ADVERTISEMENT
home / Fitness
पोटाचा घेर वाढवायचा नसेल तर खा मल्टीग्रेन ब्रेड

पोटाचा घेर वाढवायचा नसेल तर खा मल्टीग्रेन ब्रेड

ब्रेड हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. पावामुळे वजन वाढतं हे माहीत असलं तरी देखील अनेकांना पाव, ब्रेड खायला खूप आवडते. तुम्ही ब्रेड किंवा पाव #lover असाल आणि तुम्हाला तुमच्या डाएटमधून हा पदार्थ हद्दपार करायचा नसेल तर तुमच्यासाठी #multigrainbread हा एक चांगला पर्याय आहे. मल्टीग्रेन ब्रेड म्हणजे काय? आणि तो अजूनपर्यंत खाल्ला नसेल तर आज आपण मल्टीग्रेन ब्रेडचे फायदे काय ते जाणून घेणार आहोत. वजन कमी करण्यापासून ते तुमच्या शरीराला आवश्यक असलेले घटक पुरवण्यापर्यंत या मल्टीग्रेन ब्रेडचे फायदे आहेत. चला करुया सुरुवात

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे फायदे

 

असा तयार होतो मल्टीग्रेन ब्रेड

असा तयार होतो मल्टीग्रेन ब्रेड

ADVERTISEMENT

Instagram

गव्हाच्या पिठाचा उपयोग करुन मल्टीग्रेन ब्रेड तयार केला जातो. पण या शिवाय या ब्रेडमध्ये आळशी, मिलेट्स, ओट्स, बार्ली, क्विएन्ना, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया यांचा समावेश असतो. इतर कोणत्याही ब्रेडप्रमाणे हा ब्रेड तयार केला जातो. पण मैद्याऐवजी त्यामध्ये असलेल्या गव्हाचे पिठ शरीरासाठी फारच फायदेशीर असते. अनेकदा मल्टीग्रेन ब्रेड हे मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून नाही तर बदामाच्या पिठापासूनच तयार केला जातो. हा ब्रेड दिसायला इतर ब्रेडसारखा नसला तरी देखील चवीला आणि तुमच्या पोटासाठी हा चांगला असतो.

बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे (Benefits of eating Rice in Marathi)

मल्टीग्रेन ब्रेड खाण्याचे फायदे

मल्टीग्रेन ब्रेड

ADVERTISEMENT

Instagram

मल्टीग्रेन ब्रेडमध्ये असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करता त्याचे फायदे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आता जाणून घेऊया मल्टीग्रेन ब्रेड खाण्याचे फायदे 

  • मल्टीग्रेन ब्रेड हा फायबरने युक्त असतो. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अरबटचरबट खाण्यासाठी अनेकदा इच्छा होते. पण तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडचे सेवन केल्यानंतर मात्र तुम्हाला फार काळासाठी भूक लागत नाही. तुमचे पोट भरलेले राहते. 
  • मल्टीग्रेन ब्रेडमध्ये नुसतेच फायबर नसते.तर त्यामध्ये घालण्यात आलेल्या वेगवेगळ्या घटकांमुळे त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आमि मिनरल्स असते. जे शरीरासाठी आवश्यक असतात. 
  • पाव किंवा ब्रेड खाणे अनेकजण टाळतात कारण त्यामुळे फॅट वाढण्याची शक्यता असते. पण मल्टीग्रेन ब्रेडमध्ये फार कमी प्रमाणात फॅट असतात. आणि जे फॅट या ब्रेडमध्ये असतात ते शरीरासाठी हानिकारक नसतात. 

मूळव्याधीवर लवकर आराम मिळावा यासाठी घरगुती उपाय 

  • फायबरयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. हा ब्रेड सफेद किंवा ब्राऊन ब्रेडच्या तुलनेत पचायला थोडा कठीण असतो. पण सवयीनंतर तुम्ही याचे सेवन अगदी आरामात करु शकता. 
  • मल्टीग्रेन ब्रेड तुम्ही घरीच बनवून खाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरातही हा ब्रेड अगदी सहज बनवू शकता. आता तुम्हाला बाहेरचे पावाचे पदार्थ आवडत असतील तर तुम्हाला ते टाळण्याची गरज नाही. तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडमध्ये बनवलेले पदार्थ अगदी आरामात खाऊ शकता. 

आता तुम्हाला मल्टीग्रेन ब्रेड बाजारात दिसल्यास तुम्ही तो आवर्जून घ्या आणि तुमच्या आहारात आणा. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि पोटाचा घेरही वाढणार नाही.

ADVERTISEMENT

फिटनेससाठी ब्राऊन ब्रेड खाताय? जाणून घ्या ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील फरक

21 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT