ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग

लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग

लिंबाचा रस काढून झाला की, लिंबाच्या साली आपण फेकून देतो. पण या लिंबाच्या साली फारच फायदेशीर असतात.याचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतात. व्हिटॅमिन Cने युक्त अशा लिंबाच्या सालीचा नेमका उपयोग कसा करायचा ते आज आपण जाणून घेऊया. म्हणजे बाजारातून लिंब आणल्यानंतर तुम्ही त्याचा उपयोग कधीही करु शकाल. अगदी महागात लिंब जरी घेतली तरी त्याचा अगदी योग्य वापर केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल.

त्वचेसाठी लिंबाचा वापर आणि त्याचे होणारे अप्रतिम फायदे – How To Use Lemon For Face

लिंबाच्या सालीचे लोणचे

लिंबाचे बनवा लोणचे

Instagram

ADVERTISEMENT

लिंबाच्या सालीचे लोणचे उत्कृष्ट होते. लिंबाचा रस काढल्यानंतरही लिंबाच्या सालीमधील आंबटपणा हा तसा कायम असतो. लिंब कितीही नीट पिळला तरी त्याचा थोडासा अर्क तरी त्यामध्ये राहतो. आता तुम्हाला त्या सालीपासून सोपे आणि झटपट लोणचे करायचे असेल तर सोपी रेसिपी

सााहित्य: लिंबाच्या साली, गुळ, वेलची

कृती:

  • लिंबाच्या साली साधारण एक वाटीभर किंवा मोठ्या वाडगाभर होईपर्यंत जमा करुन घ्या.
  • एका भांड्यामध्ये लिंबाच्या साली, गुळ घेऊन ते चांगले शिजवायला घ्या. गुळ चांगला वितळू लागला की, त्यामध्ये वेलची पूड घालून छान मुरवून घ्या.
  • हे लोणचं जास्त दिवस टिकू शकत नाही. लिंबाच्या गोड लोणच्याप्रमाणे याची चव लागते. त्यामुळे तुमच्या जेवणालाही चांगली चव येते.

लिंबाच्या सालीचे स्क्रब

लिंबाचा स्क्रब

ADVERTISEMENT

Instagram

व्हिटॅमिन C ने युक्त असे लिंबू त्वचेसाठी फारच चांगले असते. लिंबामधील क्लिन्झिंग एजंट तुमची त्वचा स्वच्छ करुन त्याला तजेला देण्याचे काम करतात. आता लिंबाचा उपयोग थेट तुम्ही चेहऱ्यावर करु शकत नाही आणि याचा वापर तुम्ही रोज करु शकत नाही. म्हणूनच त्याची पावडर बनवून ठेवा. कारण त्याचा उपयोग तुम्हाला अगदी कधीही करता येऊ शकतो.

अशी करा लिंबाच्या सालीची पावडर 

  • लिंबाच्या सालीची पावडर तुम्हाला थेट उन्हात वाळवून करु शकता.
  • पावसाळ्यातही तुम्हाला मायक्रोव्हेवमध्येही तुम्हाला लिंबाच्या साली वाळवता येतात.
  • त्याची पावडर करुन तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन ठेवा. आठवड्यातून एकदा केस किंवा त्वचेवर त्याचा वापर करा.

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

ADVERTISEMENT

आंघोळीचे शुद्ध पाणी

आंघोळीचे शुद्ध पाणी

Instagram

आपण दिवसभर बाहेर असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण फेसवॉश किंवा स्क्रब करतो. पण संपूर्ण शरीराचे स्क्रब  करण्याची क्वचितच वेळ आपल्यावर येते. पण त्वचारोग टाळायचा असेल तर तुम्हाला तुमचे संपूर्ण शरीर स्वच्छ करणे आवश्यक असते. लिंबू हे उत्तम क्लिन्झिंग एजंट आहे. लिंबाचा रस काढून झाला की, त्याची साल तुम्ही तुमच्या आंघोळीच्या गरम पाण्यात टाकून द्या. त्या गरम पाण्याने आंघोळ करा तुमच्या त्वचेवरील मळ, घाण निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही मेनिक्युअर किंवा पेडिक्युअर करतानाही लिंबाची साल पाण्यात टाकून ती हातापायांना चोळू शकता. तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेत झालेला बदल जाणवेल.

आता लिंबाची साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा उपयोग नक्की करुन पाहा.

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पित असाल तर जाणून घ्या योग्य पद्धत

28 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT