ADVERTISEMENT
home / Nail Care
असिटोन की नॉन-अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर, नखांसाठी काय चांगलं

असिटोन की नॉन-अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर, नखांसाठी काय चांगलं

नेलपेंट अथवा नेलपॉलिश काढण्यासाठी अनेक वर्षांपासून अॅसिटोन (Acetone) चा वापर केला जातो. कारण अॅसिटोन कोणत्याही दुकानात अगदी मेडिकलमध्येही सहज मिळते शिवाय ते स्वस्तही असतं. सध्या बाजारात नॉन – अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर (Non Acetone Nail Polish Remover) जास्त लोकप्रिय आहेत. मात्र या रिमूव्हरची किंमत अॅसिटोनपेक्षा जास्त असते. शिवाय त्यामुळे अॅसिटोन एवढं पटकन नेलपॉलिश काढताही येत नाही. मग जर अॅसिटोनने काम पटकन आणि स्वस्तात होत असेल तर बाजारातील महागड्या या नेल रिमूव्हरची गरज का आहे. यासाठी जाणून घ्या नेल पॉलिश काढण्यासाठी अॅसिटोन वापरणं योग्य की नॉन – अॅसिटोन नेल रिमूव्हर 

Shutterstock

असिटोन –

असिटोन हे सर्वसामान्यांना परवडण्यासारखं आणि नखांवरील नेलपॉलिशचा जाड कोट काढणारं सर्वोत्तम प्रॉडक्ट आहे. कारण यामुळे नखांवरून अगदी सहज आणि पटकन नेलपॉलिश निघून जातं. मात्र अॅसिटोनमध्ये अतिशय तीव्र आणि हानिकारक घटक असतात ज्यामुळे तुमच्या नखांचंही नुकसान होऊ शकतं. अॅसिटोनमुळे तुमच्या नखांवरील नैसर्गिक तेलदेखील निघून जाते आणि नखे कोरडी, निस्तेज, ठिसूळ होतात. आठवड्यातून एकदा अथवा फार फार तर दोनदा नेलपॉलिश काढण्यासाठी तुम्ही अॅसिटोन नक्कीच वापरू शकता. मात्र जर तुम्ही नखांवर रोजच अॅसिटोन वापरणार असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण असं केल्यामुळे तुमची नखं डिहायड्रेट आणि तुटक होतात. यामुळे तुमच्या नखांवरील क्युटिकल्सचेही नुकसान होते. त्यामुळे सहाजिकच तुम्ही वारंवार तुमच्या नखांवरील नेल पॉलिश काढण्यासाठी याचा वापर करू नये.

ADVERTISEMENT

Shutterstock

नॉन – अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर –

नॉन- अॅसिटोन नेल रिमूव्हर्समध्ये isopropyl alcohol, propylene आणि ethyl acetate अशा घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक अॅसिटोन इतके तीव्र आणि हानिकारक नसतात. नॉन- अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर लावण्याचा एक तोटा हा ही आहे की यामुळे तुम्हाला नेल पॉलिश काढण्यासाठी अॅसिटोनपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे बराच वेळ नखे आणि बोटांवर त्याचा स्पर्श झाल्यामुळे तुमची नखं आणि बोटं कोरडी आणि खरखरीत होऊ शकतात. पण हे नेल रिमूव्हर्स तुमच्या नखांचे अॅसिटोन एवढे नुकसान करत नाहीत. शिवाय त्यांच्यामध्ये फक्त नेल पॉलिश काढणारेच घटक असतात असं नाही तर बऱ्याचदा त्यामध्ये  तुमच्या नखांना पोषण देतं आणि क्युटिकल्सनां मऊ ठेवतं. यासाठी बऱ्याच नेल रिमू्व्हर्समध्ये व्हिटॅमिन ई, ग्लिसरिन, कोरफड अशा नैसर्गिक घटकांचाही वापर केला जातो. ज्यामुळे तुमची नखं मऊ आणि मुलायम राहतात. शिवाय तुम्ही या  नेलपॉलिश रिमूव्हर्सचा वापर नियमित करू शकता. त्यामुळे तुमच्या नखांचे नुकसान होत नाही. 

थोडक्यात अॅसिटोनपेक्षा नॉन -अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर्स नखांसाठी चांगले असतात. मात्र असं असलं तरी कोणतंही नेल पॉलिश रिमूव्हर वापरण्यापूर्वी त्यावर दिलेले घटक तुमच्या नखांसाठी योग्य आहेत का हे अवश्य तपासा. नेल रिमूव्हरच्या पॅकिंगवर त्यात असलेले घटक लिहिलेले असतात. शिवाय जर तुम्हाला कधीतरी नखांवरील एखादा जाड कोट काढून टाकायचा असेल तर अशा वेळी क्वचित अॅसिटोनचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तुमची नेलपॉलिश पटकन निघेल. शिवाय तुम्ही किती वेळा नेलपॉलिश लावता आणि काढता, तुम्ही त्यासाठी किती पैसे खर्च करू इच्छिता यावरही तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य हे ठरू शकतं. त्यामुळे जर वारंवार वापर करायचा असेल तर खर्चिक असलं तरी नॉन – अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हरचीच निवड करा. ज्यामुळे नखांचे जास्त नुकसान  होणार नाही. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय

ADVERTISEMENT

5 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा तेलकट त्वचेपासून त्वरीत सुटका

28 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT