मेकअपने ओठ बोल्ड आणि आकर्षक करण्यासाठी सोप्या टिप्स

मेकअपने ओठ बोल्ड आणि आकर्षक करण्यासाठी सोप्या टिप्स

मेकअपमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो लिप मेकअप. कारण चेहऱ्यावर कोणताही मेकअप न करता फक्त लिपस्टिक, लिप बाम अथवा लिपकलर लावूनही तुम्ही आकर्षक दिसू शकता. त्याचप्रमाणे फोटोसाठी पाऊट केल्यावर, स्मितहास्य करताना सर्वांचं लक्ष तुमच्या ओठांवर सर्वात आधी जातं. यासाठीच ओठ नेहमी आकर्षक आणि रेखीव दिसणं गरजेचं असतं. बऱ्याचजणीचे ओठ खूपच लहान आणि पातळ असतात. ज्यामुळे त्यांना आपल्या सौंदर्यात काही तरी उणीव आहे असं भासू लागतं. मात्र तुम्ही मेकअप करून तुमचे ओठ मोठे आणि आकर्षक नक्कीच करू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या मेकअप टिप्स. ज्यामुळे तुम्ही दिसाल बोल्ड आणि ब्युटिफुल

Beauty

MyGlamm LIT Liquid Matte Lipstick

INR 395 AT MyGlamm

सर्वात आधी तुमच्या ओठांची योग्य काळजी घ्या -

ओठ सुंदर दिसण्यासाठी सर्वात आधी तुम्ही ओठांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ओठ सुरकुतलेले अथवा कोरडे झालेले असतील तर ते मेकअप करूनही चांगले दिसणार नाहीत. यासाठी लिप बाम, लिप प्रायमरने ते नियमित हायड्रेट ठेवा. साखर आणि मधाच्या स्क्रबरने ओठांवरील काळेपणा तुम्हाला कमी करता येईल. दात घासताना तुम्ही ओठांना स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचाही वापर करू शकता. मात्र ओठ चोळून धुतल्यावर लगेच त्यांच्यावर लिपबाम जरूर लावा. ज्यामुळे ओठ स्वच्छ आणि मुलायम होतील.

Shutterstock

मेकअप करताना कन्सिलरचा योग्य वापर करा -

कोणताही लिपमेकअप सुरू करण्यापूर्वी फाऊंडेशन आणि कन्सिलरने ओठांजवळील भाग व्यवस्थित कव्हर करा. ज्यामुळे तुमच्या ओठांच्या आजूबाजूचा भाग एकसमान स्कीनटोनचा दिसू लागेल. यासाठी ओठांच्या कडा कन्सिलरने व्यवस्थित झाकून टाका. बऱ्याचदा ओठांच्या बाजूला सुरकुत्या, फाईन लाईन्स असतात. ज्यामुळे तुमच्या ओठांचे सौंदर्य कमी होऊ शकते. कन्सिलर लावण्यामुळे तुमचे ओठ  थोडे पुढे झुकल्याप्रमाणे  दिसू लागतील. ज्याचा वापर तुम्हाला फोटोमध्ये पाऊट करताना होऊ शकतो.

Shutterstock

ओठांना आऊटलाईन आणि काऊंटर करा -

मेकअप करताना ओठ आकर्षक करण्याची ही पहिली स्टेप आहे. यासाठी सर्वात  आधी एखादी न्यूड लिपस्टिक ओठांना लावा आणि तुम्हाला तुमच्या ओठांचा आकार लिप लायनरने आऊटलाईन करून घ्या. शिवाय एखाद्या डार्क लिप लायनरने तुम्ही तुमच्या ओठांना काऊंटरही करू शकता. मात्र लक्षात ठेवा काऊंटर करताना तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुमच्या ओठांना शेप द्या.

Shutterstock

ओव्हरलाईन ड्रॉ करून ओठ करा मोठे -

बऱ्याचदा मेकअप आर्टिस्ट तुमचे ओठ मोठे करण्यासाठी या टेकनिकचा वापर करतात. मात्र तुम्ही आर्टिस्ट नसल्याने तुम्हाला काळजी पूर्वक ओव्हरलाईन ड्रॉ करायला हवी. ओठांना मोठं करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुमच्या नॅचरल लिप लाईनच्या कडेलाच ही लाईन ड्रॉ करा. शिवाय लिप लायनरचा रंग तुमच्या स्कीन टोनला मॅच होणाराच निवडा

लिपस्टिक व्यवस्थित ब्लेंड करा -

लिप मेकअप करताना ओठांना आऊटलाईन आणि काऊंटर केल्यावर तुमची आवडती लिपस्टिक लावा आणि ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करा. लिपस्टिक ब्लेंड करण्यासाठी तुम्ही अॅंगल लिप ब्रशचा वापर करू शकता. तुम्ही लिपस्टिकनेही तुमचा मेकअप ब्लेंड करू शकता. न्यूड अथवा ग्लॉसी असा तुमच्या लुकप्रमाणे लिपस्टिकचा प्रकार आणि रंग निवडा. ओठ आकर्षक करण्यासाठी तुम्ही लिप टिंटचाही वापर करू शकता. 

Shutterstock

बो - लाईन हायलाईट करा -

हायलायटरचा वापर फक्त गाल, हनुवटी आणि डोळ्यांवरील उंच भाग दिसावा यासाठीच करू नका. तुमच्या ओठांच्या वरचा रेखीव भागही तुम्ही हायलाईटने उठावदार करू शकता. ज्यामुळे त्या भागावर एकप्रकारचा ग्लो येईल. सर्वात शेवटी थोडा लिपग्लॉस ओठांवरील उंच भागावर थोडासा लावा. ज्यामुळे तुमचे ओठ मोठे आणि आकर्षक दिसू लागतील. 

 

Beauty

POSE HD Highlighter Duo - Champagne | Rose Gold

INR 699 AT MyGlamm
Shutterstock

या साध्या, सोप्या मेकअप टिप्स वापरा आणि बोल्ड दिसा. आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या मेकअप टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला जरूर कळवा. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

अधिक वाचा - 

तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार निवडा तुमच्यासाठी बेस्ट लिपस्टीक

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हव्या 'या' न्यूड लिपस्टिक (Best Nude Lipstick Shades)