प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. भारतात घरोघरी तयार केले जाणारा हा काढा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. एवढंच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काढ्याची उपयुक्तता वारंवार त्यांच्या भाषणातून लोकांसमोर मांडली आहे. त्यामुळे हा आयुर्वेदिक काढा फक्त तुमचा सर्दी, खोकलाच बरा करतो असं नाही. तर कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्तीही वाढवतो. आम्ही तुमच्यासोबत काढा तयार करण्याच्या काही सोप्या रेसिपीज आणि त्यातील घटकांचे फायदे शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला काढा पिण्याचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल. 

Table of Contents

  आयुर्वेदिक काढा प्रकार 1

  आयुर्वेदिक काढ्याचा हा पहिला प्रकार आयुष मंत्रालयाने सुचवलेला आहे. हा काढा रोज पिण्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुम्ही सक्षम होता

  काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य -

  • पंधरा  ते वीस तुळशीची पाने
  • एक चमचा दालचिनी पावडर
  • दोन चमचे सुंठ
  • एक चमचा काळीमिरी पावडर

  काढा तयार करण्याची कृती -

  तुळशीची पाने सुकवून त्याची पावडर करा. त्यात दालचिनी पावडर, सुंठ आणि काळीमिरी पावडर मिसळून त्याचे एकत्र मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या तीन तीन ग्रॅमच्या टी बॅग अथवा 500 मिली ग्रॅमच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एकदा अथवा दोनदा तुम्ही 150 मिलीलीटर पाण्यातून हे मिश्रण चहाप्रमाणे घेऊ शकता. 

  Instagram

  आयुर्वेदिक काढा प्रकार 2

  कोविड 19 मध्ये इनफेक्शन टाळण्यासाठी या काढ्याचा वापर अनेकांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी  बिनधास्तपणे हा  काढा घेऊ शकता. 

  काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य -

  • पाच ते सहा तुळशीची पाने
  • एक ते दोन वेलची
  • कच्ची हळद
  • एक चमचा लवंग
  • एक चमचा काळीमिरी
  • एक दालचिनीचा तुकडा
  • आल्याचा तुकडा 
  • चार ते पाच मनुका 
  • एक मोठा खडी साखरेचा तुकडा ( पत्री खडी साखर)


  काढा करण्याची कृती -

  हळद धुवून किसून घ्या आणि आल्याचा रस काढून घ्या. अर्धा कप हळदीचा रस आणि चार ते पाच चमचे आल्याचा रस चार कप पाण्यात उकळत ठेवा. हळद आणि आल्यामुळे हे पाणी पिवळे दिसू लागेल. पाच ते सहा मिनीटांनी इतर सर्व साहित्य त्यात टाका. पंधरा ते वीस मिनीटे पाणी उकळल्यावर त्याचे प्रमाण आटून अर्धे होईल आणि काढा तयार होईल. दररोज एक कप काढ्यामध्ये एक चमचा मध मिसळा आणि कोमट असतानाच काढा प्या. 

  Instagram

  आयुर्वेदिक काढा प्रकार 3

  कोविड 19 मध्ये इनफेक्शन टाळण्यासाठी या काढ्याचा वापर अनेकांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी  बिनधास्तपणे हा  काढा घेऊ शकता. 

  काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य -

  • पाच ते सहा तुळशीची पाने
  • एक ते दोन वेलची
  • कच्ची हळद
  • एक चमचा लवंग
  • एक चमचा काळीमिरी
  • एक दालचिनीचा तुकडा
  • आल्याचा तुकडा 
  • चार ते पाच मनुका
  • एक मोठा खडी साखरेचा तुकडा ( पत्री खडी साखर)

  काढा करण्याची कृती -

  हळद धुवून किसून घ्या आणि आल्याचा रस काढून घ्या. अर्धा कप हळदीचा रस आणि चार ते पाच चमचे आल्याचा रस चार कप पाण्यात उकळत ठेवा. हळद आणि आल्यामुळे हे पाणी पिवळे दिसू लागेल. पाच ते सहा मिनीटांनी इतर सर्व साहित्य त्यात टाका. पंधरा ते वीस मिनीटे पाणी उकळल्यावर त्याचे प्रमाण आटून अर्धे होईल आणि काढा तयार होईल. दररोज एक कप काढ्यामध्ये एक चमचा मध मिसळा आणि कोमट असतानाच काढा प्या. 

  Instagram

  काढयामध्ये असलेले औषधी घटक आणि फायदे (Benefits of Ingredients Used in Kadha In Marathi)

  या काढ्यांसाठी जे पदार्थ वापरण्यात आलेले आहेत त्या प्रत्येकाचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरावर होतात. कारण त्यांच्यामध्ये असलेले नैसर्गिक आणि औषधी घटक तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात.

  तुळशीची पाने (Tulsi Leaves)

  तुळशीमध्ये अनेक औषधी घटक असतात. यासाठीच तुळशीला अमुल्य वनस्पती अथवा पवित्र वनस्पतीचा  दर्जा मिळालेला आहे. तुळचीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, फिरोफिल, झिंक, ओमेगा 3. मॅग्नेशियम, मॅगनीज असते. ज्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल  गुणधर्म असतात. त्यामुळे इनफेक्शनचा धोका नक्कीच कमी होतो. नियमित तुळशीची पाने चघळल्यामुळे अथवा काढ्यातून त्याचा रस घेतल्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते. 

  Shutterstock

  वेलची (Cardamom)

  हिरव्या अथवा मोठ्या काळ्या रंगाच्या वेलचीचा वापर अन्नपदार्थांची रूची वाढवण्यासोबतच औषध म्हणूनही केला जातो. वेलची गरम असल्यामुळे तिचा वापर काढ्यासाठी केला जातो. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला अथवा इनफेक्शन होत नाही. काढ्याप्रमाणेच चहामध्येही वेलची टाकल्यामुळे घशाला  आराम मिळू शकतो. 

  Shutterstock

  कच्ची हळद (Raw Turmeric)

  हळद ही अनेक आजारांवर गुणकारी समजली जाते. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला झाल्यास हळदीचे दूध अथवा चहा घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे हळद काढ्यांमध्येही वापरली जाते. कच्चा हळदीमुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. आजारपणापासून दूर राहण्यासाठी अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असलेली कच्ची हळद काढ्यातून घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

  Shutterstock

  लवंग (Cloves)

  सर्दी खोकला झाल्यास तोंडात लवंग ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण लवंगमुळे खोकल्याची उबळ कमी होते. लवंगेमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट असतात. शिवाय ती अॅंटि व्हायरलही आहे त्यामुळे व्हायरल तापापासूनही तुमचे यामुळे संरक्षण होऊ शकते. यातील पोषक घटकांमुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्हाला आजारांशी लढणे सोपे जाते. यासाठी आयुर्वेदिक काढ्यामध्ये लवंग आवर्जून वापरावी.

  Shutterstock

  काळी मिरी (Black Pepper)

  काळी मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्सदेखील असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी 6 चं भरपूर प्रमाण आहे. या विटामिन्सशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हेदेखील सापडतं. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. या सर्व पोषकतत्वांमुळेच तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच काढ्यामध्ये काळी मिरीचा वापर जरूर करावा. 

  Shutterstock

  दालचिनी (Cinnamon)

  दालचीनी नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. दालचिनीमधील अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. सध्या  कोरोनापासून लढण्यासाठी दालचिनीचा वापर चहातूनही करावा असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे इनफेक्शनपासून वाचवणारी दालचिनी आयुर्वेदिक काढ्यात असायलाच हवी. 

  Shutterstock

  आले अथवा सुंठ (Ginger or Dried Ginger)

  आल्याचा केवळ पदार्थांमध्ये चव आणण्यासाठीच नाही तर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही चांगला फायदा होतो. कारण  आल्यामध्ये सर्वाधिक मिनरल्स आणि महत्त्वाची विटामिन्स असतात. तसंच आरोग्य निरोगी राखण्यासाठी यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटकांचा जास्त उपयोग होत असतो. आल्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, पोटॅशियम, मॅंगनीज, डाएटरी फायबर, कॉपर, लोह हे सगळे घटक असतात. जे तुमच्या शरीराला निरोगी ठेवतात.  याबरोबरच आल्यामध्ये झिंक, पँटोथेनिक अॅसिडचाही अंश असतो. तुम्हाला यामधून अनेक पोषक तत्व मिळतात. तुम्हाला एका आल्यामुळे शरीरामध्ये आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. आलं सुकले की त्यापासून सुंठ केली जाते. त्यामुळे काढ्यासाठी तुम्ही आलं अथवा सुंठ काहिही वापरू  शकता. 

  Shutterstock

  काळया मनुका (Black Raisins)

  द्राक्ष सुकवून त्यापासून मनुका केल्या जातात. काळ्या मनुकांना आयुर्वेदामध्ये एक महत्वाचे स्थान आहे. कारण या मनुका शरीरासाठी अतिशय उपयुक्त  असतात. काळ्या मनुकांमध्ये प्रोटिन्स, कॉपर, आर्यन, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत आणि सुदृढ होते. काढ्यामध्ये मनुका टाकल्यामुळे काढ्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यातील औषधी घटक काढ्यात येतात. काढयातील इतर सर्व पदार्थ उष्ण असल्याने मनुका काढ्यात टाकल्याने काढा संतुलित राहतो. 

  Shutterstock

  खडी साखर अथवा पत्री खडी साखर (Rock sugar)

  काढ्यात वापरण्यात येणारे सर्व पदार्थ कडूसर चवीचे आणि उष्ण असतात. काढ्याची चव तोंडाला चांगली लागावी आणि त्यातील पोषक तत्त्व कमी होऊ नयेत यासाठी काढ्यात खडी साखर अथवा पत्री खडी साखरेचा वापर केला जातो. पत्री खडी साखर ही एक आयुर्वेदिक खडी साखर आहे ज्यामुळे जुनाट खोकला बरा होऊ शकतो. यासाठीच काढ्यासाठी पत्री खडीसाखरेचा वापर जरूर करा. 

  मध (Honey)

  मधामध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल घटकांमुळे किटाणूंना मारण्यासाठी याचा जास्त उपयोग करून घेता येतो. यामुळे शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते. सर्दी - खोकला यासाठी औषध म्हणून तुम्ही मधाचा चहामध्ये अथवा चाटण म्हणून करू शकता. काढ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काढ्यामध्ये मध टाकून पिण्याने चांगला फायदा होऊ शकतो. 

  Shutterstock

  गूळ (Jaggery)

  गूळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ ऊसापासून तयार केले जातात मात्र तरिही या दोन्ही पदार्थांचे शरीरावर होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात. गुळामुळे पदार्थ जितका गोड होतो त्यापेक्षा अधिक आरोग्यदायी होतो.  गुळ उष्ण असल्यामुळे त्यातून शरीराला पुरेशी उष्णता मिळते. गुळात व्हिटॅमिन्स, लोह, ग्लुकोज, चुना, फॉफ्सरस, पोटॅशियम पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे गुळ शरीरासाठी पौष्टिक पदार्थ समजला जातो. गुणाने घशामधील इनफेक्शन कमी होण्यास मदत होते. यासाठीच काढ्यामध्ये गुळाचा वापर तुम्ही करायला हवा. 

  आयुर्वेदिक काढ्याबाबत मनात असलेले प्रश्न (FAQs)

  1. आयुर्वेदिक काढा म्हणजे काय आणि कोरोना व्हायरसपासून पासून त्यामुळे कसे संरक्षण मिळते ?
  आयुर्वेदिक घटक आणि औषधी वनस्पतींचा वापर करून केलेल्या औषधी रसाला आयुर्वेदिक काढा असं म्हणतात. या काढ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी घटकांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते म्हणूनच यामुळे कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळते. 

  2. आयुर्वेदिक काढ्यामध्ये काय विशेष आहे ?
  आयुर्वेदिक काढ्यामध्ये औषधी आणि नैसर्गिक घटकांचा वापर केल्यामुळे हा काढा रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम ठरतो. सध्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी हा काढा घेणे गरजेचे आहे.

  3. आयुर्वेदिक काढ्याचे दुष्परिणाम होतात का ?
  आर्युर्वेदिक काढा आजारपणापासुन दूर ठेवतो. मात्र तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घ्यावा. अती प्रमाणात काढा घेतल्यास शरीरात अती उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पोटात दुखणे, जुलाब अथवा चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.