नॅचरल मेकअप लुकला नो मेकअप (No Makeup) लुक असंही म्हणतात. असा नो मेकअप लुक मिळवणं अगदी सोपं आहे. काही सोप्या टिप्स आणि स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा नॅचरल मेकअप करू शकता. शिवाय हा मेकअप करण्यासाठी जास्त वेळ आणि महागडं मेकअप साहित्य लागत नाही. तुम्ही दररोज कॉलेज अथवा ऑफिसला जाण्यासाठी हा मेकअप करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या मेकअपसाठी मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाईलिस्ट अथवा ब्युटी एक्पर्टच्या मदतीची गरज नसते. त्यामुळे एखादा साधा मेसी बन बांधा अथवा केस मोकळे ठेवा आणि या मेकअपने नॅचरल दिसा. नो मेकअपसाठी या सोप्या स्टेप्स आणि टिप्स फॉलो करा.
कोणत्याही मेकअपची सुरूवात करण्याआधी तुमचं स्किन केयर रूटीन अवश्य फॉलो करा. त्वचेची निगा राखण्यासाठी दररोज या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे. नो मेकअप लुक मिळवण्यासाठी स्किन केयर रूटीन हे फार फायद्याचं ठरू शकतं. कारण स्किन केअर रूटीनमुळे तुमची त्वचा मुळापासून निरोगी आणि चमकदार होते. म्हणूनच नैसर्गिक लुक मिळवण्यासाठी ही तुमची एक फर्स्ट स्टेप ठरू शकते. तेव्हा जर तुम्हाला नो मेकअप लुक आवडत असेल तर दररोज क्लिझिंग, टोनिंग, मॉईच्शराईझिंग करून तुमच्या त्वचेची काळजी घ्या.
आम्ही तुम्हाला स्किन केयर टिप्समध्ये वारंवार सांगत असतो की, चांगल्या प्रकारचं सनस्क्रीन निवडा आणि त्याचा नियमित वापर करा. अगदी घरात असतानादेखील तुम्ही त्वचेवर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. सनस्क्रीनमुळे सुर्यप्रकाशातील अतीनिल किरणे, टिव्ही अथवा मोबाईलमधून निघणारी प्रकाशकिरणे यांपासून तुमच्या त्वचेचं रक्षण होतं. म्हणून तीस पेक्षा जास्त SPF असलेल्या सनस्क्रीनची तुमच्या त्वचेसाठी निवड करा. नो मेकअपसाठी त्वचा सनस्क्रीनने सुरक्षित केलेली असणं गरजेचं आहे. नाहीतर काळवंडलेल्या त्वचेमुळे तुम्हाला नो मेकअप लुक मिळवणं शक्य होणार नाही
चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप करण्याआधी त्वचेला एखाद्या चांगल्या प्रायमरने सुरक्षित करणं गरजेचं आहे. स्किन केयर रुटिन फॉलो केल्यावर म्हणजेच त्वचेवर मॉश्चराईझर आणि सनस्क्रीन लावल्यावर चेहऱ्यावर प्रायमर लावा. प्रायमर तुम्हाला नो मेकअप लुकसाठी मदत करतं. कारण यामुळे तुमची त्वचा सौम्य आणि परफेक्ट दिसू लागते. अशा त्वचेवर अगदी कमी मेकअप साहित्य वापरले तरी चालू शकते. शिवाय प्रायमरमध्ये तुम्ही केलेला मेकअर जास्त काळ टिकण्यास मदत होते. बाजारात विविध प्रकारचे प्रायमर्स आहेत. तुम्ही यातील एखादे यासाठी नक्कीच निवडू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रायमर निवडा. तुम्हाला मॅट फिनिश लुक देणारे, चेहऱ्यावर चमक आणणारे, त्वचा हायड्रेट ठेवणारे असे विविध प्रकार यात तुम्हाला मिळतात.
नो मेकअप लुकसाठी फाऊंडेशन वापरायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असू शकतो. कारण फाऊंडेशन न वापरता अथवा कमी प्रमाणात वापरून नो मेकअप करता येतो. तुम्ही फाऊंडेशनच्या ऐवजी चांगलं कव्हरेज देणारी एखादी बीबी क्रीमदेखील वापरू शकता. तुम्हाला जर थोडं जास्त कव्हरेज हवं असेल पण फाऊंडेशन वापरायचं नसेल तर सीसी क्रीमचा वापर करा. बाजारात नो मेकअप लुकसाठी फाऊंडेशनला अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
खरंतर नो मेकअपसाठी फाऊंडेशन अथवा कन्सिलर न वापरणं हेच उत्तम. पण जर तुम्हाला चेहऱ्या काही ठिकाणी त्याचा वापर करायचाच असेल तर तो युक्तीने करा. तुमचे डार्क सर्कल्स अथवा पिगमेंटेशन झाकण्यासाठई काही प्रमाणात तुम्ही कन्सिलर वापरू शकता. त्यासाठी एखाद्या चांगल्या अंडर आय कन्सिलरची निवड करा.
योग्य कन्सिलरची निवड करायची आहे मग हे वाचाच
भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम कन्सिलर (Best Concealer For Indian Skin)
नो मेकअप लुकमध्ये चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसण्यासाठी तुम्ही नेहमीचं हायलाईटर वापरायलाच हवं असं मुळीच नाही. तुम्ही इल्युमिनेटर (Illuminator) नेही तुमच्या चेहऱ्यावल ग्लो आणू शकता. खरंतर यामुळे तुमचा लुक फारच नॅचरल वाटेल. हायलाईटरपेक्षा यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसू लागेल. एखाद्या चांगल्या इल्युमिनेटरने तुमच्या चेहऱ्यावरील हाय पॉईंट हायलाईट करा. चांगल्या परिणामासाठी तुम्ही ते तुमच्या मॉईच्शराईझिंग क्रीमध्येही मिसळू शकता.
डोळे सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही क्रीम आयशॅडो वापरू शकता. कारण या क्रीम आयशॅडो वापरण्यासाठी फारच सोप्या असतात. शिवाय त्या उत्तम पद्धतीने डोळ्यांवर ब्लेंड होतात. तुम्ही या आयशॅडो अगदी आरशामध्ये न बघताही तुमच्या डोळ्यांवर लावू शकता. मात्र जर तुमची त्वचा तेलकट प्रकारची असेल तर या क्रीम आयशॅडो वापरण्यापूर्वी आयशॅडो प्रायमर आधी वापरा. ज्यामुळे तुमची आयशॅडो लवकर खराब होणार नाहीत.
नॅचरल अथवा नो मेकअप लुकसाठी तुमच्या आयब्रोज आणि पापण्या सुंदर आणि नैसर्गिक दिसणं खूपच गरजेचं आहे. यासाठीच तुमच्या आयब्रोज जाड दिसतील याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही आयब्रोजवर एखादं जेल वापरू शकता. आयब्रो ब्रशने त्या व्यवस्थित करा. पापण्या दाट दिण्यासाठी तुम्ही आयलॅश कर्लरचा वापर करू शकता.
डोळ्यांच्या पापण्या खुलून दिसाव्या यासाठी तुमच्या मेकअपमधील एक सोपी युक्ती म्हणजे मस्काराचा वापर योग्य पद्धतीने करणे. यासाठी अशा मस्काराची निवड करा ज्यामुळे तुमच्या पापण्या जाड आणि लांब दिसतील. नॅचरल आणि नो मेकअपसाठी क्लिअर अथवा ट्रान्सफरंट मस्कारा वापरणं फायद्याचं राहिल.
नॅचरल लुकसाठी पावडर ब्लशपेक्षा क्रीम ब्लश वापरणं नक्कीच फायद्याचं ठरेल. यासाठी नो मेकअप करताना ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा. क्रीम ब्लश वापरताना काही टेकनिक माहीत असणं फार गरजेचं आहे. हे ब्लश वापण्याससाठी ब्रशऐवजी बोटांचा वापर करा. ज्यामुळे तुम्हाला हवा तसा नो मेकअप लुक नक्कीच मिळेल. पावडर ब्लश वापरणार असाल चांगल्या परिणामासाठी संपूर्ण चेहऱ्यावर ब्लश लावा.
नो मेकअप पुर्ण करण्यासाठी शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिप कलर. या लुकसाठी तुम्ही लिपस्टिक अथवा लिप कलरचा वापर करण्याऐवजी लिप बामचा वापर करू शकता. आजकाल अनेक रंगांमध्ये लिप बाम बाजारात मिळतात. त्यामुळे ओठांवर तुमच्या कपड्यांच्या रंगसंगतीनुसार लिप बाम लावा. तुम्हाला परफेक्ट नॅचरल लुक हवा असेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिकही लावू शकता.
न्यूड लिपस्टिकबाबत जाणून घेण्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल -
तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्या 'या' न्यूड लिपस्टिक (Best Nude Lipstick Shades)
1. नो मेकअप लुकसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यक्ता आहे?
नो मेकअप लुकसाठी तुम्हाला तुमच्या स्किन केअर प्रॉडक्ट आणि वर दिलेल्या मेकअप साहित्याची गरज लागेल. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मेकअप प्रॉडक्ट कमीत कमी वापर करून हा मेकअप करू शकता.
2. मेकअप न करता चेहऱ्यावर ग्लो कसा मिळवावा ?
मेकअपशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी चेहऱ्याची योग्य निगा राखा, भरपुर पाणी प्या आणि सतुंलित आहार घ्या. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदार होईल.
3. नॅचरल मेकअप लुक म्हणजे काय ?
नैसर्गिक घटक असलेले प्रॉडक्ट वापरून केलेल्या मेकअपला नैसर्गिक अथवा नॅचरल लुक मेकअप म्हणतात. आजकाल या लुकलाच नो मेकअप लुक असं म्हणतात. ज्यामध्ये मेकअप साहित्याचा अगदी कमीत कमी वापर केलेला असतो.
4. फाऊंडेशन न वापरता मेकअप कसा करावा ?
नो मेकअपमध्ये फाऊंडेशनचा वापर केला जात नाही. फाऊंडेशनचा वापर न करता मेकअप करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे प्रायमर, बीबी क्रीम अथवा सीसी क्रीम वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स, डाग लपवता येतील.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा -
विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड (Cruelty Free Makeup Brands In Marathi)