केसांची योग्य निगा राखण्यासाठी केसांसाठी योग्य असलेल्या शॅम्पूची निवड करणं गरजेचं आहे. बाजारात विविध प्रकारचे शॅम्पू असतात. सर्वोत्तम हर्बल शैम्पूपासून ते केमिकल प्रेरित शाम्पूपर्यंत हे सर्व आपल्याला आढळू शकते. मात्र जर तुम्ही यातील चुकीचा प्रकार केसांसाठी निवडला तर तुमच्या केसांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. यासाठी केसांसाठी शॅम्पू निवडताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
कोणताही शॅम्पू खरेदी करण्यापूर्वी त्याचे फायदे, त्यात कोणते घटक आहेत, तो कोणत्या केसांसाठी योग्य आहे आणि तो कसा वापरावा हे पाहणं गरजेचं असतं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे तुमच्या केसांचा प्रकार ओळखणं. तुमचे केस ऑईली, ड्राय अथवा कलर केलेले यापैकी कोणत्या प्रकारात मोडतात हे तुम्हाला माहीत असायला हवं. जर तुमचे केस कोरडे आणि स्काल्प तेलकट असेल तर तुमचे केस कॉम्बिनेशन प्रकारात मोडतात हे ओळखा. कारण या सर्व प्रकारांसाठी निरनिराळे शॅम्पू बाजारात उपलब्ध असतात.
हायड्रेटिंग मॉइश्चराईझिंग शॅम्पू - यामुळे तुमचे केस मऊ, चमकदार आणि मुलामय होतील. हा शॅम्पू जाड,कुरळ्या आणि कोरड्या केसांसाठी उत्तम आहे
व्हॉल्युमिंग शॅम्पू - ज्यांचे केस फारच पातळ आणि सरळ असतात अशा केसांना एक्स्ट्रा बूस्ट अथवा व्हॉल्युम मिळण्यासाठी असे शॅम्पू फायदेशीर ठरतात
स्ट्रेटनिंग अथवा फोर्टिफाइिंग शॅम्पू - निस्तेज, खराब झालेल्या, जास्त ट्रिटमेंट केलेल्या, हायलाइट केलेल्या कमजोर आणि फाटे फुटलेल्या केसांसाठी उत्तम शॅम्पू. कारण यामुळे तुमच्या केसांना जास्त प्रोटिन्स मिळते आणि त्यांचे पोषण होते.
बॅलेसिंग शॅम्पू - हा सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य प्रकार आहे. कारण यामुळे केस जास्त मॉइश्चराईझ होत नाहीत अथवा अती स्वच्छतेमुळे कोरडेही होत नाहीत.
स्मूथनिंग अथतवा स्ट्रेट केसांसाठी शॅम्पू -यामध्ये जास्तीचे मॉइश्च्राईझर आणि स्मूथनिंग घटक असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे क्युटिकल्स सील होतात आणि तुमचे केस अधिक सरळ आणि स्मूथ दिसतात.
कर्ली केसांसाठी शॅम्पू - हा प्रकार फक्त कुरळ्या केसांसाठीच योग्य आहे. कारण यामुळे कुरळ्या केसांमधील गुंता कमी होतो आणि केसांमधील कर्ल्स मऊ आणि सुटसुटीत होतात.