ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप्सचे प्रकार (Long Tops For Jeans In Marathi)

जीन्स घालायला आवडते? पण शॉर्ट टॉप घालायला आवडत नाही. तुम्हाला जीन्सवर मस्त लेटेस्ट फॅशनचा लाँग टॉप हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. अनेक जण जीन्सवर किंवा लेगिंग्जवर शॉर्ट टॉप घालण्यास पसंती देत नाहीत. तर काहींना त्यांचे शरीर उगाच बेढब वाटते. अशावेळी त्यांना फॅशन करायची असते पण असे कपडे घालायचे असतात जे त्यांना चांगलेही दिसतील आणि त्यामुळे त्यांची फॅशन उठूनही दिसेल. तुम्ही देहयष्टी काहीही असली तरी देखील तुम्ही असे लाँग टॉप घालू शकता. अगदी ऑफिसपासून ते एखाद्या पार्टीपर्यंत तुम्हाला हे टॉप घालता येतात. चला तर मग जाणून घेऊया असेच काही जीन्सवर घालता येतील असे लाँग टॉप (Long Tops In Marathi)

ट्युनिक टॉप (Tunic Tops)

ट्युनिक टॉप

Instagram

ट्युनिक हा टॉपमधील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. साधारण गुडघ्यापेक्षा थोडा वर असलेले हे टॉप जीन्स घालणाऱ्यांसाठीच असतात. तुम्हाला यामध्ये कित्येक वेगळे प्रकार आणि मटेरिअल मिळतील. तुम्ही अगदी कोणत्याही ब्रँडमध्ये कपडे घ्यायला जा. तुम्हाला हा प्रकार अगदी हमखास सगळीकडे पाहायला मिळेल. कॉटन, जीन्स, शिफॉन, होजिअरी अशा वेगवेगळ्या मटेरीअलमध्ये तुम्हाला हे ट्युनिक टॉप पाहायला मिळतात. 

ADVERTISEMENT

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ट्युनिक टॉपमध्ये जशा मटेरिअलमध्ये व्हरायटी आहेत. तसे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे पॅटर्नसुद्धा मिळतात. स्ट्रेट फिट पॅटर्न किंवा कंबरेपासून खाली फ्लोई अशा पॅटर्नमध्येसुद्धा टॉप मिळतात. यामध्ये साईड कट आणि साईड कट नसलेला असा प्रकार देखील मिळतो.

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

  • ट्युनिक टॉप अगदी कोणत्याही जीन्सवर कधीही घालता येऊ शकतात. नॅरो बॉटम जीन्सपासून ते बेल बॉटम जीन्सपर्यंत याचा उपयोग करता येईल. 
  • जर तुम्हाला शॉर्ट पँट घालायची असेल तर त्यावरही हे ट्युनिक टॉप चांगले शोभून दिसतात. 
  • ऑफिससाठी तयार होताना तुम्ही यातील थोडा फॉर्मल पॅटर्न निवडू शकता. 
  • पार्टीसाठीही तुम्हाला यामधील शिफॉन, होजिअरी अशा मटेरिअलमध्ये मिळू शकतात. ज्यांचा गडद रंग निवडून तुम्ही चांगले दिसू शकता. 

असिमेट्रिक कुडती (Asymmetric Kurti)

असिमेट्रिक कुडता

ADVERTISEMENT

Instagram

असिमेट्रिक कुडती या प्रकाराचीही सध्या फारच चलती आहे. पुढून लहान आणि मागून मोठा असा हा या कुडतीचा पॅटर्न असतो. याला साईड कट मुळीच नसतो. पुढचा भाग हा गुडघ्यापर्यंत येतो. तर मागचा भाग हा थेट पायापर्यंत लोळतो. हा प्रकार तुम्ही वनपीस म्हणूनही घालू शकता.  

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ट्रेडिशनल लुकपासून ते अगदी वेस्टर्न लुकपर्यंत तुम्हाला अनेक प्रकार यामध्ये मिळतात. यामध्ये तुम्हाला इतके छान पॅटर्न मिळतात की, तुम्हाला ते अगदी कधीही कोणत्याही ठिकाणी घालता येतील. अगदी ऑफिसपासून छोटेखानी समारंभ आणि लग्नातही तुम्हाला ते घालून स्टायलिंग करता येईल. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips)

ADVERTISEMENT
  • जर तुम्ही अगदी बेसिक प्रकारातील असिमेट्रिक टॉप निवडला असेल तर तुम्ही तो जीन्स किंवा लेगिंग्सवर घालू शकता. 
  • असिमेट्रिक टॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लेंथ मिळतात. तुम्हाला तेही ट्राय करता येऊ शकते. जे तुम्हाला कोणत्याही जीन्सवर घालता येतात. 
  • लग्नासाठी तुम्हाला असे वेगवेगळे प्रकार मिळतात. ते तुम्हाला छान ट्रेडिशनल पँटवर घालता येतात. 

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

कफ्तान (Kaftan)

कफ्तान

Instagram

थोडासा सैल पण तरीही स्टायलिश वाटणारा हा प्रकारही अनेकांच्या आवडीचा आहे. कोणत्याही जीन्सवर तुम्हाला तो घालता येतो. याला कफ्तान म्हणतात ते त्याच्या बाह्यांमुळे अगदी दोन शिलाईमध्ये हा टॉप रेडी होतो. या टॉपच्या हाताचा भाग हा सैल फारच सैल असतो. पण तुम्ही घातल्यानंतर तो अधिक उठून दिसतो. कफ्तान हा तुम्हाला कोणत्याही पार्टीसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी घालता येतो कारण यामध्ये हवा खेळती राहते. शिवाय तुमच्या शरीराचा कोणताही अवयव यामध्ये उठून दिसत नाही

ADVERTISEMENT

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : कफ्तान टॉपही वेगवेगळ्या लेंथचे असतात. तुम्हाला अगदी कंबरेपासून ते पायघोळ असे प्रकार यामध्ये मिळतात. पायघोळ हा प्रकार तुम्ही गाऊन म्हणूनही घालू शकता. तर यामध्ये मिळणारा शॉर्ट कुडतीचा आकार हा कोणत्याही जीन्ससाठी अगदी परफेक्ट आहे. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :  

  • जर तुम्हाला जीन्स घालायची असेल तर तुम्ही शॉर्ट कुडतीच्या आकाराचा कफ्तान निवडा. 
  • कफ्तानमध्ये बरेचदा शरीराचा आकार उठून दिसण्यासाठी कंबरेच्या भागाकडे एक दोरी असते त्यामुळे तुम्ही तेथे नॉट बांधून कंबरेकडे बारीक करु शकता. 
  • कफ्तानमध्ये तुम्ही जर गडद रंग घेतले तर तुम्हाला त्यामध्ये अधिक उठून दिसता येईल.

टी शर्ट कुडता (T-shirt Kurta)

टी शर्ट कुडता

ADVERTISEMENT

Instagram

लाँग टॉपमधील आणखी एक आवडता प्रकार म्हणजे टी-शर्ट कुडता. याला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते. कुडत्याच्या लेंथ प्रमाणे हे टॉप असतात. यामध्ये तुम्हाला स्ट्रेट फिट कपडे जास्त मिळतात. अनेकदा होजिअरीचे कपडे शरीराला एकदम घट्ट बसतात. जर तुम्ही बारीक असाल तर तुम्हाला हा पर्याय छान उठून दिसतो. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : टी शर्ट कुडता हा जरी तुमच्या शरीराला घट्ट बसत असला तरी देखील तुम्हाला यामध्ये अनेक वेगळे प्रकार मिळतील जे सैल बसतात आणि तुम्हाला चांगलेही दिसतात. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

ADVERTISEMENT
  • टीशर्ट कुडता हा तसा बऱ्यापैकी फॅन्सी असा प्रकार आहे जो तुमचा लुक एकदम बदलून टाकतो. तुम्ही निवडलेल्या रंगानुसार त्यावर जीन्स आणि ज्वेलरीची निवड करा. 
  • बऱ्याचदा हे कुडते किंवा टॉप प्लेन असतात त्यामुळे उठून दिसेल असे नेकपीस यामध्ये निवडा. शोभून दिसतात.

नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी ‘9’ प्रकारच्या पारंपरिक साड्या

फ्लोरल फ्रंट कट लाँग टॉप्स (Floral Front Cut Long Tops)

फ्रंट कट लाँग टॉप्स

Instagram

अगदी ट्रेडिशनल असा हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. या टॉप फॅन्सी असला तरी तो तुम्हाला एखाद्या ट्रेडिशनल कार्यक्रमात किंवा पार्टीमध्येही घालता येऊ शकतो. याची उंचीही पायघोळ असते. लाँग टॉपमधील हा प्रकार खास जीन्सवरच घालण्यासारखा असतो त्यावरच तो शोभून दिसतो. 

ADVERTISEMENT

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : फ्लोरल पॅटर्नमध्ये मिळणारे हे टॉप तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये आणि पॅटर्नमध्ये मिळतात. स्ट्रेट फिट पँटपेक्षाही हा प्रकार तुमच्या जीन्सवर अधिक खुलून दिसतो. हा प्रकार थोडा पारदर्शक असल्यामुळे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

  • जर तुम्ही कॉटन मटेरिअलमध्ये हा टॉप निवडला असेल तर तर तुम्हाला फार काळजी घ्यायची गरज नाही. पण जर पारदर्शक असेल तर तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल 
  • याटॉपखाली नॅरो बॉटम किंवा स्किनी जीन्सच सगळ्यात जास्त चांगली दिसते. त्यावर तुम्ही रिप्ड किंवा कोणतीही जीन्स वापरु शकता.
  • तुम्हाला रंगीबेरंगी जीन्सचाही वापर करता येऊ शकेल. 

ओव्हरसाईज शर्ट टॉप (Over Size Shirt Top)

ओव्हरसाईज शर्ट टॉप

ADVERTISEMENT

Instagram

ओव्हरसाईज शर्ट हे अनेकांच्या आवडीचे असतात. हे शर्ट सैल वाटत असले तरी देखील ते दिसायला छान दिसतात. यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या पँटस तुम्हाला घालता येऊ शकतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी असा टॉप असायलाच हवा. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ओव्हरसाईज शर्टची लांबी नेहमीच थोडी लांब असते. तुम्हाला यामध्ये लिनन, कॉटन असे मटेरिअल मिळतात. हे टॉप दिसायला नेहमीच रिच दिसतात. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

ADVERTISEMENT
  • जर तुम्ही खूप बारीक असाल तर तुम्ही हे शर्ट घालताना कंबरेला एखादा बेल्ट लावा त्यामुळे तुम्ही त्यामध्ये खूप बारीक दिसणार नाही. 
  • जर तुम्ही हेवी साईज असाल तरी देखील तुम्ही बेल्ट लावला तरी चालू शकेल. त्यामुळे तुमच्या लुकला एक चांगला ग्रेस येईल. 
  • जर तुम्ही शर्टचा रंग प्लेन निवडला तर फार उत्तम कारण असे शर्ट तुम्हाला कधीही घालता येतात. 

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

लाँग डेनिम शर्ट (Long Denim Shirt)

लाँग डेनिम शर्ट

Instagram

डेनिम शर्टची फॅशन कधीही जुनी होत नाही. तुम्हाला डेनिम आवडत असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये तुम्ही हा एक लाँग डेनिम शर्ट ठेवायला हवा. ऑफिस किंवा डेटला जाताना तुम्ही अशा प्रकारचा लाँग डेनिम शर्ट घालू शकता. 

ADVERTISEMENT

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : डेनिम शर्टमध्ये तुम्हाला ओव्हरसाईज किंवा लांब असे शर्ट मिळतात. यात तुम्हाला वेगवेगळे रंगही मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करता येते. 

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

  • ओव्हरसाईज टॉप असेल तर तुम्ही त्याचा जॅकेट म्हणून उपयोग करु शकता. 
  • जीन्सवर टँक टॉप घालून त्यावर हा शर्ट घालू शकता. अनेकदा शॉर्ट टॉप घातल्यानंतर ते मागून वर जाण्याची शक्यता असते. अशावेळी हे शर्ट चांगले दिसतात. 
  • तुम्ही जर याची सगळी बटणं लावली नाही तरी तर ते अधिक चांगले दिसतात. 

फ्रॉक टॉप (Frock Style Long Tops)

फ्रॉक टॉप

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्हाला अंगालगत टॉप आवडत नसेल तर तुम्ही असे फ्रॉक टॉप निवडू शकता. हे दिसायला खूपच चांगले दिसतात. तुम्ही चारचौघात गेल्यावर नक्कीट उठून दिसणार. साधारण खिशालगत हा टॉप येतो. पण यामध्येही तुम्हाला थोडी लहान मोठी लेंथ मिळू सकते. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) :  फुल स्लिव्हज, बलुन हँडस आणि खूप घेर तुम्हाला मिळू शकतात. मिक्स कॉटन मटेरीअलमध्ये असे टॉप्स मिळतात. 

स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

ADVERTISEMENT
  • तुम्ही बारीक असा किंवा जाड तुम्हाला हा टॉप चांगला दिसणारच. जर तुम्ही यावर नेमकी काय स्टाइल करु शकता असा विचार करत असाल तर तुम्ही याला थोडा ट्रेडिशन लुक देऊ शकता. 
  • निळ्या आणि काळ्या रंगाच्या डेनिमवर हे टॉप अधिक खुलून दिसतात. यावर तुम्ही मस्त ट्रेडिशनल अशी ज्वेलरी घातली तरी ती उठून दिसू शकते. 

ऑफ शोल्डर लाँग टॉप (Off Shoulder Long Tops)

ऑफ शोल्डर लाँग टॉप

Instagram

ऑफ शोल्डर टॉपची फॅशनही आहे. यामध्ये शॉर्ट आणि लाँग टॉप्सही मिळतात. ही फॅशन कॅरी करायलही फार सोपी आहे. रोजच्या कपड्यांपेक्षा तुम्हाला थोडे वेगळे काही घालायये असेल तर तुम्ही असे ऑफ शोल्डर लाँग टॉप घालू शकता. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : ऑफ शोल्डरमध्ये तुम्हाला टॉप आणि कुडता असे पर्याय मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची निवड करु शकता. 

ADVERTISEMENT

स्टायलिंग टिप्स (Styling Tips) :

  • ऑफ शोल्डर लाँग टॉप निवडताना त्याची साईज फार महत्वाची असते. ती तुमच्या खांद्यांकडे अगदी व्यवस्थित बसायला हवे. 
  • तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जीन्सवर याचा वापर करु शकता.

श्रेडेड लाँग टॉप्स (Shredded Long Tops)

श्रेडेड लाँग टॉप्स

Instagram

ADVERTISEMENT

फॅन्सी आणि लेटेस्ट ट्रेंड ही तुमची चॉईस असेल तर तुम्ही श्रेडेड लाँग टॉप्स घालू शकता. जीन्सवर ते चांगले दिसतात.जास्तीकरुन हे टॉप्स टिशर्ट मटेरिअलमध्ये असतात. त्यामुळे त्यांना इस्त्री करण्याची फारशी गरज नसते. 

वेगवेगळे प्रकार (Different Pattern) : तुम्हाला यामध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न मिळतात. स्लिव्हिज, फुल स्लिव्हज असे प्रकार तुम्हाला मिळतात

 स्टायलिंग टिप्स (Styling Tips) : 

  •  श्रेडेड असल्यामुळे ते बरेचदा आरपार असतात. त्यामुळे तुम्हाला आत स्पगेटी किंवा सिंग्लेट टॉप घालणे गरजेचे असते.
  •  तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाताना असे कपडे घालू शकता. ऑफिसला जाण्यासाठी हा पर्याय चांगला नाही. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. लाँग टॉप वनपीस ड्रेसप्रमाणे घालता येऊ शकतो का?  

ADVERTISEMENT

हो, ज्या टॉपना साईड कट नसतो… जे गुडघ्यापर्यंत किंवा तुम्हाला चालू शकेल अशा उंचीचे असतील असे टॉप तुम्हाला वनपीससारखे घालता येतात. फक्त या टॉपला जर तुम्हाला थोडा ग्रेस आणायचा असेल तर तुम्ही कंबरेला बेल्ट लावू शकता. त्यामुळे तुमचे हे लाँग टॉप खूप छान दिसतात. 

2. लाँग टॉप घातल्यावर बारीक दिसता येते का?  

हे शक्य आहे, ज्यावेळी तुम्ही उंचीने कमी असा टॉप घालता त्यावेळी तुमचे शरीर अधिक दिसते. पण लाँग टॉप घातल्यामुळे तुमचे शरीर झाकले जाते. तुम्हाला तुमचे शरीर जाड दिसते असे वाटत असेल तर तुम्ही लाँग टॉप घालून पाहा. तुम्हाला नक्कीच तुम्ही स्थुल न दिसता अधिक चांगले दिसता असे दिसेल. 

3. लाँग टॉप फॅन्सी टॉप्समध्ये येते का?  

ADVERTISEMENT

तुम्ही लाँग टॉप घालता म्हणजे तुम्ही फॅशनेबल नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे मानातून काढून टाका. कारण हल्ली लाँग टॉपची चांगलीच चलती आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त हे टॉप घाला. तुम्ही अजिबात वेगळे किंवा फॅशनच्या बाहेर दिसणार नाही. आता नक्की ट्राय करा हे फॅशनेबल लाँग टॉप आणि दिसा सुंदर …

24 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT