ADVERTISEMENT
home / नातीगोती
Love Story Book In Marathi

वाचा मराठीतील या बेस्ट रोमॅंटिक कादंबरी (Love Story Book In Marathi)

 

पाऊस आणि रोमान्स यांचा जवळचा संबध आहे. मुसळधार पाऊस पडत असताना बाल्कनीत बसून गरमागरम चहा आणि आवडीचे पुस्तक हा एक मस्त बेत असू शकतो. अशा वेळी जर तुमच्याकडे मराठी कादंबरी  असेल तर तुमचा वेळ अगदी मजेत जाईल. भयपट किंवा थ्रिलर कादंबरी चाहत्यांना कदाचित हे आवडत नसावे. प्रेमकथा हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. कारण मुळात प्रेम हीच एक विलक्षण गोष्ट आहे. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणायला सोपं आहे. मात्र वास्तविक प्रत्येकाची प्रेमकथा निराळी असते. काहींना प्रेमात यश मिळतं तर काहींना अपयश. मात्र तरिही प्रत्येकाची प्रेमकथा खासच असते. यासाठीच जाणून घेऊया मराठीतील अशाच काही लोकप्रिय प्रेमकथा. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मराठीतील काही रोमॅंटिक कादंबरींची लिस्ट (Romantic Kadambari In Marathi) जी तुमच्या वाचनछंदात नक्कीच भर टाकेल.

राऊ (Rao)

 

कादंबरीचे लेखक – ना. सं इनामदार

कादंबरीचे  सार – राऊ ही पेशवेकालीन इतिहासावर आधारित एक कादंबरी आहे. बाजीराव पेशवे म्हणजेच राऊ यांचा जीवनपट यात मांडण्यात आला  आहे. बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांची प्रेमकथा ही इतिहासातील एक अजरामर प्रेमकथा आहे. या कादंबरीतून तुम्हाला या प्रेमकथेचा जवळून उलगडा होईल. यात राऊंचे काशीबाई आणि मस्तानी या दोघींवर असलेले निस्वार्थ प्रेम मांडण्यात आलेले आहे. पेशव्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी राऊ नक्कीच वाचा 

Love Story Book In Marathi

राऊ – Love Story Book In Marathi

ADVERTISEMENT

हाफ गर्लफ्रेंड (Half Girlfriend Book In Marathi)

 

कादंबरीचे लेखक – चेतन भगत 

कादंबरीचे सार – चेतन भगत हे रोमॅंटिक कादंबरी लिहिणारे एक लोकप्रिय लेखक आहेत. त्यांनी अनेक प्रेमकथा लिहिल्या आहेत. त्याची पुस्तके इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा सर्व भाषेत उपलब्ध आहेत. चेतन भगत यांचा  वाचकवर्ग तरूण असल्यामुळे त्यांच्या प्रेमकथा युवांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंड या रोमॅंटिक कादंबरीमध्ये येणारे संदर्भ हे आजच्या तरूणांच्या प्रेमकथेशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. या कथेवर आधारित हिंदी चित्रपटही बॉलीवूडमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे नावही हाफ गर्लफ्रेंड असेच होते.

Marathi Love Story Book

हाफ गर्लफ्रेंड – Marathi Love Story Book

बुमरॅंग (Boomerang)

 

कादंबरीचे लेखक – बाबा कदम

ADVERTISEMENT

कादंबरीचे सार – बाबा कदम हे मराठीतील एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची अनेक विषयांवरील कादंबरी आणि पुस्तके लोकप्रिय आहेत. बाबा कदम यांचे मुळ नाव वीरसेन आनंद कदम असे आहेत. बाबा कदम यांच्या इतरही अनेक प्रेमकथा तुम्हाला आवडू शकतात. मात्र बुमरॅंग या कादंबरीचे दोन भाग त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे हे कथानक आगळं वेगळं आणि तुम्हाला आवडेल असं नक्कीच आहे. 

Marathi Romantic Kadambari List

Boomerang – Marathi Romantic Kadambari List

गंधाली (Gandhali)

कादंबरीचे लेखक – रणजित देसाई

कादंबरीचे सार – रणजित देसाई यांनी ऐतिहासिक व्यक्तींवर अनेक लेखन केलेलं आहे. गंधाली कथाही अशाच एका ऐतिहासिक व्यक्ती आणि प्रसंगावर आधारित आहे. स्वप्नवत वातावरण, करूण आणि शोकात्मक शेवट यामुळे ही कथा वाचकाला भारावून टाकते. मनाला उदात्तेची आणि शौर्याची जाणीव करून देणारी आणि मनाला या व्यक्तिमत्वांमध्ये गुंग करणारी गंधाली ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला मराठी ऐतिहासिक कादंबरी वाचनाची आवड असेल तर ही कादंबरी अवश्य वाचा.

ADVERTISEMENT

Romantic Novels In Marathi

गंधाली – Romantic Novels In Marathi

ही तुझी कहाणी नाही (This Is Not Your Story)

कादंबरीची लेखिका – सवि शर्मा 

कादंबरीचे सार – लेखिकेने गहिऱ्या ह्रदयातून अनुभवलेल्या भावना या पुस्तकातील कथेत मांडल्या आहेत. त्यामुळे या कथांमध्ये वाचक आपोआप गुंतत जातो. ही तुझी कहाणी नाही ही सुद्धा एक चित्तवेधक, प्रेरक आणि अतिशय प्रांजळ कहाणी आहे. बऱ्याचदा कथेत लेखक आपली  कथा मांडत नाहीत. मात्र त्या कथेतून जणू आपलेच मनोगत व्यक्त होत आहे असं वाटत राहतं. अशीच ही एक कथा आहे म्हणून या कथेचं नाव ही तुझी कहाणी नाही असं आहे. यात एका शोर्य नावाच्या सी.ए.च्या विद्यार्थ्यांची आणि इंटिरिअर डिझायनर मिरायाची कहाणी मांडण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

Marathi Romantic Novels

ही तुझी कहाणी नाही – Marathi Romantic Novels

तुझ्याविना (Tujhyavina)

 

कादंबरीचे लेखक – विजय माने

कादंबरीचे सार – तुझ्याविना ही एक विलक्षण प्रेमकथा आहे. यात समीर आणि आर्या या दोन नुकत्याच इंजिनिअर झालेल्या प्रेमयुगुलाची कथा मांडण्यात आली आहे. समीर हुशार आणि मेहनती आहे आणि स्वतःमध्ये रमणारा आहे तर आर्या सुंदर आणि बुद्धीमान आहे. जर तुम्हाला आजकालच्या जीवनशैलीशी मिळत्या जुळत्या कथा वाचायला आवडत असेल तर ही कादंबरी अवश्य वाचा.

ADVERTISEMENT

तुझ्याविना

तुझ्याविना – Love Story Book In Marathi

ती लाजते जेव्हा… एक सुरूवात (She’s Shy When… A Start)

 

कादंबरीची लेखिका – निशिगंधा ओमणवार

कादंबरीचे सार – स्त्रीला तिच्या वैयक्तिक जीवनात करिअरमध्ये आणि सामाजिक जीवनात नेहमीच संघर्ष करावा लागतो. एवढं करूनही तिला हवा तसा मानसन्मान, आदर समाजाकडून, कुटुंबाकडून मिळतोच असं नाही. ती लाजते तेव्हा ही शिवानीची कथा आहे. ती जगाशी झुंजत असताना रणजित तिला कशी साथ देतो हे यात मांडण्यात आलं  आहे.

ADVERTISEMENT

वाचा – Va. Pu. Kale Quotes In Marathi

ती लाजते जेव्हा... एक सुरूवात

ती लाजते जेव्हा… एक सुरूवात – Marathi Love Story Book

टू स्टेटस् (2 States)

कादंबरीचे लेखक – चेतन भगत

ADVERTISEMENT

कादंबरीचे सार – चेतन भगत हे रोमॅंटिक कादंबरी लिहिणारे एक लोकप्रिय लेखक आहेत. सहाजिकच त्यांच्या सर्वच प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. चेतन भगत यांची टू स्टेटस ही कादंबरीही खूप लोकप्रिय आहे. यात दोन भिन्न संस्कृतीत वाढलेल्या प्रेमयुगुलाची कथा मांडण्यात आली आहे. लग्न हा एक सामाजिक संस्कार आहे. यातून दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात. मात्र जेव्हा  दोन भिन्न संस्कृतीत वाढलेल्या व्यक्ती एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत नेमकं काय काय घडू शकतं हे यात मांडण्यात आलं आहे.

टू स्टेटस्

टू स्टेटस् – Marathi Romantic Kadambari List

लव्ह इज जिंदगी (Love Is Zindagi)

कादंबरीची लेखिका – किमया कोल्हे

ADVERTISEMENT

कादंबरीचे सार – या कादंबरीमध्ये तुम्हाला तीन निरनिराळ्या प्रेमकथा गुंफलेल्या आढळतील. लोकप्रिय मराठी लेखिका किमया कोल्हे यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. जर तुम्हाला मराठी लव्हस्टोरीज वाचण्यात रस असेल तर ही कादंबरी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या तिन्ही प्रेमकथांमध्ये एक दुवा गुंफलेला आहे तो जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचा. 

लव्ह इज जिंदगी

लव्ह इज जिंदगी – Romantic Novels In Marathi

नेट – प्रेम (Net – Love)

कादंबरीची लेखिका – प्रिया सातपुते

ADVERTISEMENT

कादंबरीचे सार – आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस पुरता गॅझेट आणि इंटरनेटमध्ये गुंतून गेलेला आहे. मात्र या इंटरनेटच्या माध्यमातूनही आजकाल अनेक प्रेमकथा जुळत असतात. कारण इंटरनेटमुळे वास्तविक एकमेकांमध्ये कितीही अंतर असलं तरी एकमेकांच्या खाजगी आयुष्यात प्रवेश करणं खूप सोपं आहे. त्यामुळे  आजच्या पिढीचा विचार करत या प्रेमकथेची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही कथा ऑनलाईन रिलेशनशिपवर आधारित आहे. जर तुम्ही अशाच (Romantic Novels In Marathi) च्या शोधात असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. 

नेट - प्रेम

नेट – प्रेम – Marathi Romantic Novels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे (Best Novels & Books In Marathi)

संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)

बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक

19 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT