सिल्क अथवा नाजूक पोताचे कपडे साबणाने न धुता ते फक्त 'ड्राय क्लीन' करणं गरजेचं असतं. अशा कपड्यांवर 'ड्राय क्लीन ओन्ली' असं लेबल लावलेलं असतं. मात्र कपडे ड्राय क्लीन साठी दिल्यावर ते तसेच चमकदार राहत नाहीत असा अनेकांचा अनुभव असेल. बऱ्याचदा ड्राय क्लीनसाठी कपडे अथवा महागड्या साड्या लॉंड्रीमध्ये दिल्यावर त्या खूपच फिक्या रंगाच्या आणि जुनाट दिसू लागतात. महागड्या कपड्यांवर ड्राय क्लीन करण्यासाठी एकतर खूप पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे अशा प्रकारे जर तुमचे महागडे कपडे आणि ड्राय क्लीनसाठी लागणारे पैसे दोन्ही वाया गेले तर नक्कीच वाईट वाटतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत घरच्या घरी कपडे कसे ड्राय क्लीन करावेत.
कपड्यांना पाणी न लावता ते ड्राय वॉश करणे म्हणजे ड्राय क्लीन असा एक समज आहे. मात्र ड्राय क्लीन म्हणजे कपड्यांच्या रेशमी धाग्यांचे नुकसान न करता अथवा त्यांचा रंग आणि चमक कमी न करता ते वॉष करणे. खरंतर ड्राय क्लीन केल्यामुळे तुमचे जुने कपडेही नव्याप्रमाणे चमकू शकतात. ड्राय क्लीन दोन प्रकारे केलं जातं. एक वेट ड्राय क्लीन आणि दुसरं ड्राय क्लीन. तुम्हाला कोणत्या कपड्याचे वेट ड्राय क्लीन करायचं आहे आणि कोणत्या कपड्यांचे ड्राय क्लीन करायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. जे कपडे रंगहीन आहेत त्यांना तुम्ही वेट ड्राय क्लीन करू शकता. रंगीत आणि वर्क केलेले कपडे मात्र तुम्हाला फक्त ड्राय क्लीनच करायला हवेत.
आम्ही दिलेल्या या टिप्सचा तुम्हाला कसा फायदा झाला आणि तुम्ही कपडे घरी ड्राय क्लीन केले का हे आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा -
पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)