जुनी जीन्स फेकताय? असा करा पुनर्वापर

जुनी जीन्स फेकताय? असा करा पुनर्वापर

पुरानी जीन्स ऑर गिटार…. हे गाणं ऐकायला आणि सतत गुणगुणायला कितीही आवडत असलं तरीसुद्धा घरात जीन्स पुरानी झाली की, ती फेकूनच द्यावी लागते. घरात ठेवून जुन्या कपड्यांचं करणार तरी काय ? असे म्हणत आपण आपल्या जुन्या जीन्सला अलविदा म्हणतो. पण आपण घेतलेल्या काही जीन्स या इतक्या सुंदर असतात की, त्यांना टाकून देण्याची इच्छा आपल्याला मुळीच होत नाही. या जीन्सला आपण कितीतरी तरी दिवस तशीच कपाटात ठेवून देतो. पण आता या जीन्सचा तुम्हाला थोडासा हटके पद्धतीने पुनर्वापर करता आला तर.. आता आम्ही ज्या आयडिया देणार आहोत. त्या थोड्या वेगळ्या आहेत. कोणतेही शिवणकाम न करता तुम्हाला तुमची जीन्स घरच्या रोजच्या कामांसाठी वापरता आली तर? चला जाणून घेऊया जीन्सचा असा वापर

तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!

मस्त सीटिंग

Instagram

तुम्ही बाजारात गेल्यानंतर अनेकदा बिन बॅग्स पाहिल्या असतील. तशाच प्रकारची बिन बॅग तुम्हाला जीन्सच्या मदतीने बनवता येऊ शकते.तुम्हाला तुमच्या काही जीन्स पँट लागतील. आता तुम्हाला करायचं असं की, जीन्सचा पायाकडील भागाला स्टेपलकर किंवा शक्य असल्यास शिवून घ्यायचे आहे. यासाठी दोन जीन्सचा वापर केलात तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल. दोन जीन्स घेताना आणि त्या एकत्र जोडताना तुम्हाला जीन्सचे जोडा. उदा.एका जीन्सचा उजवा आणि दुसऱ्या जीन्सचा डावा पाय वरुन सरळ खालपर्यंत जोडत या. आता तुम्हाला त्यामध्ये मस्त कापूस किंवा चिंध्या भरता येतील. तुम्हाला ती कशी नरम हवी यावर अवलंबू आहे. ते सगळं करुन झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कोपऱ्यात त्याला बिन बॅग प्रमाणे सेट करा तुमचे आरामदायी सीटिंग तयार आहे. 

जुन्या कपड्यांचा करा असा पुनर्वापर, व्हा स्टायलिश

ऑरगॅनिक कुंडी

bing.com

घरामध्ये लहानमुलांच्या पँट असतील तर तुम्हाला त्याचा वापर कुंडीसारखा करता येईल. तुम्हाला जीन्सचे बॉटम शिवून घ्यायचे आहेत किंवा त्याला चिकटवून घ्यायचे आहे. त्यामध्ये माती किंवा कोकोपीठ घालून भरुन घ्यायचे आहे. कंबरेकडच्या भागात झाड लावायचे आहे. आता ही कुंडी अशीच राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही बाजूला रस्सी लावून त्याला छान हँग करायचे आहे. तुम्ही छान वॉल गार्डन किंवा असे काही करणार असाल तर तुमच्यासाठी ऑरगॅनिक कुंडी तयार करुन सजावट करता येईल. 

मायक्रोव्हेवसाठी ग्लोव्हज

Instagram

अनेकांना मायक्रोव्हेवसाठी बाजारात मिळणारे खास ग्लोव्हज वापरायला अजिबात आवडत नाही. कारण ते हाताला फार जाड लागतात.जीन्सचा उपयोग तुम्ही अगदी हमखास ग्लोव्हज म्हणून करु शकता. एखाद्या फाटक्या जीन्सचे चौकोनी तुकडे करुन तुम्ही तसाच त्यांचा वापर किचनटॉवेल म्हणून ही करु शकता. काहींना जर क्रिएटिव्हीटी आवडत असेल तर त्यांनी हा किचन टॉवेल शिवून त्याचा वापर केला तरी चालेल. कारण जीन्स किचनमध्ये बराच काळ टिकतात. त्यांना डाग लागले तरी ते सहज धुता येतात. मुळात ते खराब झालेत हे पटकन लक्षात ही येत नाही. 


आता अशा पद्धतीने करा तुमच्या जुन्या जीन्सचा वापर तोही कोणत्याही शिवणकामाशिवाय..

जाणून घ्या कोणत्या जीन्सवर कोणता Top दिसेल Perfect!