भाताच्या पेजेचा करा आरोग्यासाठी उपयोग, वाढवा ऊर्जा

भाताच्या पेजेचा करा आरोग्यासाठी उपयोग, वाढवा ऊर्जा

आजारी असल्यानंतर तांदळाची अर्थात भाताची पेज हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. भाताचीची पेज म्हणजे काय तर भात शिजवताना उरलेले पाणी म्हणजे पेज. तांदळाचे अर्थात भाताचे हे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. भात कुकरमध्ये शिजविण्यापेक्षा तुम्ही जर बाहेर शिजवला तर त्याचा शरीरासाठी खूपच फायदा होतो. इतकंच नाही तर भाताच्या या पेजेमुळे तुमची तब्बेतही अतिशय उत्तम राहाते. भाताची हे पेज नाश्ता म्हणून उत्तम आहे. कारण दिवसभर तुमच्या शरीरात यामुळे ऊर्जा उत्तम राहाते. भाताच्या पेजेमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. म्हणूनच बऱ्याचदा कोकणात तुम्हाला भाताची पेज हाच नाश्ता पाहायला मिळतो. याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. 

ऊर्जेचा उत्तम स्रोत

Shutterstock

भात शिजवताना सहसा कुकरमध्ये न शिजवता बाहेर पातेलीत शिजवावा. यावरील जे पाणी असते ते पिण्यासाठी वापरावे. तुम्हाला हवं तर त्यात थोडे मीठ घालून ही भाताची पेज प्यावी. या पेजेमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा चांगली राहाते. भाताची पेज हा उर्जेचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये परिपूर्ण कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहाते आणि त्यामुळे काम करताना थकायला होत नाही. तसंच लवकर भूक लागत नाही. तसंच अनेक आजारांपासून दूर राहण्यासही मदत मिळते. 

घनदाट केसांसाठी वापरा तांदूळाचे पाणी (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते

भाताच्या पेजेमध्ये भरपूर फायबर असते. तसंच आपल्या मेटाबॉलिजमला वाढविण्यास यामुळे मदत होते. मेटाबॉलिजम व्यवस्थित झाले की पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. तसंच जिवाणूंना सक्रिय करण्याचे काम भाताची पेज करते. त्यामुळे ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. त्यांना यातून सुटका मिळवायची असेल तर त्यांनी नियमित भाताजी पेज सकाळी प्यावी.  जेणेकरून पचनतंत्र सुधारून पोटात दुखणेही बंद होईल. पोट साफ होऊन तुम्हाला त्रास होणं बंद होईल. 

जुलाबावर फायदेशीर

तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असेल तर तुम्ही भाताचे पाणी यावर औषध म्हणून पिऊ शकता. अगदी मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांच्या जुलाबावरही हा उत्तम उपाय आहे. त्रास सुरू झाल्यावर लगेच तुम्ही भाताची पेज करून प्यायल्या,  तुम्हाला याचा त्वरीत परिणाम दिसून येतो. तसंच पुढील गंभीर दुष्परिणाम होण्यापासून तुम्ही वाचू शकता. अगदी डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. हा घरगुती उपाय तुम्ही त्वरीत करून पाहिल्यास, तुम्हाला नक्की याचा चांगला परिणाम दिसून येईल. 

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

तापावर गुणकारी

Shutterstock

साधा ताप अथवा व्हायरल इन्फेक्शन असल्यास, बऱ्याच घरात भाताची पेज करून देण्यात येते आणि त्यावर हा उत्तम उपाय आहे. भाताची पेज प्यायल्याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता राहात नाही. तसंच अशावेळी तोंडाची चवही निघून गेलेली असती. पण भाताजी पेज तुम्ही लोणचं अथवा तूप, मीठ घालून खाल्ल्यास, तुमच्या तोंडाची चवही राहाते. तसंच शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वही या पेजेतून मिळतात आणि ऊर्जा मिळून तापातून लवकर बरं होता येतं.  तापात शरीरातील शक्ती कमी होते. मात्र भाताची पेज पोटात गेल्यानंतर व्यवस्थित ऊर्जा राहून तुम्हाला बरं वाटतं. 

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

पाण्याच्या कमतरतेला संतुलित करते

शरीरात जर पाण्याची कमी जाणवत असेल अर्थात जर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल त्यावर भाताची पेज हा उत्तम पर्याय आहे.  शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढायची असेल अथवा पाण्याच्या कमतरतेला संतुलित करण्यासाठी भाताच्या पेजेचा उपयोग होतो.