My story: लॉकडाऊनमुळे मिळाली गुडन्यूज

My story: लॉकडाऊनमुळे मिळाली गुडन्यूज

लॉकडाऊनने अनेकांच्या डोक्याला ताप करुन ठेवला असला तरी काहींना मात्र यातून आनंद मिळाला आहे. सारिका आणि रमेश यांच्या संसारातही या लॉकडाऊनने आनंद आणला. एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करणारे हे जोडपे एकत्र आले आणि इतकी वर्ष ज्या गुड न्यूजची ते वाट पाहात होते ही गुड न्यूज देखील त्यांच्या आयुष्यात आली. जाणून घेऊया या लॉकडाऊनने त्यांच्या आयुष्यात काय आनंद आणला ते…

जोडीदारावर हात उगारणे बिघडवू शकते तुमचे नाते

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आहे या गोष्टींंची गरज (How To Deal With Breakup)

 

Instagram

सारिका आणि रमेश अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातील दोघं. घरातल्यांच्या पसंतीने या दोघांचे लग्न झाले. लग्न घरच्यांनी ठरवून दिले तरी सारिका- रमेशमध्ये एक समुजतदारपणाचे नाते तयार झाले होते. साखरपुडा झाल्यापासूनच त्यांनी त्यांच्या भविष्याची स्वप्ने रेखाटायला सुरुवात केली होती. दोघेही छान नोकरी करणारे.. उत्तम पैसा कमावणारे त्यामुळे त्या पैशांच्या मदतीने ते काय काय करु शकतात याचे प्लॅनिंग करायला त्यांनी सुरुवात देखील केली. दोघांचा मेहनती स्वभाव आणि जिद्द यामुळे त्यांनी त्यांना हव्या असलेल्या अनेक गोष्टी मिळवल्या. घर घेतलं.. संसाराला आवश्यक असा नवनव्या वस्तू घेतल्या. सारिकाच्या प्रेमळ स्वभावामुळे तिच्या सासूचे आणि तिचे नाते फारच चांगले होते. त्यामुळे रमेशलाही थोडे हायसे वाटायचे. घरी आल्यानंतर दोघांना एकत्र छान आई- मुलीसारखं काम करताना पाहून त्यालाही आनंद व्हायचा.

 दिवसामागून दिवस जात होते आणि वर्षांमागून वर्ष…  सारिका आणि रमेशचा संसार चांगलाच बहरत होता. त्यांना जे काही आयुष्यात हवे होते ते त्यांनी मिळवले होते. आता तरी त्यांनी मुलाचा विचार करावा असे घरातल्यांना वाटत होते. रमेशची आई सारिकाकडे कायम तगादा लावत होती. आता तरी बाळाचा विचार करा असे सतत सांगत होती. आईच्या बोलण्याचा विचार करुन सारिकाने रमेशला आता फॅमिली प्लॅनिंगचा विचार करुया, असे सांगितले. दोघांनीही आता या गोष्टीकडे अधिक जातीने लक्ष घालायचे ठरवले. सारिका तिशीकडे वाटचाल करत होती. तर रमेशने तिशी पार केली होती. रोजची काम आणि ताण तणाव यामुळे त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नव्हता. पण तरीही त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरु ठेवले. आयुष्यातील करीअरच्या दृष्टिने असा महत्वाचा काळ त्यांनी आता मागे ठेवून फक्त याचा विचार करायचे ठरवले.  पण तरीही काहीही केल्या त्यांना इच्छित असे यश मिळत नव्हते. नैसर्गिकरित्या होत नाही म्हणून डॉक्टरांचा योग्यवेळी सल्ला घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण काहीच उपाय चालेना. डॉक्टरांनी याचे कारण ‘तणाव’ असे सांगितले. पण त्या तणावातून मुक्त कसे व्हायचे. रोज सकाळी उठल्यानंतर ऑफिस, काम, प्रवास, घरातील कामं ही ओघाने येत होती. यातील कोणतीच गोष्ट त्यांना टाळता येत नव्हती. घरातून मुलासाठी वाढणारा ताण यामुळे दोघे त्रस्त होते. त्यांना काय करावे कळत नव्हते. एकवेळ अशी आली की, घरातल्यांच्या तणावामुळे त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. ते वाद इतके विकोपाला जाऊ लागले. एकमेकांचा सहवास त्यांना नकोसा झाला होता. पण तरीही त्यांनी सावरुन घेतलं. 


अशातच 2020 साल सुरु झालं हे त्यांना कळलं नाही. पहिल्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले पण नाहीच.  अचानक देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन सुरु करण्यात आला.  आता पुढचे काही दिवस घरातच घालवावे लागणार होते. रमेशची आई गावात अडकल्यामुळे घरात फक्त रमेश आणि सारिकाच होते.  कामांनाही तशी बऱ्यापैकी विश्रांती होती. या लॉकडाऊनच्या अगदी एका महिन्यातच सारिकाला गुडन्यूज मिळाली. आपण आई होणार यावर तिचा विश्वास बसत नव्हता. इतक्या महिन्यांच्या प्रयत्नांमध्ये जे शक्य झाले नाही ते आता कसे झाले यावर तिचा विश्वास नव्हता म्हणून त्यांना डॉक्टरांना फार कुतूहलाने हा प्रश्न विचारला. त्यावेळी डॉक्टरांच्या उत्तराचा सगळ्यांनी विचार करावा असे आहे 

‘करीअरमध्ये आपण इतके गुरफटतो की, त्याचा त्रास आपल्या शरीरावर किती होते हे आपल्याला कळत नाही. त्यातल्या त्यात करीअरची निवड करुन आणि वयाची पर्वा न करता आपण मुलं हवं असूनही त्यासाठी वेळ काढत बसतो. आज नाही तर पुढच्या वर्षी हे आपण करत राहतो. त्याच्यात आपल्या आयुष्यातील किती वर्ष निघून जातात याचा विचार करत नाही. तुम्हाला तुमचे वय वाढले असे वाटत नसले तरी तुमच्या शरीराचे वय वाढत असले याचा तुम्हाला विसर पडतो. लॉकडाऊनमुळे स्पर्धेतून तुम्हाला थोडी विश्रांती मिळाली. शरीराचा थकवा दूर झाल्यामुळे तुम्हाला ही आनंदवार्ता मिळाली. 


आता तुम्ही जर या गोष्टींचा विचार खूप करत असाल तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका.

सासू- सुनेत दुरावा आणतात या गोष्टी