घरात राहूनही तुमची त्वचा काळवंडण्यामागे ही असू शकतात कारणं

 घरात राहूनही तुमची त्वचा काळवंडण्यामागे ही असू शकतात कारणं

काळवंडलेली त्वचा कोणालाच आवडत नाही. विशेषत: सध्याच्या कोरोना काळात घरी राहूनही अनेकांची त्वचा काळवंडलेली दिसते. घरात राहून आपला रंग छान उजळेल आणि त्वचा नितळ होईल ही अपेक्षा असणाऱ्यांना मात्र घरी राहूनही निराशा झाली आहे. पण तुमची त्वचा काळवंडण्यामागे इतरही काही कारणे असू शकतात.सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमची त्वचा काळवंडू शकते हेच एक त्वचा काळवंडण्यामागे कारण नाही. तर त्यामागेही अन्यही कारणे आहेत. जाणून घेऊया सध्याच्या काळात तुमची त्वचा काळवंडण्यामागे असलेली काही कारणं 

अॅपल सायडर व्हिनेगरचे उपयोग वाचून व्हाल थक्क

ब्लॅक हेड्स

Instagram

चेहरा काळवंडण्यामागे सगळ्यात महत्वाचे कारण असते ते म्हणजे ब्लॅक हेड्स. प्रत्येकाच्या त्वचेवर बारीक बारीक छिद्र असतात. विशेषत: चेहऱ्यावर असलेल्या छिद्रांना आपण ‘पोअर्स’ असे म्हणतो. तुम्ही कितीही घरी असला तरी तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्समध्ये वातावरणातील धूळ (सध्य स्थितीत घरातील हवेतून उडणारी धूळ जाण्याची शक्यता असते) घरातून बाहेर पडत नाही म्हणून आपण आपल्या त्वचेची फारशी काळजी घ्यायला पाहात नाही. त्यामुळे या पोअर्समध्ये घाण साचून चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स येऊ लागतात. त्यामुळे तुमची त्वचा हमखास काळवंडलेली दिसू लागते. त्यामुळे तुम्ही इतर दिवसांप्रमाणेच तुमची त्वचा स्क्रब, मॉश्चराईज करायला विसरु नका. या दिवसात वाफ घेत असाल तर ती वाफ घेऊन झाल्यानंतर चेहऱ्यावरील पोअर्स बंद करायलाही अजिबात विसरु नका.

अनियमित डाएट

घरी असल्यावर खाण्याचे लाड आपण सगळ्यांनीच पुरवून घेतले आहेत. आवडीचे चमचमीत पदार्थ खात सगळ्यांचेच दिवस सुरु आहेत. पण हे करत असताना खाण्याच्या वेळा आणि काय खातो याचा परिणामही तुमच्या चेहऱ्यावर अगदी हमखास होत असतो. तेलकट पदार्थ, फॅट असलेले पदार्थ तुमच्या त्वचेवरील हायड्रेशन कमी करतात. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी, शुष्क किंवा अति तेलकट दिसू लागते.हे पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे पोटाचे विकार सतावतात. त्याचाही त्रास त्वचेला होतो. घरी राहून तुमच्या आहारात जर फायबर असलेले पदार्थ म्हणज फळ नसतील तर तुम्ही त्याचे अधिकाधिक सेवन करा. चमचमीत पदार्थ टाळता येत नसतील तरी त्याचप्रमाणात शरीरात पाणी आणि फळही जाऊ द्या.

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल

अपुरी झोप

आरोग्याच्या एकूणच तक्रारींसाठी अपुरी झोप कारणीभूत असते. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेला आवश्यक असलेला आराम मिळत नाही.त्यामुळे तुमच्या त्वचेच्या तक्रारी कमी होण्यास वेळ लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हा अपुऱ्या झोपेचा परीणाम. अपुऱ्या झोपेचा त्रास हा तुम्हाला लगेच जाणवणार नाही. पण साधारण 15 दिवसांनी तुम्हाला तुमच्या त्वचेचा तजेला गेलेला दिसेल. तुमची त्वचा डल वाटू लागेल. यावर उपाय म्हणजे झोप पूर्ण घेणे. लॉकडाऊनच्या दिवसात अनेकांच्या झोपेचे गणित बदलून गेले आहे.पण झोप पूर्ववत करण्यासाठी शरीराला काहीतरी करायला लावा. व्यायाम करा, चाला, दोरीच्या उड्या मारा तुमचे शरीर थकले की, तुम्हाला आपसुकच झोप येईल. 

 

उन्हाची कमतरता

शरीराला आवश्यक असलेले ऊन सध्या आपल्याला मिळत नाही. ऊन घेण्यासाठीही आापण बाहेर जायला पाहात नाही. त्यामुळेही तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन D  मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जितका वेळ मिळत असेल तेवढ्या वेळात तुम्ही सकाळी उन्हात जाऊन बसा. म्हणजे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले ऊन मिळेल.

दुर्लक्ष

Instagram

त्वचेकडे दुर्लक्ष करणे कधीही चांगले नाही. फक्त प्रदूषणच तुमच्या चेहऱ्याला डल करु शकत नाही. तर तुमची सतत दुर्लक्ष करण्याची सवयही तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकते. तुम्ही इतर कोणत्याही दिवसांप्रमाणे क्लिनिंग, मॉश्चरायझिंग आणि टोनिंग करायला विसरु नका. तुमचे दुर्लक्ष करणे तुमच्या त्वचेसाठी त्रासदायक ठरु शकते. 


आता लॉकडाऊनमध्ये तुम्हाला हा त्रास होत असेल त्वचा काळवंडलेली दिसत असेल तर अशी घ्या काळजी

हेअर स्टीम घेण्याचे फायदे आणि सोप्या टिप्स