राशीनुसार कोणत्या लिपस्टिकचा रंग आहे तुमच्यासाठी लकी

राशीनुसार कोणत्या लिपस्टिकचा रंग आहे तुमच्यासाठी लकी

प्रत्येक रंग हा काही ना काहीतरी वेगळं सांगतो. प्रत्येक रंगाची शक्ती वेगळी मानली जाते. तर काही जण आपल्यासाठी एखादा रंग लकी असल्याचंही मानतात. तर एखादा रंग एखाद्यासाठी अनलकीही ठरतो. त्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या मेकअप किटमधील लिपस्टिकचा रंगही (Best Lipstick Colour) निवडू शकता. हे रंग तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतात आणि बऱ्याचदा तुम्हाला यामुळे प्रसन्नही वाटतं. कदाचित तुम्हाला वाटेल की असं कसं असू शकतं, तर तुम्ही एकदा ही गोष्ट अनुभवून बघायला काहीच हरकत नाही. कारण यामध्ये तुमचं काहीच नुकसान नाही. उलट तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगाची लिपस्टिक शेड लाऊन अधिक सुंदरही दिसता येईल. जाणून घेऊया राशीनुसार तुमच्यासाठी कोणता लिपस्टिकचा रंग लकी ठरू शकतो. 

राशीनुसार निवडा लिपस्टिक शेड (Best Lipstick Colour According to Zodiac Sign in Marathi)

ज्योतिषशास्त्रात ग्रह, राशी आणि रंगांचा उत्तम मेळ असतो. यानुसार तुम्हाला जर शुभ गोष्टी घडायला हव्या असतील तर तुम्ही राशीनुसार तुमच्या आवडत्या आणि लकी रंगाचा वापर करावा. कदाचित तुम्ही रोज तुमच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालू शकत नसाल. पण तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगाची लिपस्टिक नक्कीच निवडू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वात अधिक भर घालण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रहानुसार लिपस्टिकची शेड निवडा जी तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकते. जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार कोणती लिपस्टिक शेड तुमच्यासाठी लकी आहे. 

मेष (21 मार्च - 19 एप्रिल)

Maybelline New York Color Show Big Apple Red Lipstick - Big Apple Red

INR 325 AT Maybelline New York

या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे नेहमी लाल रंग या व्यक्तींसाठी लकी ठरतो. लाल रंग एक वेगळाच उत्साह निर्माण करतो. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी लाल रंगाच्या लिपस्टिक शेडची निवड करावी. 

वृषभ ( 20 एप्रिल - 20 मे)

Make Up

MyGlamm Manish Malhotra Soft Matte Lipstick - Cocaa Butter

INR 950 AT MyGlamm Manish Malhotra

ही पृथ्वी तत्वाची रास आहे, त्यामुळे या व्यक्तींवर ब्राऊन रंगाची शेड सूट करते. या राशीच्या व्यक्तींना लाल रंगापासून दूर राहिलेलंच बरं. तुमच्या किटमध्ये ब्राऊन शेड्सच्या विविध छटा तुम्ही घेऊ शकता. तसंच तुम्हाला हा रंग अप्रतिम दिसू शकतो. 

मिथुन (21 मे - 21 जून)

Make Up

LIT 2 IN 1 LIQUID MATTE LIPSTICK

INR 545 AT MyGlamm

या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. हे लोक बोलण्यात अत्यंत पटाईत असतात. त्यामुळे त्यांच्या ओठांवर सर्वात जास्त समोरच्या व्यक्तीचे लक्ष राहाते. मिथुन राशीच्या व्यक्तींना अशा लिप शेड वापरायला हव्यात ज्या गडद आणि लाईटच्या मधले उत्कृष्ट कॉम्बिनेशन असतील. हॉट पिंक, फूशिया आणि ऑरेंज शेड या व्यक्तींना अप्रतिम दिसतील. या शेड्स वापरल्यास, या व्यक्तींचा समाजात मानसन्मानही वाढेल आणि त्यांना कामात यशप्राप्तीही होईल.

कर्क (22 जून - 22 जुलै)

Make Up

Faces Canada Ultime Pro HD Intense Matte Lips + Primer (Nearly Nude 08)

INR 749 AT Faces Canada

या राशीच्या व्यक्ती चंद्राने प्रभावित असतात ज्यामुळे त्यांच्या मानसिकतेत नेहमी त्रास उद्भवतो. त्यामुळेच या व्यक्तींनी नेहमी लाईट शेड्सच्या लिपस्टिकचा उपयोग करावा. विशेषतः न्यूड लिपस्टिक शेड्स वापरणं यांच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. तसंच यांच्या व्यक्तिमत्वाला ही लिपस्टिक साजेशी असून कोणाहीसमोर या व्यक्तींना कमी पडू देत नाही. 

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

Make Up

LIT LIQUID MATTE LIPSTICK - SMASH

INR 395 AT MyGlamm

या राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे. या राशीच्या व्यक्ती आपल्या आत्मविश्वासावर समाजात आपली ओळख निर्माण करतात. या व्यक्ती जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात.  सूर्यापासून प्रभावित असल्याने या व्यक्तींना ऑरेंज शेडच्या लिपस्टिकचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं. 

कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

Make Up

Smudge Me Not Liquid Lipstick - 06 Tangerine Queen (Orange Coral)

INR 499 AT Sugar

या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या व्यक्ती रंगाच्या बाबतीत खूपच नशीबवान ठरतात. यांना कोणत्याही रंगाची लिपस्टिक शेड लावता येऊ शकते. सर्वच शेड्स यांना लाभदायक ठरतात.  तसं तर यांच्यावर कोरल लिपस्टिक शेड्स अन्य शेड्सपेक्षा अधिक आकर्षक दिसतात. त्यामुळे त्याचा वापर जास्त करावा. 

वय वाढले तरी या चार राशींचा लहानपणा संपत नाही, जबाबदारीपासून राहतात दूर

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

Make Up

LIT LIQUID MATTE LIPSTICK - CATFISH

INR 395 AT MyGlamm

या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या व्यक्ती आपल्या ग्रेस आणि स्टाईलसाठी ओळखल्या जातात. या  राशीचा शुभ रंग हा गुलाबी आहे. गडद पिंक मॅट लिपस्टिक शेड यांच्यावर खूपच आकर्षक दिसते आणि या व्यक्तींसाठी ती फायदेशीरही ठरते. 

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

Make Up

Nothing Else Matter Longwear Lipstick - 16 Cloud Wine (Burgundy, Red Berry)

INR 499 AT SUGAR

इस राशिचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी गडद रंगाच्या लिपस्टिक शेड्स लाभदायक ठरतात.  त्यातही मरून रंग असेल तर उत्तम. हा रंग जर आत्मविश्वास कमी झाला तर तो आणण्यास मदत करतात. 

धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

Make Up

Ny bae liquid lipstick purple

INR 166 AT Ny

या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या व्यक्ती अतिशय साध्या राहणीमान आणि उच्च विचारसरणीच्या असतात आणि त्याच मार्गावर चालतात. या राशीच्या व्यक्तींसाठी जांभळा रंग अर्थात वांग्याचा रंग लकी ठरतो. पर्पल रंगाची शेड असणारी लिपस्टिक यांच्यासाठी लाभदायक ठरते आणि त्यांच्या सौंदर्यात निखार आणते. 

जन्म महिन्यानुसार शोधा तुमचा जोडीदार, काय सांगतो तुमचा जन्म महिना

मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

Make Up

POSE HD LIPSTICK - CARAMEL

INR 599 AT MyGlamm

या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. यांना काम करणं खूपच आवडतं आणि गर्दीतही वेगळं दिसणं यांना जास्त  भावतं. या कारणामुळेच या राशीच्या लोकांना काळा, करडा, खाकी रंगाच्या शेड्स जास्त लाभदायक ठरतात. लिपस्टिक शेड्च्या बाबतीत या व्यक्तींना गडद रंगाचे कॉम्बिनेशन वापरायला हवे. 

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

Make Up

POSE HD LIPSTICK (NUDE MAUVE)

INR 597 AT MyGlamm

इस राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. यांना प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला सामावून  घेणं शक्य होतं. या व्यक्ती अतिशय मैत्रीपूर्ण असतात. यांच्यासाठी हलका आणि सॉफ्ट रंगाच्या लिपस्टिक शेड्स फायदेशीर ठरतात. हे रंग यांच्यासाठी लकी ठरतात. 

#ZodiacFriends: राशीवरून ठरवा तुमचे मित्रही आहेत का अशाच स्वभावाचे

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

Make Up

MAYBELLINE NEW YORK Color Sensational Powder Matte Lipstick

INR 473 AT MAYBELLINE

मीन राशीचा स्वामी गुरु आहे.  त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना ऑरेंज, बेरी आणि फूशिया अशा लिपस्टिक शेड्स सुंदर दिसतात आणि लकी ठरतात. या रंगाने या व्यक्तींचं नशीब फळफळतं.  त्यामुळे या शेड्सचा वापर करावा.  

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा