घरच्या घरी करा गजरा तयार, केसांची करा स्टाईल

घरच्या घरी करा गजरा तयार, केसांची करा स्टाईल

महिलांना केस वेगवेगळ्या पद्धतीने बांधणं अतिशय आवडतं. वेगवेगळ्या क्रार्यक्रमांना केसांची वेगवेगळी स्टाईल करणं हे तर महिलांचं आवडतं काम आहे. पण केसांना बांधून त्यावर गजरा माळणं हे त्याहीपेक्षा आवडतं काम. अनेकदा आपण कार्यक्रमांमध्ये पाहतो की, बऱ्याच महिलांना साडी नेसल्यावर गजरा घालणं खूपच आवडतं. इतकंच काय तर आपल्या बॉलीवूडच्याही अनेक अभिनेत्रींना केसात गजरा माळणं खूपच आवडतं. गजऱ्याचं वैशिष्ट्य हे आहे की, तुमचे केस लहान असले तरीही गजऱ्यामुळे तुमच्या केसांना शोभा येते. तुम्ही केसांचा अंबाडा करून त्यात गजरा माळला की दिसायलाही तितकेच आकर्षक आणि सुंदर दिसते. पण जर तुम्हाला बाजारात गजरा नाही मिळाला अथवा तुम्हाला काही फुलांची अलर्जी असेल तर काय करायचे? गजरा आवडत असेल आणि तुम्हाला अलर्जी असेल तर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी गजरा तयार करून केसांची स्टाईल करू शकता. गजरा बनविण्याच्या काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही तयार करू शकता,  घरच्या घरी गजरा तयार. 

कॉटनच्या कपड्याचा गजरा

Shutterstock

साहित्य 

  • कॉटन कपडा अथवा सिंथेटिक कपडा 
  • दोरा
  • सुई 

तयार करण्याची पद्धत 

  • गजरा तयार करण्यासाठी आधी तुम्ही 3 विविध रंगाचा  कपडा घ्या 
  • कपड्याला 1 इंच उभे आणि अर्धा इंच आडवे असे कापून घ्या 
  • कपड्याचा दोरा निघत असेल तर मेणबत्तीच्या सहाय्याने गरम करून चिकटवून टाका 
  • सुईमध्ये दोरा ओऊन हा कपडा शिवायला सुरूवात करा 
  • एका रंगाच्या कपड्याचे चार तुकडे करून दोऱ्याने शिवा
  • त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रंगाने शिवल्यानंतर जोडा 
  • दोन्ही बाजूला शेवटी गाठ मारा 
  • सुंदर गजरा तयार 

लग्नसमारंभात किंवा खास कार्यक्रमांसाठी घरीच करा अशी ‘अंबाडा’ हेअरस्टाईल- Ambada Hairstyles

पॉलिथिनचा गजरा

साहित्य 

  • थर्माकॉलचे बॉल
  • ट्रान्सलुसेंट पॉलिथीन 
  • बटर पेपर
  • सुई - दोरा 

तयार करण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले तुम्ही पॉलिथीन लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या 
  • एक थर्माकॉल बॉल घ्या आणि या कपड्यात गुंडाळा
  • सुई दोऱ्याने हे शिवा. असं केल्यास याचा आकार तुम्हाला फुलासारखा दिसेल
  • कळी बांधण्यासाठी तुम्ही हिरव्या रंगाच्या दोऱ्याचा वापर करा आणि खालपर्यंत बांधा 
  • कळी तयार करून झाल्यावर एक तार घ्या आणि जाडसर सुईमध्ये घाला 
  • त्यानंतर त्यात एक एक कळी घाला आणि संपूर्ण गजरा तयार करून घ्या 
  • दोन्ही किनारे नीट बांधून घ्या जेणेकरून कळ्या बाहेर पडणार नाहीत 
  • नंतर तार वाकवून तुम्ही गजरा बांधू शकता

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)

पॉलिथिनचा ओपन फ्लॉवर गजरा

तुम्हाला गजऱ्यामध्ये काही बदल हवा असेल तर तुम्ही कळ्यांपेक्षा ओपन फुलांच्या आकाराचाही गजरा निवडू शकता. वर दिल्याप्रमाणेच तुम्ही कळी तयार करून घ्या. त्या मधून कापा. दोन कट करा त्याचे चार भाग तुम्हाला मिळतील. 

साहित्य 

  • थर्माकॉलचे बॉल
  • ट्रान्सलुसेंट पॉलिथीन 
  • बटर पेपर
  • सुई - दोरा 

तयार करण्याची पद्धत 

  • एक फूल धाग्यात बांधून दुसऱ्या  बाजूला त्याच्या विरूद्ध दिशेला दुसरे फूल ओवा 
  • दोन्हीची तोंडं विरद्ध दिशेाला दिसावीत अशा तऱ्हेने ओवा 
  • तुम्हाला किती मोठा गजरा हवा आहे त्याहिशेबाने दोरा घ्या 
  • सर्वात शेवटी गाठ बांधताना घट्ट बांधा 

घरच्या घरी असा सोप्या पद्धतीने तुम्ही गजरा करून घालू शकता. फूल एक वेळ आली की काळी पडतात पण हा गजरा तसाच्या तसा टवटवीत दिसतो. पण ही हाताने तयार केलेली फुलंही नाजूक असतात त्यामुळे हाताळताना काळजी घ्यावी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे गजरे वापरू शकता. 

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल - Hairstyles For Short Hair

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा