घरात नेहमी आपल्याला नेहमी तूप खाण्याचा सल्ला मोठ्या माणसांकडून मिळत असतो. इतकंच नाही तर आता न्यट्रिशन्सदेखील तूप खाण्याचा सल्ला देतात. तुपाचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्हाला केवळ शारीरिक फायदेच मिळत नाहीत तर तुम्ही निरोगीही राहाता. तसंच अनेक आजारांपासून तुम्हाला सुटका मिळते आणि तुमची त्वचा आणि केसही चमकदार होतात. काही जणांना वाटतं तुपामुळे वजन वाढतं. तर काही जणांना वाटतं तूप हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र तुपाचा सौंदर्य वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. चेहरा आणि केसांसाठी याचा कसा वापर करून घ्यायचा आणि याचा काय फायदा आहे ते आपण या लेखातून पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुपामध्ये नक्की कोणती पोषक तत्व आहेत त्याची माहिती आपण घेऊया.
तुपामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे लोक म्हणतात की तुपामुळे वजन वाढतं ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. पण तुपामुळे वजन तेव्हाच वाढतं जेव्हा तुम्ही ते अतिप्रमणात खाता. तुम्ही रोज एक चमचा तूप खाल्ले तर त्याचा तुमच्या शरीरावर चांगलाच परिणाम होतो. तुपामध्ये पाणी, कॅलरीज असतात. यामध्ये कॅलरीचे प्रमाणे 900 कॅलरी इतके असते. तर यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा असते. त्याशिवाय तुम्हाला तुपातून विटामिन ए आणि फॅटी अॅसिडही प्राप्त होते. त्यामुळे याचे खाण्याचे प्रमाण हे तुम्हाला माहीत असायला हवे. कोणतीही गोष्ट अति खाल्ली तर त्याचे नुकसान असतेच. पण योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा फायदाही होत असतो हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुपाचे अनेक फायदे आहेत विशेषतः चेहरा आणि केसांसाठी. तेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
रोजच्या आयुष्यात आहारामध्ये देशी तुपाचा वापर अनेक तऱ्हेने केला जातो. पण लक्षात ठेवा की, याचे सेवन प्रमाणात केल्यास, याचा फायदा मिळतो. आम्ही तुम्हाला याचे काही महत्त्वाचे फायदे खाली देत आहोत ते जाणून घ्या. चेहऱ्यावरील ओठ फाटले असल्यास तुपाचा उपयोग करायचा हा एकच फायदा आपल्या सगळ्यांना माहीत असतो. पण आपला चेहरा सुंदर बनविण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. तसंच त्वचेसंबंधी अनेक समस्या तुपामुळे दूर होतात. विशेषतः कोरड्या त्वचेला याचा अधिक फायदा मिळतो.
तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील निस्तेजता कमी करायची असेल तर तुम्ही अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करता. पण त्यासाठी सर्वात उत्तम आणि प्रभावी उपाय म्हणजे तूप. तुम्ही आपल्या नाजूक त्वचेसाठी तुपाचा वापर करा आणि त्वचा सुंदर, मऊ आणि हायड्रेट ठेवा.
तुमच्या त्वचेवर चमक आणायची असेल तर तुमची त्वचा आतून चमकदार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुपाचा उपयोग होतो. कारण तूप हे तुमच्या शरीरातील आतली सिस्टिम नीट करण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय त्वचेतील मऊपणा शरीरात टिकवून ठेवण्यास याची मदत मिळते. त्यामुळे तुपाच्या सहाय्याने तुमची त्वचा अधिक चमकदार होते.
तुम्हाला जर लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्यांचा त्रास जाणवत असेल तर त्यासाठी योग्य पर्याय म्हणजे चेहऱ्यावर तुपाचा उपयोग करून घेणे. नियमित स्वरूपात तुम्ही तुपाचा उपयोग केल्यास, हे तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत जाते आणि त्वचेची छिद्र अधिक निरोगी आणि सुंदर बनविण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही सुरकुत्यांपासून दूर राहू शकता. तूप आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
धकाधकीच्या आयुष्यात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि डोळ्यांखाली कधी काळी वर्तुळं जमा होतात हे कळतदेखील नाही. बऱ्याचशा महिलांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे. कारण कामातील व्यस्तता आणि झोपेची कमतरता यामुळे याचा खूपच त्रास होतो. त्यासाठी सतत पार्लरला जाणंही परवडत नाही. त्यामुळे घरच्या घरी तुम्ही तुपाचा वापर करून यावर मात करू शकता.
केवळ डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी नाही तर डोळे सुंदर दिसण्यासाठीही तुम्ही तुपाचा उपयोग करून घेऊ शकता. सतत काम केल्याने डोळ्यांवरील थकवा दिसून येतो आणि डोळे निस्तेज दिसू लागतात. डोळ्यांवरील सुस्ती आणि थकवा कमी करण्यासाठी तुपाचा उपयोग होतो. नियमित स्वरूपात तुम्ही तुपाचा उपयोग केला तर तुमचे डोळे अधिक सुंदर दिसू शकतात.
फाटलेल्या ओठांसाठी तुपाचा वापर केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुपामुळे ओठ मॉईस्चराईज होतात. यामधील पोषक तत्व आणि अन्य घटक हे ओठांना हायड्रेट ठेवायला मदत करतात. तुम्हाला तुमचे ओठ नेहमी सुंदर आणि मुलायम ठेवायचे असतील तर तुपाचा वापर करत राहा. तूप चे बरेच फायदे आहेत
तुपाचा असाही उपयोग करून घेता येतो. तुमची त्वचा भाजली असेल अथवा घाव झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला तूप फायदेशीर ठरते. त्वचेवर अगदी सूर्याच्या किरणांनीही त्रास होत असेल तर तुपामुळे हे घाव बरे होतात. देशी तुपाचा यासाठी तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.
चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे अथवा निशाणांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुपाचा पर्याय निवडा. कारण नियमित स्वरूपात तुम्ही यावर तुपाचा वापकर केल्यास तुमची त्वचा उजळण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील हे काळे डागही निघून जातात.
चेहऱ्यावरील अॅक्ने घालविण्यासाठी आपण वेगवेगळ्या कल्पना लढवत असतो. पण त्यावर तूप हा अप्रतिम उपाय आहे. कारण तुपाच्या सेवनाने आपल्याला अनेक आजारांपासून सुटका मिळते. तुपाचे सेवन करून तुम्ही अॅक्ने, पुरळ यापासून सुटका मिळवू शकता. तसंच तुमचा चेहरा अधिक तजेलदार आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. आहारासह तुम्ही तुपाचा उपयोग चेहऱ्याला लाऊन अॅक्ने घालविण्यासाठीही करू शकता.
केस चांगले राहावे यासाठी आपण किती वेळा पार्लरची पायरी चढतो. पण घरच्या घरीही तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरते ते म्हणजे आपल्या घरातील तूप. तुम्हीही घरातील तूप वापरून केसांसाठी फायदा करून घेऊ शकता.
तूप हे केसांसाठी उत्तम कंडिशनर समजण्यात येते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नाही त्यामुळे निस्तेज आणि शुष्क केसांसाठी याचा तुम्ही चांगला उपयोग करून घेऊ शकता. तसंच तुमच्या स्काल्पसाठीही याचा उपयोग होतो.
केसांमधील गुंता सोडविणे हे प्रत्येकासाठी अगदी डोळ्यांत पाणी आणणारे काम आहे. पण त्रासापेक्षाही ते तुमच्या केसांसाठी अधिक हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कंगव्याने गुंता सोडविण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते खूपच त्रासदायक होते. अशा वेळी केस तुटण्याचा आणि पातळ होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही हे तुपाच्या सहाय्याने पटकन सोडवू शकता.
केसात कोंडा होणे ही अत्यंत सामान्य समस्या आहे. पण त्यासाठी कोणत्याही शँपूचा वापर करून केस अधिक खराब करून घेण्यापेक्षा तुम्ही घरातील तुपाचा वापर करू शकता. हे करणं अतिशय सोपं आणि तितकंच फायदेशीर आहे.
तेलापेक्षाही तुपाने केसांना मसाज केल्यास, केसांची वाढ चांगली होते. तसंच कोंडा कमी प्रमाणात होतो. तुमचे केस अधिक निस्तेज आणि फ्रिजी असतील तर तुम्ही स्काल्पवर तूप लाऊन मसाज करा. यामुळे तुम्हाला तणावापासूनही मुक्तता मिळते आणि तुमचे केस अधिक मऊ होतात. तसंच यामुळे तुमचा रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि त्यामुळे केसांना आवश्यक असणारे पोषण मिळते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप आणि नारळाचे तेल एकत्र करूनही केसांना मसाज देऊ शकता. यामुळे केसांना अत्यंत चांगले पोषण मिळते आणि केसगळती थांबण्यास मदत मिळते.
सततच्या प्रदूषणामुळे केसांवरील चमक बऱ्याचदा निघून जाते. पण तुम्हाला केसांना अधिक चमक हवी असेल तर तुपाचा उपयोग करून घ्या. ज्याप्रमाणे तूप तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते त्याचप्रमाणे तुमच्या केसांनाही यामुळे चमक मिळते. तसंच तुपाचा वापर केल्याने तुमचे केस अधिक बाऊन्सी होतात.
तुपाचा वापर केसांवर केल्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि केसगळती थांबून केसांची वाढ होण्यासही मदत मिळते. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही तूप आणि नारळाचे तेल दोन्ही मिक्स करून घेऊ शकता.
हो तुपामुळे त्वचा उजळते. तूप त्वचेच्या आतपर्यंत जाऊन पोषण देते. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग जाऊन तुपामुळे त्वचा उजळण्यास मदत मिळते.
तुपामध्ये कोणतेही रासायनिक तत्व नाही. त्यामुळे तुम्ही तूप चेहऱ्यावर बिनधास्त लाऊ शकता. यामुळे कोणतीही हानी होत नाही.
तूप चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटशेन हटविण्यासाठी उपयुक्त ठरते. यातील पोषक तत्वे त्वचेसाठी अधिक फायदेशीर असून पिगमेंटेशन दूर करण्यास मदत होते.
तुपामध्ये विटामिन ए आणि सॅच्युरेटेड अॅसिड जास्त प्रमाणात असते. त्यामुळे याचे जास्त सेवन केल्यास, तुमची जाडी वाढते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला श्वासाचा त्रासही जाणवण्याची शक्यता असते.
काळे डाग तुपामुळे पूर्ण निघून जात नाही. मात्र त्याचा काळपटपणा कमी करण्याचे काम तूप करते. त्यातील पोषक तत्व काळे डाग हटविण्यास मदत करते. घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा