जाणून घ्या 'वॉकिंग मेडिटेशन' कसं करावं आणि त्याचे फायदे

जाणून घ्या 'वॉकिंग मेडिटेशन' कसं करावं आणि त्याचे फायदे

वॉकिंग मेडिटेशन अथतवा मेडिटेशन वॉक हा मेडिटेशन म्हणजेच ध्यानाचाच एक सोपा प्रकार आहे. अनेकांना याबाबत माहीत नसेल कारण हा प्रकार फारचा प्रसिद्ध नाही. मात्र याचे फायदे अफलातून  आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे तर मेडिटेविव्ह वॉक म्हणडे चालताना ध्यान करणे. मेडिटेटिव्ह वॉकचे मुख्य उद्दीष्ट चालणे हे आहे एखाद्या डेस्टिनेशनवर पोहण्यासाठी प्रवास करणे नाही. त्यामुळे हे ध्यान करताना अगदी हळूहळू आणि संथगतीने चालणे अपेक्षित आहे. त्यासोबतच चालताना तुमचा श्वासही मंदगतीनेच सुरू असायला हवा. इतर मेडिटेशन आणि यातील प्रमुख फरक हा की यामध्ये तुम्हाला डोळे उघडे ठेवून ध्यान करायचे असते. प्रत्येक पावलावर लक्ष केंद्रित केल्यामुळे या ध्यानातून तुमची एकाग्रता वाढते जिचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात फायदा होतो. यासाठी जाणून घ्या याचे फायदे आणि हे ध्यान करण्याची पद्धत

वॉकिंग मेडिटेशनचे फायदे -

 1. वॉकिंग मेडिटेशन म्हणजे चालताना ध्यान करण्याचे तुमच्या शरीर आणि मनावर अनेक चांगले फायदे होतात.
 2. चालताना ध्यान केल्यामुळे तुमचा फिटनेस वाढतो  आणि सहनशक्तीमध्ये वाढ होते
 3. वॉकिंग मेडिटेशनमुळे तुम्हाला  लांबचा प्रवास करण्याचे मनोबल प्राप्त होते
 4. वॉकिंग मेडिटेशन तल्लीन होऊन केल्यामुळे तुमची एकाग्रता वाढू शकते
 5. पायाचे दुखणे आणि संधीवात कमी करण्यासाठी वॉकिंग मेडिटेशन फायद्याचे आहे
 6. वॉकिंग मेडिटेशन करताना तुम्हाला वर्तमान क्षणाचा आनंद घेता येतो ज्यामुळे तुमची जाणिव तीक्ष्ण होते
 7. मनाला शांतता मिळण्यासाठी नियमित वॉकिंग मेडिटेशन करणे उपयुक्त आहे
 8. जर चालत असताना ध्यान करत तु्म्ही ओम या अक्षराचा जप केला तर तुमचे मन शांत आणि प्रसन्न होते
 9. जेवल्यानंतर मेटिटेटिव्ह वॉक केल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते
 10. मन आणि शरीराला जोडण्यासाठी वॉकिंग मेडिटेशनचा फायदा होतो. 
 11. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मक दृष्टीकोण बदलण्यास फायदा होतो
 12. निसर्गाशी तुम्ही एकरूप होता ज्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो.
 13. भावनिक त्रास आणि ताण कमी करण्यासाठी गरजेचं आहे
 14. शारीरिक क्षमता वाढते
 15. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.
 16. सकाळी मेडिटेटिव्ह वॉक केला  तर तुमचा संपूर्ण दिवस फ्रेश आणि चांगला जातो.
Shutterstock

वॉकिंग मेडिटेशन कसे करावे

 • सगळ्यात आधी मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही तुमचे एक स्थळ ठरवावे. ज्या ठिकाणी तुम्ही शांतपणे कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे शांतपणे चालू शकता. जास्त गर्दी नसलेल्या एखाद्या ठिकाणी तुम्ही हा वॉक करू शकता.
 • वॉकिंग मेडिटेशनसाठी तुमच्या शरीराची आणि मनाची बैठक निर्माण होणं गरजेचं आहे. यासाठी वीस ते चाळीस पावलं संथगतीने चाला आणि थोडा वेळ थांबा. उभं पाहून शांतपणे श्वासावर लक्ष द्या. मग पुन्हा मागे जा आणि तितकीच पावलं पुन्हा चाला अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला जमेल तितका वेळा हा वॉक करू शकता.
 • वॉक करताना तुमच्या प्रत्येक पावलावर आणि श्वासावर तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे. जसे की पाऊल उचलणे, पुढे नेणे मग ते जमिनीवट टेकवणे आणि पुन्हा उचलणे या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जमिनीचा स्पर्श जाणवता आला पाहिजे. शिवाय हे सुरू असताना तुमचा श्वास सुरू आहे त्यावरही लक्ष ठेवता आलं पाहिजे
 • मेडिटेटिव्ह वॉक जलद गतीने करू नये. त्यामुळे यासाठी तुम्ही नेहमी जसे चालता त्यापेक्षा मंदगतीने चालण्याचा सराव करा.
 • चालताना हाताची स्थिती कशी आहे याकडेही लक्ष ठेवा. हात तुम्हाला  या स्थितीत अगदी मोकळे सोडायचे आहेत. ज्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.
 • चालताना तुमचे डोळे नेहमी खालच्या दिशेने असावेत. खालच्या दिशेने म्हणजे पायाकडे पाहायचे नाही तर ते थोडे झुकलेले असावेत. कारण तुम्हाला या ध्यान स्थितीत कुठेच तुमची नजर स्थिर करायची नाही. जे दिसेल ते पाहत त्यावर स्थिर न होता पुढे जायचे आहे. 
Shutterstock

मेडिटेशन वॉक कधी करावा -

मेडिटेशन वॉक तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. मात्र सुरूवातील पाचच मिनीटे हा वॉक करा. मग हळू  हळू तुमच्या क्षमतेनुसार या वेळेमध्ये वाढ करत जा. मात्र तुम्ही जी वेळ मेडिटेटिव्ह वॉकसाठी निवडणार आहात ती शांत आणि निवांत असावी. त्यावेळी तुम्ही तुमची इतर कोणतीही कामे करू नयेत. मेडिटेटिव्ह वॉक करण्यासाठी आरामदायक कपडे आणि चपला घाला. तुमच्या वॉकसाठी योग्य स्थळ निवडा आणि नियमित वॉकिंग मेडिटेशन करा. 

Shutterstock