ADVERTISEMENT
home / Friends
खऱ्या मित्रांची ओळख पटते या गुणांवरुन.. जाणून घ्या कसे

खऱ्या मित्रांची ओळख पटते या गुणांवरुन.. जाणून घ्या कसे

आयुष्यात एकतरी मित्र असावा असे म्हणतात ते खरं आहे. आपल्या कुटुंबासोबतच एक व्यक्ती आपल्याला अशी लागते जिच्यासोबत आपण आपल्या मनातील सगळे काही शेअर करु शकू. अशी व्यक्ती जी तुम्हाला तुमच्या कोणत्याही गुणांवरुन तोलणार नाही… जी तुम्हाला प्रत्येक घडीला तुम्हाला साथ देईल. अशी ही एकमेव व्यक्ती म्हणजे ‘मित्र/ मैत्रीण’. काही जणांच्या आयुष्यात अशी व्यक्ती एकच असते. तर काहींचा मात्र मित्रमैत्रिणींचा घोळका असतो. पण या घोळक्यातही अशी एक व्यक्ती असते जी खूप खास असते. तिच्या/ त्याच्यासोबत तुम्ही तुमचे आयुष्य कोणत्याही ‘फिल्टरशिवाय’ जगत असता. थोडासा बुद्धीला जोर द्या आणि तुमच्या आयुष्यातील अशी व्यक्ती कोण याचा शोध घ्या. कारण तुमच्या खऱ्या मित्रांची ओळख हेच खास गुण करुन देत असतात. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने आपण आज खऱ्या मित्रांची ओळख पटवून देणाऱ्या गुणांविषयीच जाणून घेणार आहोत.

या फ्रेंडशिपला करा आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी काहीतरी खास

अत्यंत विश्वासू

सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुण जो खऱ्या मित्रांमध्ये असतो तो म्हणजे ‘विश्वास’ मित्रांचा किंवा मैत्रिणींचा कितीही घोळका आपल्या आजुबाजूला असला तरी तुम्ही त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवता जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या सगळ्यात जवळची वाटते. त्याच्यासोबतच सगळे काही शेअर करताे. तुमच्यासोबत असलेल्या कोणत्या मैत्रिणीसोबत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली आहे आणि त्या मित्र किंवा मैत्रिणीने त्या घटनेवरुन किंवा त्या गोष्टीवरुन तुमच्याबद्दल कोणतीही मत तयार न करता तुम्हाला कायम पाठिंबा दिला आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात खरा मित्र किंवा खरी मैत्रीण म्हणून असते. जी तुमच्या गोष्टी ऐकून घेते. ती कोणालाही न सांगता तुमच्यावर विश्वास ठेवते तीच तुमच्या आयुष्यातील फ्रेंड या कॅटेगिरीमध्ये बसणारी असते. त्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्हाला तुमचा खरा मित्र कोण हे ओळखायचे असेल तर या पारड्यात कोण फिट बसते ते पाहा.  

#ZodiacFriends: राशीवरून ठरवा तुमचे मित्रही आहेत का अशाच स्वभावाचे

ADVERTISEMENT

स्पर्धा नाही निखळ मैत्री

निखळ मैत्री

Instagram

जगात आलेल्या प्रत्येकाची दुसऱ्याशी स्पर्धा असते. एकमेकांहून सरस होण्यासाठी ही स्पर्धा सगळीकडे सुरु असली तर खऱ्या मित्रांमध्ये ही स्पर्धा कधीच होत नाही. कितीही एका ठिकाणी काम करणारे किंवा करिअरचा एकच मार्ग निवडलेले मित्र खरे असतील तर ते स्पर्धा करत नाहीत. तुम्हाला मिळालेल्या यशाचा आनंद हा सगळ्यात जास्त त्या व्यक्तिला असतो. हेच निखळ मैत्रीचे लक्षण आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरुन तुम्हाला तुमच्या खऱ्या मित्रांची ओळख पटत असते. तुमच्याकडे असलेली एखादी गोष्ट त्याच्याकडे का नाही? किंवा सतत तुलना करणारी व्यक्ती तुमच्या खऱ्या मित्रांच्या प्रमाणात बसत नाही. उलट तुम्ही मिळालेल्याचा मनापासून आनंद व्यक्त करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील खास व्यक्ती असते.

स्पष्ट वक्तेपणा

अनेकदा मैत्रीमध्ये कटुता येते ती स्पष्टवक्तेपणामुळे. पण तुमच्या मित्रांमधील हाच गुण सगळ्यात जास्त गरजेचा असतो. तुम्ही चुकता हे सांगण्याची हिंमत ज्या मित्रामध्ये असते.ते मित्र तुमची अधिक काळजी करणारे असतात. तुम्ही एखादी गोष्ट चुकत असाल तर तुमच्या मित्रांना तुम्हाला समजावून सांगण्याचा पूर्ण अधिकार असतो. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाबद्दल त्यांना शंका असेल तर ते तुम्हाला तसे बोलून दाखवतात. कधी कधी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा त्रास तुम्हाला होत असेल पण निर्णय घेताना जे तुम्हाला त्यांचे स्पष्ट मत देतात आणि तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतात तेच तुमचे खरे मित्र असतात.

ADVERTISEMENT

जागतिक मैत्री दिन साजरा करा या मैत्री स्टेटसने

दु:खातही असतात सोबत

दु:खातही असतात सोबत

Instagram

आयुष्यात आनंदाच्या प्रसंगी सगळेच तुमच्या मागे उभे असतात. खरी गरज ही आपल्याला पडत्या काळात असते. तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे काय नाही याचा विचार खरा मित्र कधीच करत नाही. तुमच्यासाठी अगदी कोणत्याही प्रसंगी तुमची ढाल बनून राहण्यासाठी तुमचे खरे मित्र तत्पर असतात. ते तुमच्या पाठीशी कायम असतात.तुमच्या आयुष्यातील चढ- उतार ज्याने पाहिलेले असतात. तुमच्या मरगळलेल्या आयुष्याला पुन्हा उभारी देण्यासाठी मित्र कायमच झटत असतात. 

ADVERTISEMENT

तुम्ही ज्यांना मित्र मानता ते खरंच असे आहेत का ते बघा. कारण खऱ्या मित्राची ओळख त्याच्यातील गुणांवरुन होत असते. तुम्हीही एखाद्याचा चांगला मित्र होऊ इच्छित असाल तर तुमच्यामध्येही हे गुण असायला हवेत तरच तुमची मैत्री टिकून राहील.

30 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT