ADVERTISEMENT
home / Recipes
Rice Recipes In Marathi

तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)

 

आपल्याकडे सर्वात जास्त कोणता पदार्थ खाल्ला जात असेल तर तो आहे गहू आणि तांदूळ. गव्हापेक्षाही बऱ्याच घरांमध्ये तांदळाचे पदार्थ जास्त प्रमाणात बनतात. भात कोणत्याही घरात बनत नसेल असं होत नाही. तसंच घरात वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही तांदळाचे पदार्थ (tandalache pith recipe in marathi) बनवण्यात येतात. मग तो पुलाव, बिर्याणी असो किंवा अजून कोणता पदार्थ असो. तांदळाचे अनेक पदार्थ बनतात. तांदळाच्या पिठापासूनही अनेक पदार्थ बनविण्यात येतात. प्रत्येकाची चव ही मसाल्यानुसार बदलत जाते. या लेखातून आम्ही तुम्हाला खास तांदळाचे पदार्थ आणि त्याची रेसिपी मराठीत देणार आहोत. तुम्हालाही ही सोपे तांदळाचे पदार्थ घरच्या घरी बनवून आपल्या घरातल्यांना इंप्रेस करता येईल. काही पदार्थ हे बनवयाला अतिशय सोपे असतात. जाणून घेऊया असे कोणते तांदळाचे पदार्थ आहेत जे तुमच्या तोंडाला पाणी आणतील.

मोदक (Modak)

उकडीचे मोदक

Instagram

 

बऱ्याच घरांमध्ये हमखास संकष्टी चतुर्थीला मोदक हा तोंडाला पाणी आणणारा पदार्थ तयार करण्यात येतो. विशेषतः मराठमोठ्या घरांमध्ये. दर महिन्याला नाही झाले तरीही गणेशोत्सवात अर्थात बाप्पा घरी येतो तेव्हा तर हमखास मोदक तयार करण्यात येतात. जाणून घेऊया याची रेसिपी 

उकड काढण्यासाठी लागणारे साहित्य 

ADVERTISEMENT
  • अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ
  • 2 ग्लास पाणी 
  • चवीपुरते मीठ 
  • तूप 
  • तेल (उकड मळण्यासाठी तेल जास्त प्रमाणात लागते. तसंच मोदक बनवताना पाकळ्या करतानाही हाताला तेल लावावे  लागते)

सारणासाठी लागणारे साहित्य

  • एक नारळ
  • पाव किलो गूळ
  • खवा (आवडीनुसार)
  • वेलची पावडर 
  • सुका मेवा

उकड काढण्यासाठी कृती 

  • आंबेमोहर तांदूळ धुऊन सुकत घालावा 
  • सुकल्यावर त्याचे पीठ करून घ्यावे 
  • 2 ग्लास पाणी उकळत ठेवावे
  • तितकेच तांदळाचे पीठ घ्यावे
  • पाण्याला अर्धवट उकळी आली की तांदळाचे पीठ  त्यात घालावे आणि ढवळावे. त्यात थोडं तूप घालावं
  • झाकण ठेऊन त्याला वाफ काढावी
  • व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर परात घ्यावी त्यात ही गरम तांदळाची पिठी काढून तेल लाऊन मळावी
  • उकड गरम असतानाच मळावी तरच मोदक चांगले होतात
  • हाताला तेल लावा आणि मोदकची पारी करायला घ्या 
  • त्याची पारी करून त्यात सारण भरावे 
  • मोदकाच्या सुबक पाळ्या करून हे मोदक मोदकपात्रात साधारण 20 मिनिट्स वाफवावेत 
  • गरम मोदक तूप घालून खायला द्यावे 

सारणाची कृती 

  • नारळ खवणून घ्यावा 
  • खोबऱ्याचे तुकडे पडणार नाहीत याची काळजी घेऊन हलक्या हाताने नारळ खवणावा
  • गूळ बारीक चिरून घ्यावा 
  • खोबरं आणि गूळ एकत्र मंद गॅसवर भाजावे आणि सारण तयार करावे
  • तुम्हाला खवा आवडत असल्यास यात खवा घालावा
  • सारण तयार होत आल्यावर वेलची पावडर घालावी 
  • आवडत असल्यास सुका मेवा अर्थात काजू, बदाम, बेदाणा घालावे 

वाचा – Popti Recipe In Marathi

ADVERTISEMENT

व्हेजिटेबल बिर्याणी (Veg Biryani In Marathi)

 

घरात कोणताही कार्यक्रम असल्यावर जेवायला काय करायचं हा प्रश्न पडतो. पण व्हेजिटेबल बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. अर्थात नॉनव्हेज खाणाऱ्यांना याचा काही उपयोग नाही. मात्र बिर्याणी हा पर्याय अप्रतिमच आहे.

साहित्य 

  • 1 कप बासमती तांदूळ 
  • पाव कप तूप
  • 2 मोठे तेल
  • पाव कप दही
  • जिरे
  • हळद पावडर
  • धने पावडर
  • लाल मिरची पावडर
  • 2-3 हिरवी मिरची
  • काजू, बेदाणे 
  • चवीपुरते मीठ 
  • पाणी 

मसाले 

  • दालचिनी 
  • तेजपत्ता 
  • 2 मोठी वेलची 
  • 7-8 काळी मिरी 
  • 5-6 लवंग
  • बिर्याणी मसाला

भाजी 

ADVERTISEMENT
  • पाव कप कापलेली फरसबी
  • पाव कप गाजर 
  • पाव कप वाफवलेले वाटाणे 
  • पाव कप टॉमेटो
  • पाव कप चिरलेला कांदा 
  • कोथिंबीर
  • एक उभा चिरलेला कांदा (तळून घालण्यासाठी)

कृती 

  • तांदूळ धुऊन पातेलीत शिजवून घ्यावेत (कुकरमध्ये शिजवू नयेत. भात तुटतो)
  • एका पातेलीत तेल घालावे. त्यात उभा चिरलेला कांदा तळून घ्यावा
  • कांदा बाहेर काढल्यावर त्याच तेलात तुम्ही जिरे, हळद, कांदा परतून घ्यावा. त्यात वरील सर्व अख्खे मसाले टाकावेत.
  • वरून सर्व भाज्या टाकून वाफ काढावी
  • त्यामध्ये धने पावडर, बिर्याणी मसाला आणि मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे
  • बिर्याणी तयार करताना पहिले खाली भाताचा थर लावा. त्यानंतर तयार केलेली भाजी आणि त्यावर तळलेला कांदा ठेवा.
  • असाच वर पुन्हा भाताचा थर, भाजी आणि कांदा असे करून दोन ते तीन थर बनवा आणि वाढताना एका बाजूने वाढा. जेणेकरून सर्व एका रेषेत वाढले जाईल. 

चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

हर्ब लेमन राइस (Herb Lemon Rice Recipe In Marathi)

 

शरीराला पदार्थांमधून पौष्टिकता मिळणेही तितकेच आवश्यक आहे. दाक्षिणात्य असा हर्ब लेमन राईस (herb lemon rice recipe in marathi) यासाठी उत्तम पदार्थ आहे. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 2 कप बासमती तांदूळ
  • 4 कप पाणी 
  • 4 लसणीच्या पाकळ्या 
  • पाव कप बटर
  • अर्धा चमचा मीठ 
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर
  • पाव कप कापलेले बेसिल, रोझमेरी, पुदीना, पार्सले, ओरेगॅनो 
  • 1 लिंबाचा रस 

कृती 

  • पाण्यात भात आणि लसूण घालून शिजवून घ्या.
  • भातातील अतिरिक्त पाणी काढा त्यात लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून पुन्हा एकदा मंद आचेवर भात शिजवा. 
  • एका पॅन मध्ये कापलेल्या भाज्या वाफवून घ्या. 
  • त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. भात शिजल्यावर हे दोन्ही मिक्स करा आणि गरमागरम खायला द्या. 

नारळी भात मराठी रेसिपी (Coconut Rice Recipe In Marathi)

 

आपल्याकडे विशेषतः नारळी पौर्णिमेला नारळी भात हा खास पदार्थ करण्यात येतो. मात्र आता हा पदार्थ फारच कमी लोकांना कसा करायचा ते माहीत आहे. याची रेसिपी मराठीत जाणून घ्या. 

नारळ गूळ मिश्रणासाठी साहित्य 

  • 1 चमचा तूप
  • 10 काजू (बारीक कापून)
  • 10 बदाम (बारीक कापून)
  • 1 भांडं खवणलेला नारळ
  • 1 भांडं चिरलेला गूळ 

अन्य साहित्य 

ADVERTISEMENT
  • 2 चमचे तूप
  • वेलची पावडर
  • 3-4 लवंग
  • 2-3 तुकडे दालचिनी 
  • अर्धा कप बासमती तांदूळ (किमान अर्धा तास भिजवून ठेवा)
  • 1 कप पाणी
  • केशर
  • चवीपुरते मीठ

कृती 

  • एका कढईत तूप गरम करा त्यात वेलची, लवंग आणि दालचिनी टाकून सुगंध येईपर्यंत तळा. आता त्यात भिजलेले तांदूळ घाला आणि साधारण 1 मिनिटपर्यंत परतत राहा. 
  • वरून पाणी, केशर आणि मीठ घालून नीट ढवळा
  • व्यवस्थित मिक्स केल्यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर साधारण 10 मिनिट्स भात शिजू द्या 
  • दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात काजू, बदाम भाजून घ्या
  • त्यावर गूळ आणि खोबरं घाला आणि व्यवस्थित भाजा. हे मिश्रण मिक्स झाल्यावर सुगंध यायला लागेल. त्यात वेलची पावडर घाला
  • हे मिश्रण भातात मिक्स करा आणि व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर शिजू द्या. नारळी भात तयार आहे 

तांदळाच्या पिठाचे लाडू (Rice Flour Ladoo In Marathi)

 

आपण अनेक लाडू ऐकले आहेत. पण तांदळाच्या पिठाचे लाडू तुम्ही कधी खाल्ले आहेत का? हे लाडूदेखील चवीला अप्रतिम लागतात. 

साहित्य 

  • 2 वाट्या तांदळाचे पीठ 
  • दीड वाटी साखर 
  • दीड वाटी तूप
  • 1 वाटी ओले खोबरे 
  • वेलची पावडर 
  • 1 चमचा खसखस पूड 

कृती 

ADVERTISEMENT
  • तांदूळ तीन दिवस भिजत घाला
  • रोज सकाळी याचे पाणी बदला आणि परत नवीन पाण्यात भिजत ठेवा 
  • तीन दिवसांनंतर ते वाळवा आणि वाळल्यावर लालसर होईपर्यंत भाजा 
  • त्यांनंतर त्याचे पीठ करून आणा 
  • खसखस भाजून त्याची पूड करा
  • तूप तापवून त्यात तांदळाचे पीठ भाजा 
  • दुसऱ्या पॅनमध्ये ओलं खोबरं भाजून घ्या 
  • एका भांड्यात एकतारी पाक तयार करा
  • त्या पाकात तांदळाचे पीठ, खोबरं, खसखस पूड आणि वेलची पावडर मिक्स करून एकत्र करून घ्या
    जरा वाळल्यावर लाडू वळा 

रव्याच्या चविष्ट रेसिपी, पाहून तोंडालाही सुटेल पाणी (Rava Recipes In Marathi)

तांदळाचे पापड (Rice Papad)

 

घरात खिचडी केल्यानंतर आपल्याला त्याबरोबर लोणचं आणि पापड तर चवीला लागतंच. हे असेच तांदळाचे पदार्थ तयार करताना तांदळाचे पापडही घरी बनवणं सोपं आहे. 

साहित्य 

  • तांदळाचे पीठ  
  • मीठ चवीनुसार
  • पापडखार 1 चमचा 
  • तीळ
  • जिरे 
  • हिंग
  • मिरची पेस्ट 
  • लसूण पेस्ट 

कृती 

ADVERTISEMENT
  • दोन वाट्या पाणी उकळत ठेवा 
  • त्यात पापडखार, मीठ आणि इतर साहित्य मिक्स करा
  • पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून लगेच लाटण्याने घोटून घ्या 
  • झाकण ठेऊन गॅस बंद करून वाफ येऊ द्या 
  • पाच मिनिट्सने परातीत पीठ काढून चांगले मळून घ्या
  • लाडू इतके गोळे करा आणि ते पातेल्यात 10-15 मिनिट्स उकडून घ्या
  • दुसऱ्यांदा उकडलेले हे पीठ तेल लाऊन पुन्हा चांगले मळून घ्या 
  • याचे लहान गोळे करून प्लास्टिक पेपरवर लाटा
  • दोन ते तीन दिवस हे कडक उन्हात वाळवा 

राईस सीख कबाब (Rice Seekh Kabab)

 

घरी सतत भात, पुलाव आणि बिर्याणी हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाल राईस सीख कबाब हा पदार्थही घरच्या घरी मस्त बनवता येईल. असे सीख कबाब हे तोंडाला पाणी आणतात. तसंच संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही हा उत्तम पदार्थ आहे.  

साहित्य 

  • 2 वाट्या तांदळाचा शिजवलेला भात 
  • 2 चमचे आलं – लसूण पेस्ट
  • 2 चमचे धणे – जिरे पावडर
  • 2 चमचे कॉर्नस्टार्च
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • 1 चमचा चाट मसाला 
  • 2 उकडलेले बटाटे (लहान)
  • 1 चमचा तिखट पावडर
  • चवीनुसार मीठ 
  • तेल

कृती 

  • भात, बटाटे आणि वरील सर्व मसाले एकत्र (चाट मसाला आणि कॉर्नस्टार्च सोडून) करून व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • हे  मिश्रण एकत्र करत असताना त्यात थोडे तेल मिक्स करा 
  • तयार झालेले मिश्रण एका सळईला लावा
  • थर लावताना हाताला कॉर्नस्टार्च लावा म्हणजे चिकटणार नाही 
  • अशाच सळई तयार करून घ्या
  • त्यानंतर शेगडीवर अर्धवट भाजून घ्या 
  • भाजल्यानंतर पुन्हा वरून तेल लावा आणि गॅसवर पुन्हा भाजा 
  • वरून चाट मसाला लावा आणि सर्व्ह करा
  • तुम्हाला हवं असल्यास वरील मिश्रणाचे गोळे करून तुम्ही शॅलोफ्राय करून कबाब बनवू शकता

ब्लॅक राईस (Black Rice)

 

ब्लॅक राईस हा तांदळाचा एक वेगळा प्रकार आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 2 वाट्या तांदूळ 
  • 2 चमचे तेल
  • 1 चमचा काळीमिरी 
  • 5-6 लवंग 
  • 5-6 पाकळ्या बारीक चिरलेली लसूण 
  • अर्धा चमचा लिंबाचा रस 
  • चवीनुसार मीठ 

कृती 

  • तांदूळ मंद आचेवर काळसर भाजून घ्या. पण काळसर भाजताना तो जळणार नाही याची काळजी घ्या 
  • त्यानंतर गरम पाण्यात हा तांदूळ टाकून अर्धा तास भिजवत ठेवा 
  • एका पॅनमध्ये तेल घ्या. त्यात काळीमिरी, लवंग आणि लसूण घालून परतून घ्या
  • त्यात लिंबाचा रस, मीठ, साखर आणि पाणी घालून ते उकळून घ्या 
  • पाणी उकळल्यावर तुम्ही भिजवलेले तांदूळ त्यात घालून शिजवा. ब्लॅक राईस तयार आहे. रायत्याबरोबर हा राईस खायला छान लागतो

भंडारी भातोडे (Bandhari Batode)

 

हा सहसा ऐकलेला पदार्थ नाही. विदर्भातील हा पदार्थ असून इथे जास्त भाताचे उत्पन्न होते त्यामुळे वेगवेगळे पदार्थ करण्यात येतात. त्यातील तांदळाचा हा एक पदार्थ आहे. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 4 वाट्या भात 
  • 2 चमचे कुटलेले धणे
  • 1 चमचा जिरे पावडर
  • 4-5 कुटलेल्या हिरव्या मिरच्या
  • आलं – लसूण 2 चमचे 
  • 2 चमचे कुटलेली बडिशेप
  • 3 वाट्या बारीक चिरलेला कांदा 
  • अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • चिमूटभर हळद 
  • तेल (तळण्यासाठी)
  • कोथिंबीर चिरलेली
  • चवीनुसार मीठ 

कृती 

  • तांदळाचे पीठ सोडून सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करून नीट मिक्स करून घ्या
  • त्यानंतर तांदळाच्या पिठाच्या मदतीने गोळे करून त्याचे वडे थापून घ्या
  • तेल तापवून त्यात हे वडे तळा 
  • दह्याबरोबर अथवा तिखट चटणीसह भातोडे खायला द्या 

राईस सूप (Rice Soup)

 

तांदळाचे पदार्थ अनेक पदार्थ आपल्याला माहीत आहेत. पण त्याचे सूपही करतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे सूप कसे करायचे जाणून घेऊया. 

साहित्य 

  • भात कुकरमध्ये न शिजवता पाण्यात शिजवा आणि हे पाणी काढून घ्या
  • तांदळाचे पाणी 4-5 वाट्या
  • साखर
  • मीठ
  • दही अर्धी वाटी (घुसळून मग वापरावे)
  • चिरलेली कोथिंबीर 
  • फ्रेश क्रिम 
  • 2 चमचे भिजवून तळलेले तांदूळ 

कृती

ADVERTISEMENT
  • भातावरचे तांदळाचे पाणी उकळवायला ठेवा
  • त्यात घुसळलेले दही, मीठ, साखर घाला आणि उकळवून घ्या 
  • सर्व्ह करताना गरम असतानाच त्यात तळलेले तांदूळ, फ्रेश क्रिम आणि चिरलेली कोथिंबीर घाला (तुम्हाला हवं असल्यास, आलं लसूण पेस्ट घालू शकता)

तांदळाचे अनारसे (Rice Anarase)

 

आतापर्यंत आपल्या भोपळ्याचे अनारसे माहीत होते पण तांदळाचे अनारसे कसे करायचे ते जाणून घेऊया. 

साहित्य 

  • पाव किलो जुने तांदूळ
  • पाव किलो गूळ 
  • अर्धा लीटर तूप
  • मीठ
  • खसखस 

कृती 

  • तांदूळ तीन दिवस भिजत घाला
  • रोज सकाळी याचे पाणी बदला आणि परत नवीन पाण्यात भिजत ठेवा 
  • तीन दिवसानंतर थोडे वाळवा. ओलसर असतानाच खलबत्त्यात कुटा आणि बारीक चाळणीने त्याचे पीठ चाळून घ्या 
    गूळ बारीक चिरून घ्या 
  • तूप फेटून त्यात गूळ कालवा, त्यात मीठ घालून या मिश्रणाचे लाडू करून डब्यात ठेवा  
  • हे पीठ साधारण 10 दिवस मुरू द्या आणि नंतर काढून मळून घ्या 
  • त्यात मळताना थोडे दही अथवा पिकलेले केळं घालून पीठ मळा 
  • पुन्हा लहान गोळे करा 
  • कोरड्या ताटात खसखस पसरा आणि त्यावर हे थापा
  • तुपात सोडून तळा 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

तांदळाचे वडे (Rice Wade)

 

तांदळाचे वडे हा एक वेगळा पदार्थ आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की पिठाचे वडे करून तळायचे. पण याची रेसिपी थोडी वेगळी आहे. 

साहित्य 

  • 3 वाट्या तांदूळ 
  • अर्धा किलो गूळ 
  • वेलची पावडर 
  • 3 चमचे खोबऱ्याचे तुकडे 
  • 3 चमचे पांढरी चवळी 
  • अर्धा चमचा हळद 
  • तेल

कृती 

  • तांदूळ तासभर भिजवा 
  • कपड्यावर कोरडे करा आणि कोरडे झाल्यावर कुटून घ्या 
  • तांदळाचे हे पीठ बदामी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या 
  • एका भांड्यात पीठ मापून घ्या. जितके पीठ असेल तितका गूळ चिरून घ्या 
  • एका पातेल्यात अर्धी वाटी पाणी घ्या आणि त्यात गूळ घाला
  • चवळी एका बाजूला भाजून घ्या 
  • गूळ विरघळला की त्यात पीठ, हळद आणि भाजलेली चवळी घाला. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर घाला
  • नंतर थंड झाल्यावर मध्यम आकाराचे वडे तयार करा 
  • कुकरमध्ये हे वडे पानावर ठेवा आणि वाफवा 

तांदळाची पुरी (Rice Puri)

 

घरच्या घरी झटपट तांदळाची पुरी करायची असेल तर हा उत्तम पर्याय आहे. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तुम्ही हा तांदळाचे पदार्थ करून खाऊ शकता. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 2 वाटी तांदूळ पीठ 
  • 2 चमचे धने पावडर
  • 2 चमचे जिरे पावडर
  • 2 चमचे बडिशेप पावडर
  • 2 चमचे तिखट
  • 2 चमचे ओवा 
  • मीठ 
  • तेल (तळण्यासाठी)
  • पाणी 

कृती 

  • वरील सर्व साहित्य एकत्र करून कणकेप्रमाणे पीठ भिजवून घ्या 
  • पिठाचे गोळे करून पुरीप्रमाणे लाटून घ्या 
  • तळून घेतल्यानंतर गरमागरम पुऱ्या सॉस अथवा चटणीबरोबर खायला द्या

तसंच तुम्ही झटपट आणि पौष्टिक तांदळाची खीर रेसिपी ही करू शकता. जी बरेच जणांकडे नैवेद्य म्हणूनही केली जाते.

16 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT