे मासिक पाळी पुढे ढकलण्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही रोज लिंबाचा एक तुकडा खा. तुम्ही हवं तर लिंबू पाणीही करून पिऊ शकता. चांगल्या परिणामासाठी तुम्ही लिंबाचे सेवन रोज केल्यास, तुम्हाला याचा फायदा मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी मिळतो.

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय
 

ADVERTISEMENT

अॅप्पल साईड व्हिनेगर

how to postpone periods naturally in marathi

तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगरचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही एका ग्लासात कोमट पाणी घ्या आणि त्यात 3 चमचे अॅप्पल साईड व्हिनेगर मिक्स करा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन करा. वास्तविक मासिक पाळीच्या तारखेच्या एक आठवडा आधी तुम्ही हा घरगुती उपाय सुरू करावा. असं केल्याने मासिक पाळी पुढे जाते. 

13 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT