गणेशोत्सवाला दिसा उत्साही, घरीच करा असा झटपट मेकअप

गणेशोत्सवाला दिसा उत्साही, घरीच करा असा झटपट मेकअप

गणपती बाप्पा स्वागतासाठी यंदा तुम्हाला स्वतःच्या तयारी सोबतच घरातील अनेक गोष्टी स्वतःच कराव्या  लागणार. अशा वेळी बाप्पाच्या आगमनाची तयारी, पूजेचे साहित्य जागेवर ठेवणे, नैवेद्य आणि इतर स्वयंपाक अशा अनेक गोष्टी एकाच वेळी कराव्या लागण्यामुळे तुमची कदाचित तारांबळ उडू शकते. मात्र कितीही  कामे असली तरी हा सण नक्कीच खास आहे.कारण बाप्पाच्या आगमनाने आता सर्व काही परत पुर्वीसारखं होण्याची आशा निर्माण झाली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी घरात पाहुण्यांची वर्दळ नसली तरी सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलवरून  सर्वजण एकमेकांना नक्कीच भेटणार, या व्हर्चुअल गेट टु गेदरसोबत तुम्हालाही नटून थटूनच बाप्पाचं स्वागत करायचं आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अगदी झटपट आणि सोप्या मेकअप टिप्स शेअर आहोत. ज्या तुम्हाला गणेशोत्सवासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

Instagram

स्कीन केअर रूटीन फॉलो करा -

घरात बाप्पा येणार असेल तर तुम्हाला मेकअपसाठी नक्कीच फार वेळ काढता येणार नाही. यासाठीच मेकअप करताना फार साहित्याचा वापर करू नका. मात्र चेहऱ्यावर मेकअपचे कोणतेही साहित्य वापरण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा आणि मॉश्चराईझिंग क्रीम लावा. ज्यामुळे तुम्ही फ्रेश दिसाला आणि तुमचा लुक दिवसभर कायम राहील. 

जास्त मेकअप साहित्य वापरू नका -

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर एखादे चांगले आणि त्वचा  हायड्रेट ठेवणारे प्रायमर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने ग्लो करू लागेल. प्रायमर लावल्यावर फुल कव्हरेज देणारे अथवा प्रोफेशनल फांऊडेशन न वापरता. एखादं चांगलं बीबी क्रीम अथवा सीसी क्रीम वापरा. बाजारात हलक्या स्वरूपाची अनेक फाऊंडेशन मिळतात त्याचाही तुम्ही वापर करू शकता. ज्यामुळे तुमचा मेकअपवर जास्त वेळ वाया जाणार नाही. फाऊंडेशन अथवा क्रीम सेट झाल्यावर फक्त तुमच्या आवडीचे ब्लश गालावरूंन फिरवा आणि पटकन तयार व्हा. कारण असा नॅचरल लुकच गणेशोत्सवात जास्त छान दिसेल. 

Instagram

आयमेकअप आहे मस्ट -

आय मेकअप जितका  साधा असेल तितकं तुम्ही नॅचरल दिसाल. म्हणूनच फक्त तुमच्या ड्रेस  अथवा साडीला मॅच होईल अशी आयशॅडो लावा आणि आयलानर अथवा विंग आयलायनर लावा. ज्यामुळे तुमचे डोळे लगेच सुंदर दिसू लागतील. थोडंसं काजळ लावा आणि तुमचा आयमेक कम्लीट करा. घाईच्यावेळी मस्कारा, आयलॅश करण्याच्या मुळीच फंदात पडू नका. 

लिपस्टिकचा रंग डार्कच असू द्या -

कोणत्याही सणासमारंभासाठी तयार होताना नेहमी ओठांवर एखादी डार्क लिपस्टिक लावा. कारण फक्त लिपस्टिकमुळेच तुमचा चेहरा आकर्षक आणि फ्रेश दिसू लागेल. रेड, मरून, गुलाबी रंगाच्या  लिपस्टिमुळे तुमचा चेहा ग्लॅमरस दिसतो कार्यक्रमाच्या वेळी असे शेड कुल वाटतात. संध्याकाळी तयार होताना डार्क शेडमुळे तुम्ही आकर्षक दिसता तर दिवसा या शेडमुळे फ्रेश वाटता. जर तुम्हाला थोडा फेस्टिव्ह लुक हवा असेल तर शिमर लुकची लिपस्टिक अथवा मॅट लिपस्टिकवर थोडा ग्लॉस लावा. 

Instagram

हायलायटर अथवा ब्रॉंझरचा परफेक्ट वापर करा -

कोणताही फेस्टिव्ह लुक ग्लो शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून सर्वात शेवटी हायलाईट होणाऱ्या पॉईंट्सवर अथवा टी झोनवर हायलाईटर अथवा ब्रॉंझर लावा. भुवयांच्या खाली वरच्या पापणीवर, चिक बोन्स, चिन, नाक, कपाळ अशा भागांवरून ब्रॉंझर फिरवा आणि झटपट तयार व्हा. 

तुमची साडी अथवा ड्रेस फेस्टिव्ह लुकची असेल तर थोड्या शिमर लुक मेकअपनेही तुम्ही सुंदर दिसाल. शिवाय गणेशोत्सवासाठी घरात रोशनाई केलेली असते. घरात गणपती बाप्पा आल्यामुळे वातावरणात मुळातच प्रसन्नता असते.  अशा वातावरणात तुम्ही हा झटपट मेकअप करूनही मस्त दिसाल.