रीनाच्या ‘इन्स्टा लाईव्ह’ चा बोलबाला... चक्क भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलची हजेरी

रीनाच्या ‘इन्स्टा लाईव्ह’ चा बोलबाला... चक्क भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलची हजेरी

लॉकडाऊन च्या काळात प्रत्येकजण घरी असल्याने आपल्या स्मार्टफोन किंवा डिजीटल गॅझेटवर सोशल मीडिया चा सर्रास वापर करताना दिसत आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक मराठी तसेच बॉलिवूड सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी लाईव्ह येत असतात पण सध्या मराठी अभिनेत्री रीना अगरवाल च्या "इन्स्टा लाईव्ह" ची जोरदार चर्चा आहे. अभिनेत्री रीना अगरवाल लॉकडाऊन च्या काळात आपल्या चहेत्यांसाठी बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध लोकांसह वेगवेगळे विषय घेत इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन करत आहे. आजपर्यंत इन्स्टाग्राम लाईव्ह वर रीना सोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत काम करणारे चेहरे जसे की अहाना कुमरा, गणेश हेगडे, डब्बू रतनानी, किरण कोटरीयाल, रुपाली गांगुली, नीता लुल्ला तसेच मराठीतील शरद केळकर, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग या प्रसिद्ध सेलेब्रिटींची पाहुणे म्हणून वर्णी लागली आहे. 

मोठा ब्रेक मिळण्यापूर्वी या अभिनेत्री करत होत्या बी ग्रेड चित्रपटात काम

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने लावली हजेरी

सध्या तिच्या "इन्स्टार्स" या नावाने सुरू असलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह ची खूप चर्चा आहे, रीनाचे युट्युब स्टार धनश्री वर्मा सोबत लाईव्ह चालू असताना भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल याची प्रेक्षक म्हणून उपस्थित असून कमेंट सेक्शन मध्ये आपले अभिप्राय देताना दिसला. युझवेंद्र चहल त्याच्या क्रिकेटमधल्या कौशल्यामुळे तरुणांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच सोशल मीडियावर आपल्या मित्रमैत्रिणींच्या लाईव्ह वर आवर्जून हजेरी लावून मजेदार कमेंट्स देण्यासाठीदेखील तो चर्चेत असतो. यंदा युएई मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये युझवेंद्र चहल खेळणार असल्याचे वृत्त आहे. पण या लॉकडाऊन च्या काळात युझवेंद्रसारखे आपले अन्य खेळाडूदेखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना आपल्याला पाहताना मिळत आहे. अभिनेत्री रीना अगरवाल नेहमीच आपल्या इन्स्टा लाईव्ह मधून पडद्यावरच्या तसेच पडद्यामागच्या कलाकारांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असल्यामुळे नेहमीच इन्स्टा लाईव्ह वर अनेक सेलेब्रिटी जसे की अहाना कुमरा, अर्चना पुरण सिंह, पुष्कर जोग, रुपाली गांगुली, किरण कोटरीयाल हे खासकरून प्रेक्षक म्हणून हजेरी लावतात  "इन्स्टार्स" या इन्स्टा लाईव्ह वर भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल याची उपस्थिती तसेच रीनाच्या प्रश्नांवर आपल्या शैलीत दिलेल्या कमेंटरूपी उत्तरांनी रीनासोबत इतर प्रेक्षकांनादेखील सुखद धक्का बसला. रीनाला युझवेंद्रने ‘ब्युटी आणि ब्रेन’ अशी एका ठिकाणी कमेंट दिली असून  दुसऱ्या ठिकाणी त्याने ‘एन्जॉय ट्रोल्स’ असेही म्हटले आहे. प्रसिद्धीसह हल्ली ट्रोलिंग फ्री येते असंच झालं असलं तरीही रीनासाठी युझवेंद्रची कमेंट येणं हा नक्कीच सुखद धक्का आहे म्हणावं लागेल. 

बॉलीवूड सेलिब्रेटीज जे आहेत अजूनही अविवाहित

नुकताच रीनाच्या ‘31 दिवस’ चित्रपटाला झाली दोन वर्ष पूर्ण

रीना नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तसंच तिचा मराठी चित्रपट ‘31 दिवस’ला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाल्याचेही तिने पोस्ट केले होते. शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीनाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय रीना अनेक जाहिरातींमध्येही दिसते. रीनाने लॉकडाऊनमध्येही प्रेक्षकांचे मनोरंजन करणं चालूच ठेवले आहे. तिच्या इन्स्टाग्राम लाईव्हला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता रीना लवकरच कोणत्या नव्या सेलिब्रिटीशी गप्पा मारणार आहे याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. आता पुढचे गेस्ट कोण असणार याचीही उत्सुकता आता तिच्या फॉलोअर्समध्ये असते.   

सुंदर असूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करु शकल्या नाहीत या अभिनेत्री