'किस' कसं घ्यायचं हे प्रत्येक प्रेमवीरांना माहीत असायलाच हवं

'किस' कसं घ्यायचं हे प्रत्येक प्रेमवीरांना माहीत असायलाच हवं

प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकाची वेगळी असली तरीही त्याची सुरूवात होते ती ‘किस’ अर्थात चुंबनाने. प्रेम अथवा सेक्स करायचं म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा किस करणं हे स्वाभाविक आहे.पण किस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात याबाबत तुम्हाला काही माहीत आहे का? एक ठराविक वय झाल्यानंतर तुम्हाला किस आणि त्याच्या काही महत्त्वाच्या पद्धती या माहीत असायलाच हव्यात. कारण किस घेतल्याशिवाय प्रेमाला अथवा सेक्सला काहीच अर्थ उरत नाही. मुळात किस करणं ही एक क्रिया नाही तर ती एक भावना आहे आणि ती व्यवस्थित व्यक्त करता यायला हवी.  त्याबद्दलच काही महत्त्वाची माहिती यातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक ‘कामसूत्रा’त वात्स्यायन ऋषींनी सेक्स लाईफ अधिक रोमँटिक बनविण्यासाठी कशा प्रकारे चुंबन घ्यायला हवं याचा साधारण 250 वेळा तरी किमान उल्लेख केला आहे.  सेक्स थेरेपिस्ट अनुसार किस अर्थात चुंबन ही अशी भाषा आहे जी प्रेम, विश्वाससारखी भावना शब्दांशिवाय आपल्या जोडीदारापर्यंत पोहचवते. प्रत्येक कपलसाठी किस करणं ही एक कला आहे.  जितकी अधिक क्रिएटिव्ह बनवता येईल तितकं सेक्स लाईफ अधिक चांगलं होतं. 

फ्रेंच किस

Giphy

फ्रेंच किस हे सर्वात प्रसिद्ध किस आहे. प्रत्येकाला याबाबत माहीत असतंच. हे सर्वात पॅशनेट आणि सर्वात हॉट किस समजण्यात येतं. यालाच टंग किस असंही म्हटलं जातं. ज्या कपल्सना वाईल्ड सेक्समध्ये मजा येत असेल त्यांना फ्रेंच किस नक्कीच आवडते. जोडीदाराची जीभ जेव्हा तुमच्या जीभेला स्पर्श करते आणि जी भावना निर्माण होते त्यालाच ‘French Kiss’ असं म्हणतात. तुम्ही जेव्हा तुमच्या प्रेमाची पुढची पातळी गाठता तेव्हा फ्रेंच किस हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो.  

Kiss करण्याचे असतात अफलातून फायदे, आरोग्य राहातं निरोगी

सिंगल लिप किस

आपल्या जोडीदाराला पूर्णतः मिठीत घेऊन केवळ एका ओठाने किस करण्याची कला ही सगळ्यांनाच अवगत नसते. हे अतिशय स्मूथ आणि प्रेमळ चुंबन असते. या किसमध्ये जोडीदाराच्या ओठांचा चावा अजिबातच घेतला जात नाही. तसंच तुमच्या प्रेमाची ही जर सुरुवातीची वेळ असेल तर सिंगल लिप किस घेणं उत्तम.  जोडीदाराला आपलं प्रेम व्यक्त करण्याची आणि ‘आय लव्ह यू’ म्हणण्याची ही सुंदर पद्धत आहे. 

स्पायडरमॅन किस

हे किस नवीन आहे. हॉलीवूडमधील स्पायडरमॅन हा चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. या चित्रपटातील किसिंग सीन अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याला अपसाईड डाऊन  किस असंही म्हणतात. त्यामुळे जगभरातील अनेक कपल्स अशा तऱ्हेने किस करणं पसंत करतात. या चित्रपटात अर्थात स्पायडरमॅनने भितींला लटकून किस केलं होतं. मात्र तुम्हाला तसं काहीही करायची गरज नाही.  तर बेडवरच तुम्ही अशा तऱ्हेने किस ट्राय करू शकता.

रात्र बनवायची आहे अधिक रोमँटिक तर नक्की खेळा किसिंग गेम

एस्किमो किस

नवीन लग्न झालेल्या अथवा नव्याने प्रेमात पडलेल्या कपल्ससाठी हे किस उत्तम पर्याय आहे. हे किस मूलतः एस्किमो लोकांचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पाठीवर अतिशय प्रेमाने नाक घासता तेव्हा हे किस घेतलं जातं. हे सेक्शुअल किस नसलं तरीही एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी हे किस खूपच उपयुक्त ठरतं. तुम्हाला जेव्हा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करायचं असतं तेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने लाडात येऊन प्रेम व्यक्त करू शकता.

व्हॅम्पायर किस

Giphy

नावाप्रमाणे हे किस नक्कीच नाही. पण त्यातील तुमची भावना आणि उत्कटता महत्त्वाची असते. तुमच्या जोडीदाराच्या मानेवर अतिशय भावनाप्रधान होऊन घेतलेलं किस. यामध्ये मानेवर हलक्या स्वरुपात चावा घेणं आणि किस करताना मानेवर चोखण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच याला व्हॅम्पायर किस असं म्हटलं जातं. 

किस घेताय ना...किस घेण्यालाही असतात अर्थ 

बटरफ्लाय किस

Giphy

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस करत असता आणि तुम्ही खूप जवळ येता की, तुमच्या पापण्याही एकमेकांना स्पर्श करतात. इंटिमेट किसपैकी हे एक किस आहे आणि तुमचा जोडीदार तुमच्या प्रचंड प्रेमात असल्याचं हे चिन्ह आहे. तुम्ही जेव्हा प्रेमात अत्यंत उत्तेजित होता आणि आपल्या जोडीदारासह एकरूप होता तेव्हा तुम्ही अशा प्रकारे किस घेता.