ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

आपल्याकडे भारतीय परंपरेत उटण्याला खूपच महत्त्व आहे. उटणे केवळ फेसपॅकचे काम करत नाही तर आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचे कामही करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे केवळ चेहऱ्यावरच नाही तर त्वचेच्या प्रत्येक भागाला तुम्ही उटणं लाऊन त्याचा वापर करून घेऊ शकता. अगदी तुमच्या हातपायांसह, तुमचे खांदे अथवा संपूर्ण शरीराला उटणं लाऊन एक्सफोलिएट करता येतं. त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुमच्या नेहमीच्या रूटीनमध्ये तुम्ही इन्स्टंट उटण्याचा समावेश करून घ्यायला हवा. घरातील असलेल्या सामानापासून तुम्ही उटणं तयार करून घेऊ शकता. हे तुमच्या त्वचेसाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नक्कीच नाही. फक्त उटण्याचा वापर करताना यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश करा हे लक्षात ठेवा आणि तसंच तुम्हाला त्वचेची जी समस्या आहे त्या समस्येशीसंबंधित उटण्याचाच वापर करा. हे तुमच्या त्वचेसाठी अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल म्हणून काम करते. केवळ प्रदूषण आणि सनबर्नच नाही तर त्वचेच्या अन्य समस्यांवरही उटणे लाभदायक आहे. आम्ही तुम्हाला इथे तीन उटण्यांची माहिती देत आहोत. कसं बनवायचे आणि कसे वापरायचे हेदेखील आम्ही तुम्हाला सांगत आहोत.  तुम्ही याचा वापर करून नक्कीच त्वचेची समस्या दूर करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बनवणे सोपे आणि सहज आहे. इन्स्टंट उटण्याने करा तुमची समस्या दूर. 

1. अँटी-अॅक्ने उटणे

Shutterstock

तुमच्या त्वचेवर जर अॅक्नेचे डाग असतील आणि जर त्याने तुम्हाला त्रास होत असेल अथवा दिसायला खराब दिसत असेल तर हे उटणे तुमच्यासाठी योग्य आहे. सर्वात महत्त्वाचे  म्हणजे यामध्ये अशा घटकांचा वापर करण्यात आला आहे ज्यामध्ये अँटिबॅक्टेरियल घटक आहेत आणि जे तुमच्या त्वचेला नुकसानाही पोहचवत नाहीत. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे उटणं बनवून त्याचा वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 चमचा कडिलिंबाची पावडर
  • 3 चमचा चणे पावडर
  • 2 चमचे चंदन पावडर
  • चिमूटभर हळद
  • 2 चमचे किसलेली काकडी 

कसे बनवावे आणि वापरावे 

  • वरील सर्व साहित्या एका भांड्यांत मिक्स करून घ्या 
  • याची मध्यम स्वरूपाची पेस्ट तयार करून घ्या 
  • या मिश्रणाने चेहऱ्याला लाऊन मसाज करा आणि चेहऱ्यार अजिबात ताण देऊन मसाज न करता हलक्या हाताने मसाज करा 
  • जास्त रगडल्याने त्वचेचं नुकसान होतं आणि अॅक्ने फुटण्याचीही भीती असते त्यामुळे हलक्या हाताचा वापर करावा
  • काही वेळानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि टॉवेलने खसाखसा न पुसता तुम्ही चेहऱ्यावर पॅट करून पुसा.
  • तुम्हाला तुमची त्वचा अधिक चमकदार दिसून येईल आणि असं केल्यास, तुम्हाला अॅक्नेवरही परिणाम दिसून येईल

लॉकडाऊनच्या काळातही त्वचेवरील ग्लो कायम ठेवायचा आहे, मग करा हे नैसर्गिक उपाय

2. चेहरा उजळविण्यासाठी उटणे

ADVERTISEMENT

Shutterstock

बऱ्याचदा चेहऱ्यावर गडद काळे डाग पडतात. तुमच्या त्वचेवरही असे काळे डाग असतील आणि त्वचा काळवंडलेली दिसत असेल तर त्वचा उजळवण्यासाठी तुम्ही नेहमीच्या साबणाच्या ऐवजी या उटण्याचा वापर करू शकता. या उटण्याने पोअर्स कमी होतील आणि तुमची त्वचा उजळून तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल. 

साहित्य

  • 1 चमचा चंदन पावडर
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • 2 चमचे दूध
  • 2 चमचे बेसन 

कसे बनवावे आणि वापरावे

ADVERTISEMENT
  • सर्व साहित्य एकत्र करून जाडसर पेस्ट बनवून घ्या
  • तुम्हाला हवं असेल तर यात 1 चमचा गुलाबपाणीही मिसळून घेऊ शकता
  • हे इन्स्टंट उटणं संपूर्ण शरीराला लावा आणि कोमट पाण्याने आंघोळ करा
  • दोन ते तीन दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल 
  • हे तयार करणंही सोपं आहे आणि याचा वापर तुम्ही रोज करू शकता
  • आंघोळ करण्याच्या आधी रोज याचा वापर केल्यास तुमची संपूर्ण त्वचा उजळ होईल

त्वचेच्या संसर्गापासून हवी आहे सुटका, तर वापरा घरगुती उटणे

3. ड्रायफूट फेशियल उटणे

Shutterstock

इन्स्टंट ग्लो अर्थात त्वरीत उजळपणा हवा असेल आणि तुम्हाला फेशियल करण्याइतका वेळ नसेल तर तुम्ही ड्रायफूट फेशियल म्हणून  हे उटणे वापरू शकता. हे उटणे तुमच्यासाठी फेशियलप्रमाणे काम करते आणि यामध्ये बदाम, काजू, पिस्ता अन्य पदार्थ असल्याने त्वचा चांगल्या तऱ्हेने एक्सफोलिएट होते. त्वचा  एक्सफोलिएट करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 1 चमचा बदाम पेस्ट पावडर
  • 1 चमचा व्हीट जर्म ऑईल
  • 1 चमचा काजू पेस्ट 
  • 1 चमचा बेसन
  • 1 चमचा पिस्ता पेस्ट
  • पाव कप मसूर डाळ पेस्ट
  • 1 चमचा मलई
  • 1 चमचा गुलाबपाणी 

कसे बनवावे आणि वापरावे

  • हे उटणं सर्व मिश्रण करून बनविल्यावर तुम्ही संपूर्ण शरीराला लाऊ शकता 
  • तुम्ही आंघोळ करायला जाणार असलात तर त्याआधी अर्धा तास हे उटणं लावा आणि शरीर एक्सफोलिएट करा 
  • हे उटणं अतिशय उत्तम असून तुम्ही आठवड्यातून एक वेळ याचा उपयोग नक्की करून घेऊ शकता

घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी – तज्ज्ञांचा सल्ला

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

ADVERTISEMENT
21 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT