ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

ट्युब टॉपचे स्टायलिश आणि हटके प्रकार (Tube Tops For Women In Marathi)

ट्युब टॉप सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की ट्युब टॉप फक्त उन्हाळ्यासाठीच बेस्ट आहेत तर असं मुळीच नाही. कारण या टॉपची फॅशन वर्षाचे बारा महिने इन आहे. ट्युब टॉप निरनिराळ्या पद्धतीने कॅरी करता येतात. यासाठीच जाणून घ्या ट्युब टॉपचे निरनिराळे प्रकार आणि काही स्टायलिंग टिप्स

Table of Contents

  ब्लॅक स्ट्रेचेबल आणि लांब ट्युब टॉप (Black Stretchable And Long Tube Top In Marathi)

  हा एक अतिशय आरामदायक आणि स्ट्रेच होणारा ट्युब टॉप आहे. तुम्ही तुमच्या ब्रा साईझनुसार याची निवड करू शकता. विशेष म्हणजे तो तुमच्या अंगाला घट्ट बसत असल्यामुळे तुम्ही खूपच बारीक आणि सुडौल दिसता. या टॉपचे कापड अतिशय मऊ आणि ताणले जाणारे आहे. छातीच्या बाजूने असलेल्या इलॅस्टिक बॅंडमुळे तो अंगावर व्यवस्थित बसतो आणि सरकत नाही. तुमच्या अधिक सुरक्षेसाठी यामध्ये नॉन पॅडेड ब्रा लायनर जोडलेले आहे. 

  लाँग टॉप (Long Tops In Marathi)

  Fashion

  Strapless Stretchable Long Bandeau Tube Top

  INR 300 AT STARS AND VENUS

  राजस्थानी मंडाला जयपूर ट्युब टॉप कनव्हर्टेबल स्कर्ट (Rajasthani Mandala Jaipur Tube Top Convertible Skirt)

  ट्युब टॉपचा हा प्रकार नक्कीच खास आणि युनिक आहे. कारण यामध्ये तुम्हाला टॉपसोबत जोडलेला स्कर्टही मिळेल. हा टॉप सर्व प्रकारच्या साईझमध्ये उपलब्ध आहे. रेयॉनच्या कापडावर हॅंडप्रिंट केलेल्या या डिझानर टॉपने तुम्ही नक्कीच स्टायलिश दिसाल. तुम्ही याचा वापर एखाद्या बॉटमसोबत पेअर करू शकता किंवा यावर दुसरा  टॉप कॅरी करून फक्त मिनी स्कर्टप्रमाणे तो कॅरी करू शकता किंवा एखाद्या बीचवेअर ड्रेससाठी हा टॉप अगदी परफेक्ट आहे. 

  Fashion

  Rajasthani Mandala Jaipur Sanganeri Print 2 in 1 Tube Top

  INR 599 AT Indi Bargain

  सेक्सी मेटॅलिक स्ट्रेप्सलेस ट्युब टॉप (Metallic Strapless Tube Top In Marathi)

  एखाद्या पार्टीसाठी जाताना तुम्ही या टॉपमध्ये खूपच ग्लॅमरस दिसाल जीन्स अथवा स्कर्टवर तुम्ही हा टॉप कॅरी करू शकता. सोनेरी रंगामुळे तुम्हाला एक शायनी लुक मिळेल. मात्र हा टॉप खराब होऊ नये यासाठी फक्त थंड पाण्याचे धुवा अथवा मशिन वॉश करा. टॉपच्या वरच्या बाजूने इलॅस्टिक असल्यामुळे टॉप फिटिंगला व्यवस्थित बसतो. 

  Fashion

  Women Sexy Shiny Metallic Strapless Clubwear Bandeau Vest Tank Crop Tube Tops

  INR 449 AT MPITUDE

  चेक्स डिझाईन कॉटन ट्युब टॉप (Checks Design Cotton Tube Top)

  तुम्हाला खूप घाम येत असेल तर कॉटनचे टॉप वापरण्याशिवाय तुमच्याकडे कोणताच पर्याय उरत नाही. कॉटन मटेरिअलचा हा टॉप तुम्हाला नक्कीच आवडेल. यात तुम्ही स्लीम दिसालच शिवाय फॅशनबेलही. एखाद्या पार्टीसाठी, पिकनिकसाठी तुम्ही हा टॉप वापरू शकता. 

  Fashion

  Cotton Tube Top

  INR 399 AT Bfly

  डेनिमचा स्ट्रेचेबल ट्युब टॉप (Denim Stretchable Tube Top)

  तुम्ही डेनिमवेड्या असाल तर तुमच्यासाठी हा टॉप अगदी परफेक्ट आहे. यामध्ये हलक्या निळ्या रंगाच्या डेनिम कापडाचा वापर केलेला आहे. या जास्त प्रमाणात कॉटन आणि काही प्रमाणात पॉलिस्टरचा वापर केलेला आहे. शिवाय शोल्डरवर दोन छोट्या स्ट्रिप्सची जोडलेल्या आहेत. तुम्ही ब्लॅक अथवा डेनिम जीन्सवर हा ट्युब टॉप नक्कीच कॅरी करू शकता. 

  Fashion

  Stretchable Denim Smocked Tube Top

  INR 699 AT NIFTY

  रेड ऑफ शोल्डर ट्युब टॉप (Red Off Shoulder Tube Top In Marathi)

  लाल रंग हा सर्वांनाच आकर्षित करतो. तुमचा हा आवडता रंग असेल तर हा टॉप अवश्य घ्या. ज्यामुळे तुम्हाला एक बोल्ड आणि ब्युटिफुल लुक मिळेल. या टॉपचे कापड स्ट्रेचेबल असून हा ऑफ शोल्डर असल्यामुळे फिटिंगला व्यवस्थित बसेल. तुम्ही ब्लॅक कलरच्या जीन्स अथवा एखाद्या शॉर्ट स्कर्टवर हा टॉप बिनधास्त कॅरी करू शकता. 

  Fashion

  Red Off Shoulder Solid Tube Top

  INR 519 AT Purplicious

  ब्लु सेल्फ डिझाईन ट्युब टॉप (Blue Self Design Tube Top)

  डेनिम मटेरिअलचा आणखी हा एक टॉप तुमच्यावर अगदी  खास दिसेल. विशेष म्हणजे हा टॉप सेल्फ डिझाईन आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजुंनी घालु शकता. व्हाईट जीन्स आणि हा ट्युब टॉप ज्यात तुम्ही दिसाल अगदी हटके दिसाल. फक्त यासोबत हाय हिल्स आणि स्लींग बॅग कॅरी करायला मुळीच विसरू नका. 

  Fashion

  Blue Self Design Tube Top

  INR 799 AT LA LOFT

  ऑफ व्हाईट सेल्फ डिझाईन ट्युब टॉप (Off White Self Design Tube Top)

  पांढऱ्या रंगात कोणत्याही स्त्रीचे रूप खुलून दिसते. कारण हा रंग तुम्हाला सतत फ्रेश आणि उत्साही ठेवतो. हा टॉप स्ट्रिपलेस असून त्याला साईडने झीप देण्यात आलेली आहे. या टॉपवरील डिझाईनही अतिशय नाजूक आणि सुंदर आहे. 

  Fashion

  Off-White Self Design Tube Top

  INR 2,790 AT COVER STORY

  ब्लॅक अॅंड रेड प्रिंटेंड ट्युब टॉप (Black Off Red Printed Tube Top)

  काळ्या रंगाच्या या ऑफ शोल्डर टॉपवर लाल रंगाच्या नाजूक फुलांची डिझाईन अतिशय सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या टॉपमध्ये दोन लेअर्स देण्यात आलेले आहेत ज्यामुळे लुक अतिशय स्टाईलिश दिसतो. तुम्ही  हा टॉप व्हाईट जीन्स अथवा एखाद्या मिनी स्कर्टवर घालू शकता. 

  Fashion

  Black & Red Printed Tube Crop Top

  INR 1,199 AT FOREVER 21

  ग्रे चेक्स क्रॉप ट्युब टॉप (Grey Checks Crop Tube Top)

  या  टॉपवर काळ्या आणि राखाडी रंगाची चेक्स डिझाईन आहे. शिवाय या क्रॉप ट्युब टॉपचे पॅटर्न नेहमीपेक्षा थोडे वेगळे आणि युनिक आहे. पुढच्या बाजुंना बटन पॅटर्न असल्यामुळे तो घालणे अतिशय सोपे आहे. तुम्ही एखाद्या शॉर्ट स्कर्टवर अखवा एखाद्या जॅकेटसोबत हा टॉप परिधान करू शकता. 

  Fashion

  Grey Checked Crop Tube Top

  INR 1,329 AT FOREVER 21

  ट्युब टॉपसाठी स्टाईलिंग टिप्स (Tube Top Styling Tips)

  ट्युब टॉप वापरणं कितीही थ्रीलिंग असलं तरी ते कॅरी करणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठीच या पद्धतीने ते कॅरी करा आणि दिसा फॅशनेबल

  Instagram

  योग्य बॉटमसोबत पेअर करा (Pair With Right Lower)

  वास्तविक ट्युब टॉपसाठी कोणती बॉटम वापरावी याचा काही ठराविक नियम नाही. त्यामुळे ते तुम्ही एखाद्या मिनी स्कर्ट, जीन्स अथवा जेगिन्सवर ट्राय करू शकता. मात्र तुम्ही यामुळे किती स्टायलिश दिसाल ते तुमच्या फिगरवर अवलंबून आहे. त्यामुळे जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमचे पोट कमी दिसेल अशी बॉटम निवडा ज्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसाल. 

  परफेक्ट अंर्तवस्त्रांची निवड करा (Choose Perfect Underwear)

  ट्युब टॉप कॅरी करताना तुम्ही अंतरवस्त्रे निवडली नाहीत तर तुमचा लुक चांगला दिसणार नाही. यासाठी स्ट्रेपलेस ब्रा अथवा स्टिक ऑन ब्रा कॅरी करा. ज्यामुळे तुमच्या छातीचा भाग सुडौल आणि कमनीय दिसेल.

  टॉपचे कापड महत्त्वाचे (Top's Fabric Is Important)

  जर तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल तर योग्य कापडाच्या ट्युब टॉप घाला. कारण जर तुमच्या ट्युब टॉपचे कापड पातळ आणि झिरझिरीत असेल अथवा सुळसुळीत असेल तर त्याची फिटिंग व्यवस्थित बसणार नाही. 

  Instagram

  योग्य अॅक्सेसरीज वापरा (Wear Right Accessories)

  जर तुम्हाला या लुकमध्ये स्टायलिश दिसायचं असेल तर ट्युबमुळे दिसणारा तुमचा ऑफशोल्डर भाग व्यवस्थित कव्हर करा. अती दागिने घालून तो झाकून न टाकता एखादी साधी लॉंग चैन, चोकर अथवा लेअरचा नेकलेस घाला. ज्यामुळे तुम्ही नक्कीच उठून दिसाल. 

  टॉपवर जॅकेट अथवा श्रग घाला (Wear Jacket Or Shrug)

  जर तुम्हाला ऑफ शोल्डर लुक नको असेल तर तुम्ही एखादे स्टायलिश जॅकेट, श्रग या टॉपवर कॅरी करू शकता. ज्यामुळे तुम्ही स्टायलिश आणि हटके दिसाल.  

  हेअरस्टाईल करताना या गोष्टी लक्षात ठेवा (Things To Remember While Doing Hairstyles)

  कधी कधी बोल्ड लुकच्या या ट्युब टॉपमुळे आणि तुमचे खांदे उघडे पडल्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखे वाटू शकते. अशावेळी मोकळे केस सोडून तुम्ही ते झाकू शकता. जर तुमचे केस लांब असतील तर हाय पोनिटेल बांधा आणि त्याचे दोन भाग करून तुमच्या खांद्यावर सोडा. जर तुम्हाला बिनधास्त दिसायचं असेल तर सरळ मेसी बन बांधा आणि ऑफ शोल्डर मस्त फ्लांट करा. 

  मान आणि खांद्यावर मेकअप करा (Apply Makeup On Neck Or Shoulder)

  ट्युब टॉप तुम्ही एखाद्या पिकनिकसाठी अथवा पार्टीसाठीही वापरू शकता. जर तुमचा लुक पार्टी अथवा एखाद्या डिनरसाठी असेल तर तुम्ही तुमची मान आणि  खांदा यांना योग्य मेकअप करण्याची गरज आहे. यासाठी तुमच्या मॉश्चराईझरमध्ये हायलायटर मिसळा आणि त्या भागावर लावा. ज्यामुळे तुमची त्वचा ग्लो करेल. 

   

   

  Instagram