बाप्पाला का प्रिय आहे दुर्वा, माहीत आहे का याची गोष्ट

बाप्पाला का प्रिय आहे दुर्वा, माहीत आहे का याची गोष्ट

लवकरच आपल्या सर्वांच्या घरी आपल्या आराध्यदेवतेचे अर्थात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वांच्या घरी लगबग चालू झाली असणारच. बाप्पाच्या पूजेमध्ये सर्वात जास्त गरज भासते ती दुर्वांची. दुर्वा हा गणपतीला खूपच प्रिय असं समजण्यात येतं. अनादी काळापासून हा समज रूढ झाला आहे. जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जुडी गणपतीला नेहमीच वाहिली जाते. मात्र बाप्पाला नक्की दुर्वा का प्रिय आहेत यामागील कारण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? पिढ्यानुपिढ्या आपल्याला बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत हे सांगण्यात आलं आहे. पण त्याचं कारण मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं. तेच कारण या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बाप्पा हा सर्वांचंच आराध्यदैवत आहे. बाप्पाचं आगमन म्हणजे घरभर उत्साह आणि आनंद. बाप्पाला आनंदी ठेवण्यासाठी आपण त्याची पूजा अर्चा करताना त्याला दुर्वा समर्पित करतो. त्यामागे नक्की काय आहे कारण जाणून घेऊया. 

तुमच्या बाळासाठी अर्थासह आधुनिक श्री गणेशाची नावे (Lord Ganesha Names For Baby Boy)

दुर्वा वाहण्यामागची प्राचीन कथा

Shutterstock

गणपती बाप्पाला नक्की दुर्वा का वाहायची यासाठी एक प्राचीन कथा सांगण्यात येते. या कथेचा आधार घेऊनच बाप्पाला दुर्वा प्रिय असल्याचे समजण्यात येते. कोणे एके काळी पृथ्वीवर अनलासूर नावाच्या राक्षसाने उच्छाद मांडला होता. सामान्य नागरिकच नाही तर या राक्षसाने देवांनाही सळो की पळो करून सोडले होते. माणसांना जिवंतपणीच गिळून टाकण्यासारखं दुष्कृत्य हा महाभयंकर राक्षस करत होता. त्यावेळी सर्व देवांनी देवाधिदेव महादेवाकडे यातून सोडविण्यासाठी धावा केला. मात्र महादेवांनी या राक्षसाचा निःपात करणार नाही असं देवांना सांगितले. कारण या राक्षसाला मारण्यासाठी त्याला जिवंत गिळावे लागणार होते आणि हे काम लंबोदर अर्थात केवळ गणेशच करू शकेल असेल महादेवांनी सांगितले. त्यानंतर गणेशाची प्रार्थना देवांकडून करण्यात आली आणि अनलासूराला मारून टाकण्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने या प्रार्थनेचा स्वीकार करत राक्षसाचा संहार केला आणि त्याला गिळून टाकले. पण यामुळे गणेशाच्या पोटात भयानक आगीने दुखून लागले. कितीही उपाय करून ती आग थांबत नव्हती. शेवटी कश्यप ऋषींनी गणेशाला दुर्वांचा रस पिण्याचा सल्ला दिला. दुर्वांचा रस प्यायल्यानंतर गणेशाच्या पोटातील ही आग थंड झाली आणि तेव्हापासूनच गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय झाल्या. पुराणकथेत दुर्वांचा उल्लेख अशा तऱ्हेने करण्यात आला आहे. 

बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट

दुर्वा आहे औषधीय

नेत्र विकारांवर उपयुक्त

डोळ्यांसाठी दुर्वा फारच गुणकारी असल्याचं म्हटलं जातं.  जर तुम्हाला सतत डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे दुखत असल्यामुळे झोप न येणं असा त्रास होत असेल तर तुम्ही एका कापडात दुर्वा गुंडाळून तुम्ही ती त्या कापडाची पट्टी डोळ्यांवर बांधून ठेवू शकता. अनवाणी पायाने दुर्वांवर चालल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली राहते असंही सांगण्यात येतं. 

डोकेदुखी होते दूर

Shutterstock

अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. कामाचा  ताण, सततची दगदग, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. मात्र डोके दुखत असल्यास अनेकजण एखादी पेनकिलर अथवा डोक्यावर बाम लावतात. जर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम हवा असेल तर दुर्वांची पाने वाटून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. 

बाप्पाला वाहण्यात येणाऱ्या 'दुर्वां'ना आहे खास आरोग्यदायी महत्त्व

पशुंच्या दुधात होते वाढ

गाय,  बकरी अशा पशुंना दुर्वा खायला दिल्यास त्यांच्या दुधात अधिक वाढ होते. त्यामुळेच पावसाच्या दिवसात दुर्वांकुरमध्ये प्राण्यांना सोडले जाते. ताज्या दुर्वा खाऊन पशुंचे पोट साफ राहते आणि अधिक दूध मिळते. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा