ADVERTISEMENT
home / Sex Advice
Sex Facts जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत

Sex Facts जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत

सेक्स, रोमान्स, प्रेम या गोष्टी प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाच्या असतात. याची नावं वेगवेगळी असली तरीही त्याचे फिलींग मात्र नक्कीच प्रत्येकासाठी खास आहे. एक दुसऱ्यासाठी काही तर खास करण्यासाठी झटणं, काहीतरी स्पेशल करावं वाटणं, प्रत्येक कपलसाठी सेक्स हा विषय वेगळा असतो. प्रत्येकाला यात रूची असते आणि त्यांना जाणूनही घ्यायचं असतं की एकमेकांना कशा प्रकारे अधिक आनंदी ठेवता येईल. बऱ्याचदा दोघांकडेही अर्धवट माहिती असते. त्यामुळे काही सेक्स फॅक्ट्स (Sex Facts) हे प्रत्येक जोडीला माहीत असायलाच हवेत आणि म्हणूनच आम्ही या लेखातून काही फॅक्ट्स तुम्हाला सांगणार आहोत.

सेक्स करताना नक्की का दुखतं, जाणून घ्या याची महत्त्वाची कारणं

Shutterstock

ADVERTISEMENT

1. बऱ्याचदा असं समजण्यात येतं की, मूल झाल्यानंतर पत्नीला सेक्स करण्यात रूची नसते. पण असं अजिबात नाही. रिसर्चनुसार मुलाच्या जन्मानंतर स्त्रीचा चरमोत्कर्ष अधिक वाढतो. नर्व्ह एडिंग जास्त संवेदनशील झाल्यामुळे महिलांना मुलांच्या जन्मानंतर सेक्स करावं वाटतं. 

2. एकमेकांमधील संवाद व्यवस्थित ठेवा. एकमेकांमधील प्रेम आणि नातं मजबूत ठेवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे सेक्स लाईफमध्येही सुधारणा होते. कारण एकमेकांशी प्रेमाने बोलत राहिल्यास, तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येता. अन्यथा तुमचं नातं व्यवस्थित राहात नाही. 

3. कधीतरी महिलांनीही सेक्ससाठी पुढाकार घ्यावा. कारण असं करण्यास बऱ्याचदा महिला तयार होत नाहीत. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही पुढाकार घेतला तर तुमच्या जोडीदाराला अधिक सुख मिळते. लहान मुलं असतील तर सेक्स लाईफमध्ये बऱ्याचदा अडचण येऊ शकते. त्यामुळे मुलांना व्यवस्थित झोपू द्या आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या संधीचा फायदा घ्या.

4. काही महिलांना नक्की कोणत्या गोष्टींनी उत्तेजित होता येतं हे कळत नाही. पहिले स्वतःला नक्की काय हवंय हे जाणून घ्या आणि बिनधास्त आपल्या जोडीदाराशी याबाबत चर्चा करा. तरच तुम्ही सेक्स लाईफचा व्यवस्थित आनंंद घेऊ शकता. असं केल्याने फोरप्लेमध्ये जास्त सहजता येते आणि सेक्सचा आनंदही मिळतो.

ADVERTISEMENT

5. वास्तविक जीवन हे चित्रपटांमध्ये  दाखवलेल्या गोष्टींपेक्षा खूपच वेगळं असतं. बरेचदा आपली फिगर चांगली नाही ही भावना सेक्स न करण्यासाठी भर पाडू शकते. पण स्वतःवर विश्वास ठेवा तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुम्हीच आवडत आहात हे तुम्ही जाणून घ्या. तुमचं शरीर तुम्हाला परत मिळवता येऊ शकतं. पण तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवलात तरच तुम्हाला सेक्सचा आनंद व्यवस्थित घेता येईल. 

आपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)

Shutterstock

ADVERTISEMENT

6. तुम्हाला सेक्स करताना काय हवंय? तुम्हाला काय आवडतं? या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदारासह नक्की बोला. पण सेक्स करताना नाही तर तुम्ही दोघं एकमेकांना जेव्हा वेळ देता तेव्हा. योग्य वेळ आणि योग्य मूड असेल तेव्हा या गोष्टीवर एकमेकांशी बोलायलाच हवं 

7. एकमेकांचा सहवास असताना त्याचा आनंद घ्या. जास्तीत जास्त फोरप्ले करण्याचा प्रयत्न करा. कारण चरमसुख हवं असेल तर त्यासाठी फोरप्ले  करणं अत्यंत आवश्यक आहे. सेक्स लगेच करू नका. 

8. आजकाल वेगवेगळ्या रंगाचे आणि सुगंधाचे कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. ल्युब्रिकेटेड, रिंड आणि डॉटेड. फोरप्लेदरम्यान उत्तेजना आणि आनंद वाढविण्यासाठी तुम्ही या कंडोमचा वापर करा. असं केल्याने तुमच्या सेक्समध्ये अधिक वेगळेपणा आणि नाविन्यपूर्णताही येते आणि तोचतोचपणा राहात नाही. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

ADVERTISEMENT

9. चित्रपटांमध्ये अथवा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सेक्स रोज करणं शक्य नाही. सामान्यतः आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेक्स करणं योग्य आहे. अतिशयोक्ती करू नका. किती सेक्स करता यापेक्षा कसं सेक्स करता हे जास्त महत्त्वाचं आहे. दोघांनाही यातून सुख मिळणं अत्यंत गरजेचं आहे. 

10. चांगल्या सेक्स लाईफसाठी  तुमचं शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बॅलेन्स डाएट, योग्य झोप घ्या आणि जास्त चहा, कॉफी अथवा सिगरेट, दारू पिणं टाळा. तसंच दोघेही ऑफिसमध्ये काम करत असतील तर रात्री सेक्स करण्यापेक्षा सकाळी अथवा पहाटे सेक्सचा आनंद घ्या. कारण तेव्हा मूड अधिक चांगला असतो. 

11. सेक्स लाईफ काही वर्षांनंतर कंटाळवाणी होते. त्यामुळे वेगवेगळ्या पोझिशन तुम्ही ट्राय करा. केवळ सेक्स बघून समाधान मानू नका तर तुमचा जोडीदार कम्फर्टेबल असेल तर त्याच्याबरोबर या  पोझिशन्स नक्की ट्राय करा. फोरप्लेची वेळ वाढवा. आपल्या जुन्या गोष्टींना उजाळा द्या. पण सेक्स करणं बंद करू नका.

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

ADVERTISEMENT
13 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT