दूध पावडरने येईल चेहऱ्यावर ग्लो, असा करा वापर

दूध पावडरने येईल चेहऱ्यावर ग्लो, असा करा वापर

चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण अनेक सौदर्योपचार करत असतो. मात्र कधीकधी यासाठी बाजारातील महागड्या क्रीमपेक्षाही उपयुक्त वस्तू तुमच्या घरातच तुम्हाला मिळू शकतात. ज्याप्रमाणे दूध अथवा दुधाच्या सायीचा तुम्ही स्कीन केअरसाठी वापर करता अगती त्याचप्रमाणे तुम्हाला दुधाची पावडरही सौंदर्योपचारासाठी वापरता येऊ शकते. अनेकांना याबाबत नक्कीच माहीत नसेल यासाठी आम्ही ही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत. चेहऱ्यावरील डाग, व्रण आणि काळेपणा कमी करण्यासाठी तसंच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्ही दुधाची पावडर वापरू शकता. यासाठी असा वापर करा दूध पावडरचा

दूध पावडर आणि लिंबाचा रसाचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर 
 • लिंबाचा रस

एका भांड्यामध्ये दुधाची पावडर आणि लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करा. चेहरा आणि मानेवर ते मिश्रण एकसमान पद्धतीने लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. हा उपाय नियमित केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि काळेपणा कमी होईल आणि त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागेल.

Shutterstock

Beauty

Total Makeover FF Cream Foundation Palette - Dusky

INR 1,450 AT MyGlamm

दूध पावडर, पपईचा गराचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर
 • पपईचा गर
 • गुलाबपाणी

चेहऱ्यावरील डाग आणि व्रणांमुळे तुमच्या त्वचेतील नैसर्गिक चमक झाकली जाते. मात्र या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग दूर होतील आणि चेहरा चमकदार दिसू लागेल. यासाठी एक चमचा मिल्क पावडर, एक चमचा पपईचा गर आणि काही थेंब गुलाबपाणी मिक्स करा आणि एकजीव फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावून पंधरा ते वीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका.

Shutterstock

दूध पावडर आणि मुलतानी मातीचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर
 • मुलतानी माती
 • गुलाबपाणी 

एक चमचा मिल्क पावडर आणि दोन चमचे मुलतानी माती घ्या . यामध्ये गुलाबपाणी मिसळा आणि एकजीव पेस्ट तयार करा. वीस मिनीटे  चेहऱ्यावर हा पॅक ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येऊ शकतो. 

दूध पावडर आणि केसराचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर
 • केसर
 • गुलाबपाणी

एक चमचा दुधाची पावडर आणि दोन तीन केसराच्या पाकळ्या एकत्र करा आणि गुलाबपाण्याने त्याची एक पेस्ट तयार करा. वीस मिनीटे चेहऱ्यावर हा पॅक ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा.

दूध पावडर आणि मधाचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर
 • मध

दुधाची पावडर, मध एकत्र करून एक छान फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर आणि मानेवर तो लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहरा धुवून टाका. या पॅक मुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स आणि काळे डाग कमी होतील. 

Shutterstock

दूध पावडर आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक -

साहित्य -

 • दूध पावडर
 • तांदळाचे पीठ
 • मध

चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सुरकुत्या कमी करण्यााठी दूध आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी फायद्याच्या आहेत. यासाठी दुधाची पावडर आणि तांदळाची पावडर एकत्र करा. त्यात थोडं मध टाका आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. वीस ते पंचवीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. 

Shutterstock