ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
गरोदरपणात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हीही वापरा अनुष्का शर्माच्या टिप्स

गरोदरपणात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हीही वापरा अनुष्का शर्माच्या टिप्स

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ अर्थात आई होण्याच्या काळाचा आनंद घेत आहे. लवकरच अर्थात जानेवारी 2021 मध्ये अनुष्का बाळाला जन्म देणार आहे. गर्भावस्थेदरम्यान अनुष्का शर्मा आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेचीही काळजी घेत आहे. अनुष्का शर्मा आपल्या चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी घरगुती स्किनकेअर टिप्सचा वापर करते. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी गरोदर असेल आणि आपल्या त्वचेची काळजी नक्की कशी घ्यायची कळत नसेल तर तुम्हीही अनुष्का शर्माच्या टिप्स फॉलो करू शकता. सध्या कोरोना चालू असल्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाताची स्वच्छता यासाठी तुम्ही MyGlamm चे हँडक्रिम नक्की वापरू शकता. तसेच वाईपआऊटचाही वापर करू शकता.

त्वचेची काळजी घेण्यासाठी करते मालिश

अनुष्का शर्मा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरातच चेहऱ्याला मालिश करून घेते. अनुष्काच्या म्हणण्यानुसार मालिश केल्याने पोअर्स ओपन होतात. तसंच रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसंच मालिश केल्याने मेकअप केल्यानंतर त्वचेवर सतत घाम येत नाही आणि मेकअप जास्त काळ टिकून राहातो. मालिश केल्याने त्वचेवरील मॉईस्चराईजर टिकून राहाते. त्यामुळे नियमित त्वचेवर घरच्या घरी मालिश करणे अत्यंत आवश्यक आहे. 

सेलिब्रिटीसारखा मेकअप हवा असेल तर वापरा उत्कृष्ट मेकअप उत्पादने

तरूण त्वचा दिसण्यासाठी ऑईल पुलिंग

अनुष्का आपले दात मजबूत करण्यासाठी ऑईल पुलिंग करते. ऑईल पुलिंगमुळे अंगातील साचलेली घाण बाहेर येते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी फायदेशीर ठरते. अनुष्का शर्मा ऑईल पुलिंगसाठी नारळ पाण्याचा उपयोग करून घेते. यामुळे हिरड्या अधिक मजबूत होतात. गर्भावस्थेमध्ये दातावरही खूप परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची आणि सौंदर्याची काळजी या दिवसांमध्ये घेणं अत्यंत गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

एल्डफ्लॉवर ज्युसचे सेवन

एल्डफ्लॉवर ज्युस हे अनुष्काचे सर्वात आवडते पेय आहे. एल्डफ्लॉवर ज्युसमध्ये अँटिव्हायरल गुण आढळतात जे त्वचेवर येणाऱ्या कोणत्याही अलर्जीसाठी उत्तम उपाय आहे. चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर तुम्ही या ज्युसचा वापर करावा. पण त्याआधी तुमच्या आरोग्यासाठी तो योग्य ठरतो की नाही याचा सल्ला नक्की तुमच्या डॉक्टरांकडून आधी घ्यावा. 

घरगुती पद्धतीने ब्लॅकहेड्स काढून थकलात तर या पद्धती करा ट्राय

वर्कआऊट

अनुष्का शर्माच्या म्हणण्याप्रमाणे वर्कआऊट हे केवळ फिट ठेवण्यासाठी आवश्यक नाही तर त्वचा आणि केसांनाही वर्कआऊट करण्याने फायदा मिळतो. अनुष्का शर्माला संगीत ऐकत वर्कआऊट करण्याची सवय आहे. यामुळे तिचे मेटाबॉलिजम चांगले राहते असं तिचं म्हणणं आहे. वर्कआऊट करण्याने मानसिक तणाव दूर होतो आणि चमकदार त्वचा अधिक उठून दिसते. 

मीरा राजपूतने शेअर केलं ब्युटी सिक्रेट, अशी घेते त्वचेची काळजी

ADVERTISEMENT

परफेक्ट आयब्रो शेप

गरोदरपणा असला तरीही आपल्या त्वचेकडे आणि सौंदर्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? मेकअपपेक्षा आपल्या आयब्रो परफेक्ट आहेत की नाही याकडे अनुष्का जास्त लक्ष देते. तुम्ही मेकअप केला नाहीत तरी तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी आयब्रोचा परफेक्ट शेप मदत करतो. बोल्ड आयब्रो शेपमुळे डोळे आणि  चेहरा अधिक आकर्षक दिसतो. आयब्रोला बोल्ड लुक देण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकता. 

आहार

वेळच्या वेळी योग्य आहारही तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे गरोदरपणात एकावेळी भरपूर न खाता सतत फळं, ज्युस आणि इतर खाण्याच्या पदार्थांकडे नीट लक्ष द्या.  तेलकट पदार्थ अथवा जंक फूड खाणं टाळा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT