ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
घरच्या घरी करा स्वतःचा ब्रायडल मेकअप, फॉलो करा या सोप्या टिप्स

घरच्या घरी करा स्वतःचा ब्रायडल मेकअप, फॉलो करा या सोप्या टिप्स

ब्रायडल मेकअप हा आपल्या नेहमीच्या मेकअपपेक्षा नक्कीच खास आणि आकर्षक असतो. लग्नात या मेकअपमुळे नवरीचा लुक अधिक खुलून दिसतो. लग्नासाठी ब्रायडल मेकअप करणारे स्पेशल मेकअप आर्टिस्ट असतात. मात्र सध्या कोरोनामुळे मेकअप आर्टिस्ट सहज मिळणं वाटतं तितकं सोपं नाही. शिवाय सध्या अजून काही दिवस लग्न कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत करणं बंधनकारक आहे. त्यामुळे ब्रायडल मेकअपसाठी मेकअप आर्टिस्टला बोलावणं सुरक्षित असेलच असं नाही. लग्नाचा क्षण हा खूपच अमुल्य असतो म्हणूनच कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत जरी तुम्ही लग्न केलं तरी मेकअपमुळे तुमचे फोटो चांगले येतील जे आठवणींच्या रूपात तुमच्याजवळ कायम राहतील. यासाठीच जर तुम्ही या काळात लग्न करत असाल तर या मेकअप टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरू शकतात. या टिप्स फॉलो करा आणि स्वतःचा ब्रायडल मेकअप स्वतःच करा.

ब्रायडल मेकअपसाठी लागणारे साहित्य –

ब्रायडल मेकअपसाठी तुमच्या मेकअप किटमध्ये हे साहित्य असायलाच हवं.

  • मेकअप प्रायमर
  • फाऊंडेशन
  • कन्सिलर किट
  • सेटिंग पावडर
  • मस्कारा
  • वॉटरप्रूफ आय लायनर
  • आय पेन्सिल
  • आयशॅडो पॅलेट
  • मेकअप ब्रश सेट
  • ब्युटी ब्लेंडर
  • ब्रॉंझर
  • हायलाईटर
  • सेटिंग स्प्रे 
  • टिश्यू
  • मेकअप रिमूव्हर
  • हेअरस्टाईलसाठी लागणारे साहित्य

ADVERTISEMENT

ब्रायडल मेकअप स्वतः करण्यासाठी खास टिप्स –

  • ब्रायडल लुकमध्ये तुमच्या मेकअपप्रमाणेच तुमची हेअरस्टाईलही आकर्षक असणं गरजेची आहे. यासाठीच एक ते दोन दिवस आधी केसांना डीप कंडिशनिंग करा.  ज्यामुळे तुमचे केस हेअरस्टाईल केल्यावर चांगले दिसतील. मेकअप करण्यापूर्वी आधी तुमची हेअर स्टाईल करून घ्या म्हणजे त्यानुसार तुम्हाला मेकअप करणे सोपे जाईल.
  • मेकअपसाठी कोणत्या साहित्यासाठी कोणता ब्रश वापरतात याची माहिती घ्या. ज्यामुळे तुमचा लुक चांगला होण्यास मदत होईल. पण जर तुम्हाला मेकअप ब्रश वापरणे कठीण वाटत असेल तर ब्युटीू ब्लेंडर अथवा बोटांनी फाऊंडेशन, कन्सिलर चेहऱ्यावर लावा. फाऊंडेशन, करेक्टर, कन्सिलर त्वचेवर योग्य पद्धतीने ब्लेंड होईल याची काळजी घ्या.
  • तुमच्या लग्नाच्या पेहरावानुसार कसा मेकअप तुम्हाला सूट होईल याची ट्रायल आठ ते दहा दिवस आधीपासून स्वतःवर घेण्यास सुरूवात करा. ज्यामुळे तुमच्या हाताला मेकअपची सवय होईल आणि लग्नाच्या दिवशी तुम्हाला मेकअप करणं सोपं जाईल. 
  • ब्रायडल मेकअपसाठी तुमच्या स्कीन टोननुसार योग्य फाऊंडेशनची निवड करा. यासाठी तुम्ही वापरत असलेलं नेहमीचं फाऊंडेशन निवडा कारण नवीन प्रकार ट्राय करणं फायद्याचं ठरेलच असं नाही. 
  • जर तुमच्या लग्नाचे विधी सकाळी असतील तर हलक्या रंगसंगतीचा मेकअप करा. मात्र जर विधी रात्रीचे असतील तर डार्क शेड्स वापरण्यास काहीच हरकत नाही.  
  • आयलायनर वॉटरप्रूफ आहे का याची खात्री करा. कारण कोणत्याही भावूक क्षणी जर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं तर तुमचा मेकअप खराब होऊ शकतो. शिवाय तुमच्यासोबत मेकअप आर्टिस्ट नसल्याामुळे तुम्हाला तो पटकन नीटही करता येणार नाही. तसंच लिक्विड ऐवडी जेल आयलायनरची निवड करा कारण ते जास्त काळ टिकेल.
  • लग्नात चेहऱ्याप्रमाणे मान, पाठ आणि हातही सुंदर दिसावेत यासाठी तुमच्या मॉईश्चराईझरमध्ये हायलायटर मिसळा आणि ते या भागांवर लावा. ज्यामुळे तुम्हाला एक नॅचरल ग्लो मिळेल. 
  • ब्रायडल मेकअप करताना तुम्ही जो मस्कारा निवडणार आहात तो जास्त जुना वापरू नका. जास्तीत जास्त तीन महिने जुना मस्कारा तुम्ही वापरू शकता. शिवाय तोही वॉटरप्रूफ असेल याची खात्री करून घ्या.
  • जर तुमची त्वचा तेलकट प्रकाराची असेल तर मेकअप करण्यापूर्वी फेस क्लिंझरने ती स्वच्छ करून घ्या. ज्यामुळे बराच वेळ तुमची त्वचा कोरडी राहील. 
  • जर तुमचे ओठ मोठे आणि जाड असतील तर लग्नात लाल, मरून अशा लिपस्टिकची निवड करा. मात्र जर तुमचे ओठ पातळ आणि छोटे असतील तर तुम्ही पिच अथवा पिंक कलरची लिपस्टिक निवडू शकता. 
  • आयमेकअप उठून दिसण्यासाठी कलर करेक्टर  अथवा कन्सिलरने डार्क सर्कल्स अथवा पिंगमेंटेशन  झाकून टाका. तुमच्या लग्नाच्या कपड्यांच्या रंगानुसार आयशॅडोची निवड करा. 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)

ADVERTISEMENT

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)

10 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT