या संख्यांना का मानले जाते अशुभ, जाणून घ्या कारण

या संख्यांना का मानले जाते अशुभ, जाणून घ्या कारण

अंकशास्त्रानुसार काही अंक आहेत ज्यांना अशुभ मानले जाते. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या अंकांना अशुभ मानण्याते येते. 13 ते 43 मध्ये असे काही अंक आहेत ज्यांना अशुभ समजण्यात येते. मात्र या अंकांना नक्की का अशुभ मानलं जातं याची कारणं सहसा कोणाला माहीत नाहीत. बऱ्याचदा केवळ पिढ्यानुपिढे हे अंक अशुभ आहेत असं सांगण्यात येतं आणि पुढची पिढीही यावर विश्वास ठेऊन पुढे जाते असं दिसून येतं. पण याची काही कारणं आहेत जी प्रत्येकाला माहीत असायलाच हवीत. त्यामुळेच आम्ही या लेखातून याबद्दल माहिती देणार आहोत. काही अंकांना जगभरात चांगलं समजण्यात येत नाही. बऱ्याचदा या तारखेला अथवा याची बेरीज करून जर अशुभ संख्यांपैकी एक येत असेल तर चांगल्या कामाला सुरूवात करणंही टाळलं जातं. हे केवळ आपल्याकडेच घडतं असं नाही तर अगदी बाहेरच्या काही देशांमध्येही तुम्हाला अशा तऱ्हेचे समज असल्याचे दिसून येते. पाहूया नक्की कोणते अंक अशुभ आहेत आणि त्याची कारणं काय आहेत. 

संख्या 4

आशिया खंडातील अधिक देशांमध्ये 4 ही संख्या अशुभ मानण्यात येते. चीनमध्ये तर इतकी धार्मिक आस्था आहे की, या संख्येला सर्वात जास्त वाईट संख्या समजण्यात येते. या अंकाला चीनी लोक घाबरतात कारण 4 ही संख्या चीनी भाषेमधील मृत्यू या शब्दासमान ऐकू येते. या संख्येला इतके अशुभ मानण्यात येते की चीनमध्ये तुम्हाला 4,13, 14 आणि 24 क्रमांकाचा मजलादेखील दिसून येत नाही. या संख्येला वगळण्यात येते. आपल्याकडेही ही संख्या तितकीच अशुभ मानली जाते. मात्र इतक्या थराला जाऊन कोणतंही काम भारतात करण्यात येत नाही. 

संख्या 9

ही संख्या भारतात शुभ मानली जाते मात्र चीनमध्ये अशुभ मानण्यात येते. यामागे असं कारण देण्यात येते की, या संख्येचा ध्वनी त्यांना दुःखाप्रमाणे वाटतो. त्यामुळे ही संख्याही त्यांच्या दृष्टीने चांगली समजण्यात येत नाही. मात्र भारतात 9 संख्या ही सर्वात चांगली मानण्यात येते. 

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

संख्या 13

ही संख्या सर्व जगात अशुभ मानण्यात येते. बरेचदा या क्रमांकाची सीट अथवा खोली घेणंही लोक टाळतात. या दिवशी जूडस इस्कारियतने जिसस अर्थात येशूला धोका दिला होता असं समजण्यात येतं आणि शेवटच्या प्रहरी 13 व्या पाहुण्याच्या रूपात येऊन त्याने त्रास दिला असं ख्रिश्चन धर्मात समजण्यात येते. तर पारसी धर्मात आणि विविध धर्मातही ही संख्या अशुभच मानली जाते. या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात मुद्दाम करण्यात येत नाही. असं केल्यास, काम तडीस जात नाही असा समज आहे. 

संख्या 24

जपानमध्ये 24 हा अंक केवळ अशुभ नाही तर खतरनाक असल्याचे समजण्यात येते. त्यांच्या मते 24 अंकाचा ध्वनी हा स्टिलबर्थ अर्थात गर्भातील मृत बालकाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे या अंकापासून दूर राहणंच जपानी व्यक्ती पसंत करतात. त्यांना या अंकाचे वावडे आहे. 

राशीनुसार कोणत्या लिपस्टिकचा रंग आहे तुमच्यासाठी लकी

संख्या 39

39 अंक हा अफगाणिस्तानमध्ये अजिबातच चांगला मानण्यात येत नाही.  या संख्येला अशुभ मानण्यात येते. अफगाणी भाषेनुसार 39 अंक उच्चारल्यास, तो मोरदा-गो असा ऐकू येतो. ज्याचा अर्थ मृत गाय असा आहे. तिथे या शब्दाला शिवीप्रमाणे मानण्यात येते. विशेषतः प्रॉस्टिट्यूटसाठी जे दलाल काम करतात त्यांना अशा प्रकारे शब्द वापरण्यात येतात.  म्हणूनच हा अंक तिथे अशुभ मानण्यात येतो. 

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

संख्या 43

संख्या 43 देखील संख्या 24 प्रमाणेच ध्वनी देणारी ठरते. ज्याचा अर्थ जपानी लोकांमध्ये तसाच समजण्यात येतो. त्यामुळे जपानमध्ये 43 क्रमांकाच्या खोल्या तुम्हाला रूग्णालयात दिसून येत नाहीत. कोणत्याही रूग्णालयात 43 क्रमांक वापरण्यात येत नाही. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा