बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची

 बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची

प्रत्येक अभिनेत्रींची स्वत:ची अशी ओळख असते. काही अभिनेत्री या त्याच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात तर काही अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासाठी. याच सौदर्यामध्ये अभिनेत्रींची उंचीही येते. बॉलिवूडमध्ये अशा काही सेलिब्रिटी आहेत ज्यांची उंची ही त्यांची ओळख आहे. जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशाच काही उंच सेलिब्रिटी ज्यांच्या उंचीमुळे अनेकदा त्यांना चित्रपटात घेणे अनेक निर्मात्यांसाठी कठीण होऊन जाते.

अभिनेता ज्यांनी ऑनस्क्रिन गाजवल्या महिलांच्या भूमिका, दिसतात सुंदर

सोनम कपूर

Instagram

सोनम कपूरच्या उंचीची चर्चा नेहमीच होते. बारीक आणि उंच असल्यामुळे तिची उंची नेहमीच उठून दिसते. सोनम कपूरची उंची ही 1.75 मीटर म्हणजेच 5 फूट 7 इंचापेक्षा जास्त आहे. सोनम कपूरच्या करिअरचा विचार करता सोनमने फारच मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूरची मुलगी म्हणून तिची ओळख असली तरी तिच्या फॅशनमुळे तिची वेगळी ओळख तिने निर्माण केली आहे. तिची कमालीची उंची तिला नेहमीच चर्चेत ठेवते.

डाएना पेंटी

Instagram

मॉडेल म्हणून डाएना पेंटीने 2005 साली तिच्या मॉडेलिंग करीअरला सुरुवात केली. 2012 साली तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती ‘कॉकटेल’ या चित्रपटामुळे. डाएना पेंटीची उंचीही  इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त आहे. बारीक बांधा आणि उंची यामुळे ती नेहमीच उठून दिसते. डाएनाची उंची साधारण 5 फूट 6 इंच इतकी आहे. कॉकटेल चित्रपटात ती दीपिका पदुकोणसोबत झळकली होती. त्या चित्रपटातही तिच्या उंचीचा अंदाज येतो. 

अनुष्का शर्मा

Instagram

‘रब ने बना दी जोडी’मधून आलेली ही अभिनेत्री किती उंच आहे ते या चित्रपटातच दिसून आले होते. शाहरुख खानपेक्षाही ती उंच आहे हे दिसले होते. अनुष्का शर्माची उंचीही साधारण सोनम कपूरच्या उंची इतकाच आहे. अनुष्का शर्माची उंची साधारण 5 फूट 8 इंच इतकी आहे. अनुष्का शर्माच्या उंचीमुळे तिच्या सहकलाकाराला उंच असणे फारच गरजेचे असते. अनुष्का शर्माही एक सुपरस्टार आहे.तिने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. 2017 साली तिने विराट कोहलीशी लग्न केले. विराटपेक्षा ती एक इंच उंच आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

दीपिका पदुकोण

Instagram

बॉलिवूडची दिवा अशी जिची ओळख आहे अशी दीपिका पदुकोण अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. दीपिका पदुकोणचाही समावेश उंच अभिनेत्रींमध्ये केला जातो. दीपिकाची उंची 5 फूट 7 इंचाहून जास्त आहे. दीपिकाने सुपरस्टार रणवीर सिंहसोबत 2018 साली अचानक लग्न केले. दोघांनीही यशाच्या शिखरावर असताना लग्न केले. रणवीर सिंह अनेकदा दीपिकाच्या उंची आणि सौंदर्याला पाहता क्षणीच भाळलो असे सांगितले आहे. दीपिकाही ऑनस्क्रिन अनेक कलाकारांच्या पुढे फारच उंच दिसते. 

सुष्मिता सेन

Instagram

बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी म्हणजे सुष्मिता सेन. मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिचे सौंदर्य फारच वेगळे आहे. सुष्मिता सेन ही 5 फूट 7 इंचाच्या आसपास आहे. सुष्मिता सेन ज्यावेळी चित्रपटात काम करु लागली त्याकाळात फार उंच अभिनेते बॉलिवूडमध्ये नव्हते. त्यामुळे तिच्या उंचीचा हिरो मिळणं शक्य नसायचे तरीही तिने ज्या अभिनेत्यासोबत काम केले त्यातील तिच्या भूमिका नेहमीच ठळक राहिल्या आहेत. शाहरुख खान असो वा सलमान खान तिने या सगळ्यांसोबत काम केली आहेत. 


तर या आहेत बॉलिवूडमधील काही अशा सेलिब्रिटी ज्यांची ओळख त्यांची उंची आहे. यामध्ये काही आणखी नावांचाही समावेश होतो.

सुंदर असूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करु शकल्या नाहीत या अभिनेत्री